" काका, काका.. झालं का.. चला लवकर.."
रियाने काळजीच्या स्वरात काकांना आवाज दिला. दादा - वहिनींनी बजावलं होतं, आठ पर्यंत तू त्यां
काकूंचा काकाबद्दलचा जो आत्मविश्वास होता त्याला तोड नाही. काकूंकडे पाहून डोळ्यांनीच काकांकडे इशारा केला व हळूच काकूंना बोलली ," काकांना काय ओळखतेस .. ग्रेट आहेस..."
काकू कानात पुटपुटली," पन्नास वर्षांपासून सोडवत आलेलं गणित आहे, असं कसं चुकेल..!!
"
काका जोरात बोलले," चला लवकर, सात चाळीसची बस मिळेल."
काकू खुर्चीत बसत रुसलेल्या स्वरात
बोलली," एवढी नटून - थटून मी बस मधून येणार नाही, माझी हेअर स्टाईल खराब होईल, जायचं असेल तर कॅब बुक करा नाहीतर मी येणार नाही.."
काकूंचा हा तोरा बघून रिया चाट पडली, काल पर्यंत उत्सुक असणारी काकू आज चक्क तोऱ्यात नाही बोलते...!!
" चल बाई लवकर.." म्हणत काकांनी कॅब बुक केली.
आज काही बोलण्यापेक्षा रिया काका काकूंच्या संसाराचं समीकरण खूप जवळून अनुभवत होती.
काल पर्यंत असं वाटत होतं यांचं लग्नं जमावताना यांची कुंडली पाहिली असेल की नाही, यांचा तर एकही गुण जमत नाही. पण याचं एकमेकांना समजून घेताना , एकमेकांची मनं सांभाळताना बघून असं वाटतंय यांचे तर पूर्ण छत्तीस गुण जुळतात.
दोन वर्षापूर्वी थाटलेला आपला संसार पण असाच तर आहे तरी आपण काडीमोड घ्यायला निघालो..
काकाच्या आवाजाने रिया भानावर आली," चल लवकर, कॅब आली खाली.."
नवीन नवरा - नवरी व करवली हॉटेल मध्ये वेळेत पोहचले.. हॉटेल मध्ये प्रवेश करताच , पुष्पवृष्टी करण्यात आली, दोघांना पन्नास दिवे करून ओवळलं गेलं , सर्वांनी मनोगत व्यक्त केलं, नाच - गाणी झाली , केक कापून झाला. चिडलेल्या चेहऱ्यातले काका तर प्रसन्न व हसऱ्या चेहऱ्यातली काकू म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाच्या जोडात दिसत होते.
सर्वात शेवटी रिया समोर आली व तिने काका काकूंचा हात हातात घेतला व बोलली," आज तुमच्या या पन्नासाव्या वाढदिवसाने माझे डोळे उघडले, माझा मोडणारा संसार वाचवला.
दोघांची मतं, आवडी निवडी किंवा सवयी वेगळ्या असतील तरी संसार गोडीने होहू शकतो याचं जिवंत उदाहरण तुम्ही मला दिलं...thank you so much kaka - Kaku "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment