"साहेब मी साधा चित्रकार ..तुम्हाला माझे चित्र दाखवायला आलो होतो ." थरथरत्या आवाजात अरविंद बोलला .
" तू असशील चित्रकार पण माझ्या बहिणीकडे बघण्याची तुझी हिम्मत कशी झाली , पकडा रे याला .. ज्या डोळयांनी याने राजकुमारीला पाहिलं ते डोळेच काढून टाका याचे ." डोळे वटारून सेवकाला आज्ञा केली एवढ्यात राजकुमारी भावाचा हात पकडत बोलली ,' दादा यात यांची काहीच चूक नाही , मीच याना बोलावलं होतं ..."
आई - वडिलांच्या निधनानंतर मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या राजकुमारीला कधीच दुखावलं नव्हतं . बहिणीला कधीच कुठल्याच गोष्टींची कमी भासू दिली नाही. सगळी सुख तिच्या पायाशी आणून ठेवली होती. आता बहिण उपवर झाली होती पण तिच्या योग्यतेचा राजकुमार शोधूंनहि सापडत नव्हता याची खंत मनात होती .
" साहेब , तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे फक्त मला माझ्या डोक्यातली व माझ्या मनातली कलाकृती साकारण्याची परवानगी द्यावी ." विनंतीच्या स्वरात अरविंद बोलला .
बहिणीकडे कडे दृष्टिक्षेप टाकत , हातानेच इशारा करून अरविंदाला परवानगी दिली .
अरविंदनी सामानाच्या पिशवीतून साहित्य काढलं व सर्वप्रथम डोळे बंद केले व चित्र काढन्यास सुरुवात केली .सर्वजण उत्सुकतेने त्याच्या कडे बघत होते . सुरुवातीला इनामदारांचा वाडा ,बाहेरून दिसणारा झगमगीत महाल तयार झाला वाड्याच्या समोर एक छानसा तलाव , तलावाच्या भोवती कृत्रिम लाइट ऐवजी समईचा मंद प्रकाश रेखाटला.
गरीब बिचारा चित्रकार याने त्याच्या आयुष्यात सर्वप्रथम महाल पाहिला असेल म्हणून त्याला नवल वाटलं असेल म्हणून शिक्षे अगोदर हे चित्र काढतोय .
अरविंदने चित्राच्या डाव्या बाजूला एक लाल पोशाखातली एक सुंदर तरुणी काढली , त्या तरुणीला दाग दागिन्यांनी मढवलं, केसांचा छान अंबाडा बांधला . पाठमोऱ्या चेहऱ्यातली हि दुसरी तिसरी कोणी नसून राजकुमारी होती....!!!
चित्रातली राजकुमारी आपली बहीणच आहे हे पाहून आपल्या बहिणीच्या सौंदर्याचा खूप अभिमान वाटला. माझी बहीण लग्नात अशीच दिसेल अशी कल्पना केली पण राजकुमारीच्या चेहऱ्यावर उदास भाव होते ....
एका हाताने जळणाऱ्या समईची वात पुढे सरकावते तर दुसऱ्या हातानी तलावातील पाण्याला स्पर्श करत पाण्यात तरंग निर्माण करते . ..
सुखांची उधळण असलेल्या माझ्या बहिणीचे असे चित्र काढणाऱ्या अरविंद बद्दल आता राग जाऊन कुतूहल निर्माण झाले होते .
चित्राच्या जवळ जात विचारलं," हा आमचा वाडा आहे , हि माझी बहीण आहे पण माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचे हाव भाव मला समजले नाही... ."
चित्रातल्या प्रत्येक रंगातील गूढ अरविंद सांगू लागला ," राजकुमारीजी या तलावाच्या पाण्यात त्यांचं स्वतःच प्रतिबिंब पाहत आहेत .आपलं पाण्यासारखं स्वच्छ व नितळ रूप त्यांना दिसलं पण त्यांना बाजूला जळणारी समई स्वतः जळते व इतरांना प्रकाश देते हे समईच रूप जास्त आवडलं . आपल्या सुखापेक्षा ,आपल्या रूपापेक्षा हे कितीतरी महान असल्याची जाणीव झाली व त्या निराश झाल्या पण पुढच्याच क्षणी त्यांनी काजळी आलेली समईतली वात पुढे केली . आपली निराशा लपवण्यासाठी तलावातल्या पाण्याला स्पर्श केला . स्पर्श करताच पाण्यात तरंग निर्माण झाले व राजकुमारीच्या मनात गोंधळ उडाला आहे खरी सुखी कोण सौंदर्याने मढलेली मी , का जळून प्रकाश देणारी समई ?"
चित्रकाराचं हे बोलणं ऐकून राजा आवाक झाला. मी माझ्या बहिणीला लहानपानपासून बघतो पण मी तिला ओळखू शकलो नाही पण हा कुठंला कोण चित्रकार पाच मिनिटात याने माझ्या बहिणीचे मन जाणले.
चित्राकडे बघत राजकुमारी आपले अश्रू थांबवू शकली नाही , माझ्या मनातले भाव प्रत्येक्षात उतरवणारा हा कोणीतरी देवदूत असावा म्हणून मनोमन हात जोडून नमन केले .
बहिणीच्या सौंदर्यावर न भाळणारा तिचे मन जाणंणाऱ्या चित्रकाराला आपल्या बहिणी सोबत लग्न करण्याची मागणी केली .
भौतिक सुखा सोबत तिच्या आंतरिक मनाला जाननाऱ्या एका चित्रकाराचा व रूपवती राजकुमारीचा संसार सुखाने चालू झाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment