दोघे चिअर्स करत चहाचा एक - एक घोट घेत होते एवढ्यात रेडिओ वरती गाणं लागलं
" जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रितीच्या फुलावरी वसंत नाचू दे.."
दोघांनी एकमेकांकडे हसत पाहिलं.या हसण्यात बराच अर्थ सामावला होता.
सर्वप्रथम लग्नाच्या अगोदर कॉलेजच्या कटायवर बसून चहा पीत होते त्यावेळी हेच गाणं लागलं होतं.
आयुष्यात सुखाच्या प्रसंगी कितीतरी वेळा याच गाण्यांनी साथ दिली होती. याच सुखाच्या क्षणांनी दुःखाच्या प्रसंगी लढण्याचे बळ दिले होते.
आज सुखाचा क्षण आहे की दुःखाचा हेच कळत नव्हतं, कारण दोघांची ही अशी भेट होती...
लीलाताईच्या डोळ्यावर प्रेमाचा पडदा होता तर यशवंतरावांना सत्य परिस्थितीची जाणीव होती. आयुष्याच्या या वळणावर माझ्या सहचारणीला खंबीरपणे उभे करायचे आहे . कशी सुरूवात करावी काहीच कळत नव्हते, आढे वेढे घेत, वेगवेगळे दाखले देत शेवटी यशवंतराव बोलून गेले... "माझी एक गोष्ट ऐकशील का...वचन दे मला नाही म्हणणार नाहीस.."
लीलाताई हसत हसत हातात हात देत बोलल्या," मी कधी तुमच्या शब्दाबाहेर आहे का, अहो, तुम्ही माझे मार्गदर्शक आहात . तुमच्या मुळे मी खूप प्रगती केली.बोला आता काय करू..?."
यशवंतराव लिलाताईचा हात दाबत बोलले," आयुष्यभर अशीच हसत रहा. माझ्यासोबत घालवलेले सोनेरी क्षण हसत - हसत आठव पण डोळयात पाणी आणू नकोस. आपण दोघांनी कमावलेला हा संसार आहे याची देखभाल कर. कोणावरती अवलंबून राहू नकोस. तू कोणाचा आधर बनून राहण्यापेक्षा इतरांचा तू आधार बन.
मला खरी मुक्ती मिळून द्यायची असेल तर तू स्वतःला सावर खूप दुःख करू नको. तुझं आयुष्य आनंदात जग.."
" म्हणजे...तुम्ही परत जाणार..??"
" हो. अगं, मी कधीच गेलो पण आज तुझी अशी अवस्था बघून मला परत यावं लागलं. माझ्या अचानक जाण्याचा खूप मोठा धस्का तू घेतलास. जाताना आपली भेट झालीच नाही म्हणून खास तुला भेटायला आलो आहे. संसाराचा नियम आहे.अगोदर तू किंवा मी हे होणारच होतं. बरं झालं माझा नंबर लागला . तुझ्यासारखा खंबीर मी नाही. माझ्या संसार रुपी बागेला फुलणारी तू माळी आहेस. ही बाग अशीच फुलत राहू दे. अजिबात हेळसांड करू नकोस."
" अहो पण.."
लीलाताई कडे बघत मिश्कीलपणे हसत गुणगुणत होते..
" जो वादा किया वो निभाना पडेगा.."
लीलाताईच्या डोळ्यातले अश्रू पुसत यशवंतरावानी हसत हसत शेवटचा निरोप घेतला.
लीलाताईच्या ओठावर शेवटचं कडवं आपसूकच आलं..
"पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे"
आयुष्यभर संसारात जोडीदाराची खंबीरपणे साथ मिळाली पण आयुष्याच्या या वळणार आपला जोडीदार मोडून पडला हे बघताच मृत्यू नंतर समजूत घालणारे व लढण्याचे बळ देणारे जोडीदार क्वचितच पहायला मिळतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment