कॉलेज सोडून सहा वर्ष झालं. बाबांची बदली झाली व दुसऱ्या राज्यात गेलो.
माधुरीचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला अगोदर महाराष्टात जावं लागेल असं ठरवून सुमित कामाला रुजू होण्या अगोदर माधुरीचा शोध सुरू केला.
सर्वप्रथम कॉलेज गाठलं. एवढ्या वर्षानंतर त्याच्या ओळखीचं असं कोणीच दिसत नव्हतं. काय करावं असा विचार करत होता , तेवढ्यात कॅन्टीन मधला तो गणू समोरून जाताना दिसला.
" गणू , ओळखलं का मला.. मी सुमित .."
" अरे सुमित भैया, किती भारी दिसून राहिले तुम्ही.. तुमची लैला भेटली का?"
" मी छान आहे पण तुला पण माझी लैला माहीत आहे.. कुठे आहे ती ..?"
" तुमची अनोखी प्रेम कहाणी होती, माझ्या लक्षात आहे अजून, चोरून चोरून तिला बघायचा ना तुम्ही.."
" हो यार, पण ती आहे कुठे..?
" नाही ना मला पण माहीत नाही पण तुम्हाला तिच्या मैत्रिणीचा नंबर देऊ शकतो.."
सुमितने मैत्रिणीचा नंबर घेतला तिला कॉल करून सर्व हकीकत सांगितली , पण तिलाही माधुरी बद्दल काहीच माहीत नव्हतं पण तिने माधुरीच पूर्ण नाव व घराचा पत्ता दिला.
सुमित घराचा पत्ता शोधत घरा जवळ जाताच त्याला कळलं की, माधुरीच्या बाबांच्या निधना नंतर त्याचं पुर्ण कुटुंब गावाला रहायला गेलं.
शेजाऱ्यानी नागपूर जवळ एक गाव आहे तिथे गेल्याचे सांगितले. नेमके गाव कोणचे हे मात्र त्यांना माहीत नव्हते.
नागपूरला जाऊन त्यांनी आपल्या मित्राकडून त्या जिल्ह्यातल्या गावांची यादी मागवली व यादव या आडनावाची लोक कुठल्या गावात जास्त प्रमाणात आहेत याचा शोध घेतला.
अशी दहा गाव निघाली, प्रत्येक गावात जाऊन त्यांनी शोधा शोध केली पण तिच्या बाबाच्या निधना मुळे कोणीच तिला ओळखत नव्हते.
शेवटी सुमितने आपल्या मित्रा सोबत बसून एक योजना आखली . एका कागदावर त्यांनी लिहिले, सुमित तुझी वाट पहात आहे..लवकर ये..असा मजकूर लिहून पेपर मध्ये जाहिरात दिली.
तरीही काहीच, व कोणाचाच प्रतिसाद आला नाही.
शेवटी हताश होऊन गावातून बाहेर निघाला व बस मध्ये जाऊन बसला. हातात पेपर घेऊन वाचत होता एवढ्यात बाजूला बसलेल्या व्यक्तीने पेपर हिसकवून घेतला व सुमितकडे पहात राहिली.. डोळ्यावरून दोघांनी एकमेकांना ओळखलं..अखेर प्रेमाचे धागे दोरे जुळले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment