मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

स्वप्नसुंदरी भाग 2


स्वप्नसुंदरी भाग 2

 " मी लग्न करीन ते फक्त माझ्या स्वप्नसुंदरी सोबतच.."

सौरभने हा बॉम्ब टाकताच  घरातील लोकांना खूप टेन्शन आलं.
परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आला. चांगला प्रसिद्ध डोळ्यांचा डॉक्टर झाला म्हणून कितीतरी स्थळ सांगून आली होती. लोकांना नकार सांगताना कारण काय सांगायचं हाच प्रश्न होता.
आमचा मुलगा अशा मुलीच्या प्रेमात पडला आहे जी फक्त स्वप्नात भेटते. प्रत्येक्षात तिचा काहीच ठाव ठिकाणा नाही. आई बाबांना हा निव्वळ वेडेपणा वाटत होता. घरच्या लोकांनी, मित्रांनी खूप समजावलं पण सौरभ ऐकायलाच तयार नव्हता.
स्वप्नसुंदरी नित्य नियमाने स्वप्नात भेटायला यायची भुवया उंचावत चल अशी खूण करायची..
सुंदर डोळे, कोरलेल्या भुवया व हसरा - बोलका चेहरा प्रत्येक्षात मात्र कुठेच दिसत नव्हता.
आईने त्याची पत्रिका ज्योतिशींना दाखवली. लग्नाचे योग आहेत,त्याच्या मनातील मुलगी लवकरच भेटेल असे सांगितले.
दिवसामागून दिवस जात होते पण स्वप्नसुंदरी प्रत्येक्षात काही अवतरत नव्हती, घरातल्या लोकांनी आता  आशाच सोडली होती. सौरभ मात्र तिच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता.
एक दिवस सौरभ  कामानिमित्त एका छोट्या गावात गेला होता. कार चालवताना त्याला एक मुलगी दिसली जी दहा - पंधरा मुलांना घेऊन रस्ता ओलांडत होती. हाताने थांबण्याचा इशारा केला. रस्ता ओलांडताच भुवया उंचावल्या व जाण्याचा इशारा केला.


स्वप्नातील सुंदरी प्रत्येक्षात पाहून सौरभ एकदम स्तब्ध झाला. ती त्याच्या समोरून  निघून गेली पण हा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. मागून गाड्यांचे आवाज आले त्यावेळी तो भानावर आला. गाडी बाजूला घेतली व तिचा पाठलाग केला पण परी सारखी अदृश्य झाली.
गावपूर्ण पिंजून काढला पण ती दिसलीच नाही.
शेवटच्या टप्प्यात आलेलं काम पूर्ण करण्यासाठी सौरभ एका शाळेत गेला. एका पडक्या इमारती मध्ये खूपच कमी सुविधा असलेली शाळा बघून त्याला खूप वाईट वाटले. या शाळेतील वसतिगृहात फक्त दोनच कर्मचारी काम करत होते. ऑफीसमध्ये काम करणारा तो कर्मचारी शाळा दाखवण्यासाठी सौरभला घेऊन गेला. मुलांसोबत हसत - खेळत गोष्ट  सांगणारी पाठमोरी मुलगी दिसली. ओळख करून देण्यासाठी ती समोर आली ..."अरे ही तर माझीच स्वप्नसुंदरी"... असं मनातल्या मनात बोलत एक टक तिच्या कडे बघू लागला.
परिस्थितीच भान ठेऊन सौरभ भानावर आला.
शाळेतलं काम संपवून तो जान्हवीला म्हणजेच स्वप्नसुंदरीला सर्व हकीकत सांगितली.
मागच्या पाच वर्षापासून तू सतत माझ्या स्वप्नात भेटायला येतेस असं सांगताच ती हसायला लागली.
स्वप्नाचा व वास्तव्याचा विचार केला तर दोन्ही गोष्टी देवाने घडवून आणल्या होत्या. मागच्या पाच वर्षापासून जान्हवी या गरीब अंध मुलांच्या शाळेत काम करत होती. तिला मनापासून वाटत होते की, या मुलांची दृष्टी परत आणणारा देवदूत यांना मिळावा. एका डॉक्टरच्या स्वप्नात जावून त्याला नजरेनी बोलावण्याचे काम देव तिच्याकडून करून घेत होता.
देवाची लीला अपरंपार आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही
सौरभने अंध मुलांची दृष्टी परत मिळवून दिली व त्याच्यावर मोहिनी घालणाऱ्या स्वप्नसुंदरी सोबत सुखाने संसार थाटला.

1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template