" जोशी काकू, अहो, जोशी काकू..थांबा ना...परवा पण तुम्हाला आवाज दिला , तुम्ही थांबलाच नाहीत . थोडं बोलायचं होतं.."
" शुभांगीताई तुम्ही...!!!ओळखलंच नाही तुम्हाला...!! तब्येत चांगलीच सुधारलेली दिसते आहे..बोला ना काय म्हणता.. काय झालं ?"" माझीच तब्येत सुधारली नाही तर आमची सोनालीही छान गुटगुटीत झाली आहे बरं का.. कधी जायचं आकाशरावांच्या घरी ..?"
" कश्याला..?"
" अहो , लग्नाची बोलणी करायला.."
" कोणाच्या लग्नाची बोलणी .. ?
"अहो, कोणाच्या काय .. सोनाली व आकाशरावांच्या लग्नाची . तुम्ही बोलला त्याप्रमाणे सोनालीने चांगले दहा किलो वजन वाढवले बरं का ... दोघांचा जोडा छान शोभून दिसेल ... "
" आकाशचं लग्न ठरलं . हे काय पत्रिकाच वाटते आहे.. ही घ्या पत्रिका.." जोशीकाकूनी घाई घाईत पिशवीतून पत्रिका काढली व शुभांगीताईच्या हातात ठेवली व घाईत निघून गेल्या.
" अहो पण.." तोंडातले शब्द तोंडातच राहिले व जोशी काकूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शुभांगीताई एकटक पाहत उभ्या राहिल्या.
" आकाशचं लग्न ठरलं . हे काय पत्रिकाच वाटते आहे.. ही घ्या पत्रिका.." जोशीकाकूनी घाई घाईत पिशवीतून पत्रिका काढली व शुभांगीताईच्या हातात ठेवली व घाईत निघून गेल्या.
" अहो पण.." तोंडातले शब्द तोंडातच राहिले व जोशी काकूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शुभांगीताई एकटक पाहत उभ्या राहिल्या.
मागच्या महिन्यापासून आकाशरावाना आपला जावई मानणाऱ्या शुभांगीताईचा हिरमोड झाला.
सोनालीच्या वजन वाढवायला केलेल्या आपल्या हेकेखोर वृतीची आता त्यांना लाज वाटत होती. आता घरी सर्वांना काय सांगणार याचा विचार करत होत्या, एवढ्यात सोनाली कॉलेज मधून घरी आली," आई , आमच्या कॉलेजमधून ब्युटी स्पर्धेसाठी मला नॉमिनेशन मिळणार होतं पण ...."
" पण काय .. "
" अगं त्या कुठल्या आकाशसाठी माझं एवढं वजन वाढवून ठेवलंस .. नाहीतर मी नक्की भाग घेतला असता .. "
"चल आता तयारीला लाग, ही स्पर्धा जिंकायची आहे ना.." सोनालीच्या पाठीवर थाप देत शुभांगीताई बोलल्या
" आई पण आकाशचं काय..??"सोनालीने नाराजीने विचारले.
" माझ्यासाठी तुझी ईच्छा महत्वाची, असे किती स्थळ येतील व जातील आपण आपल्याला नाही बदलायचे.."
आईच हे बोलणं ऐकून सोनाली चाट पडली . काल पर्यंत श्रीमंत स्थळाच्या पाठीशी धावणारी आपली आई आज हे काय भलतंच बोलतंय याचे सोनालीला नवल वाटले . उशिरा का होईना आईच्या डोक्यात प्रकाश पडला हे पाहून सोनाली सुखावून गेली .
शुभांगीताईने आपली चूक मनोमन मान्य केली व वजन कमी करण्यासाठी तयारीला लागल्या.
सोनालीचे वजन वाढलेले होते आणि तिला आपल्या शरीराबद्दल आत्मविश्वास नव्हता.तिने ब्यूटी स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु तिचे वजन तिला या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल उचलण्यापासून रोखत होते.
सोनालीने ठरवले की ती वजन कमी करणार आणि आपले स्वप्न पूर्ण करणार.
तिने पोषणतज्ञाच्या मदतीने एक संतुलित आहार योजना तयार केली.
सोनालीने नियमित व्यायाम सुरू केला, ज्यामध्ये कार्डिओ, योगा, आणि वजन उचलण्याचा समावेश होता.
तिने आपला आहार नियंत्रित केला, जंक फूड टाळले, आणि पौष्टिक आहार घेतला.
सोनालीने आपल्या मानसिक स्थितीवर देखील काम केले. तिने ध्यान, योगा आणि सकारात्मक विचारांचा अभ्यास केला.तीने आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वयंप्रेरणादायी पुस्तकं वाचली आणि मोटिवेशनल स्पीच ऐकली.
सोनालीला प्रवासात अनेक अडचणी आल्या, जसे की वजन कमी करण्याची स्लो प्रगती, थकवा, आणि कधी कधी निराशा पण तिच्या संकल्पनेने आणि दृढ निश्चयाने तीने या अडचणींवर मात केली.
वजन कमी झाल्यावर तिने ब्यूटी स्पर्धेसाठी तयारी सुरू केली. तिने कॅटवॉक, पोझिंग, आणि प्रश्नोत्तरे यावर काम केले. तिने सौंदर्य, त्वचा, केस, आणि फॅशन सल्लागारांच्या मदतीने स्वतःला तयार केले.
कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत सोनालीने आपली मेहनत आणि तयारी दाखवली.
तिच्या आत्मविश्वासाने, आत्मप्रेरणेने, आणि सौंदर्याने तिने परीक्षकांना प्रभावित केले.तिने स्पर्धेत पहिला नंबर मिळवला आणि तिचे स्वप्न पूर्ण केले.
सोनालीच्या हातात असलेली ट्रॉफी व डोक्यावर असलेला मुकुट पाहून शुभांगीताईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मनात विचार आला.
'एका श्रीमंत मुलाच्या स्थळासाठी मी माझ्या मुलीच्या आनंदाचा , तिच्या हुषारीचा बळी द्यायला निघाले होते.'
वजन वाढवणे किंवा कमी करणे सोपे असते. आपण दृढ निश्चय केला तर सगळेच शक्य असते पण आहे त्या वजनात स्वतःला सांभाळणे जास्त महत्वाचे असते. कोणासाठी स्वतःचं व्यक्तिमत्त्व बदलण्यापेक्षा आपण आहोत त्या परिस्थितीत समोरच्याने आपल्याला व आपण त्यांना स्वीकारणे गरजेचे असते.
'एका श्रीमंत मुलाच्या स्थळासाठी मी माझ्या मुलीच्या आनंदाचा , तिच्या हुषारीचा बळी द्यायला निघाले होते.'
वजन वाढवणे किंवा कमी करणे सोपे असते. आपण दृढ निश्चय केला तर सगळेच शक्य असते पण आहे त्या वजनात स्वतःला सांभाळणे जास्त महत्वाचे असते. कोणासाठी स्वतःचं व्यक्तिमत्त्व बदलण्यापेक्षा आपण आहोत त्या परिस्थितीत समोरच्याने आपल्याला व आपण त्यांना स्वीकारणे गरजेचे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment