स्पर्श एक भावना
"आई , हे बघ मी आजीसाठी ग्रीटिंग बनवलं."
छोटीशी सई कुतूहलाने नेहाला दाखवत होती.
"अरे बापरे !आईचा परवा वाढदिवस , मी कशी विसरले.. आईसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला हवं, आता ऑर्डर टाकली तर उद्या रात्री पर्यंत नक्कीच येईल".
असा विचार करत नेहाने मोबाईल हातात घेतला. शॉपिंगॲप ओपन केले पण नक्की काय घ्यायचे सुचत नव्हते.
आई सध्या बाहेर जातच नाही म्हणून तिच्या कितीतरी वस्तू, साड्या अशाच पडून होत्या. मागच्या वर्षी गिफ्ट केलेली साडी अजून तशीच आहे ,घडी पण मोडली नाही.
" आई, आजीसाठी ऑर्डर करतेस? "
" हो बाळा, पण सुचतच नाही काय करू..तूच सांग ना काय गिफ्ट देऊ आजीला??"
" आजीकडे तर भरपूर वस्तू आहेत , काहीच ऑर्डर करू नको पण काल आजी बोलत होती तुझ्या आईचा वेळ हेच आमचं खूप मोठं गिफ्ट आहे."
सईच बोलणं ऐकून नेहा लज्जित झाली.
नेहाचं लग्न झाल्यापासून तिचे आई बाबा दोघेच राहत होते. या दोन वर्षात दोघेही खूप थकले होते. बँकेची, बाजाराची कामं नेहाच करायची.
कुठल्याही वस्तूची कधी कमी पडू दिली नाही .
या घरची , त्या घरची कामं करता तिच्याकडे फक्त वेळ नव्हता त्यांना द्यायला . हल्ली तर आई बाबांची डिलिव्हरी बॉयच झाली होती.
नेहाने मनोमन ठरवलं परवाचा दिवस फक्त आईसाठी.
सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामं आटोपली व सईला घेऊन आई कडे गेली.
बेल वाजवली तसा आईने दरवाजा उघडला
" हॅपी बर्थडे आई"
असं बोलत नेहानी आईच्या पायाला स्पर्श केला.
आईच्या थरथरणाऱ्या पायात स्थिरता आली.
आईचे आशिर्वादाचे शब्द कानावर आले पण पायाचा स्पर्श खूप काही बोलून गेला.
आज आई - बाबांच्या स्पर्शातून नेहाला नव्याने भेटतोय असा भास होत होता.
आईचा हात हातात घेतला तसा कापणाऱ्या हातातून प्रेमळ ऊब जाणवली. मशीनरुपी आपल्या या देहाला याचीच गरज होती , याची जाणीव नेहाला झाली.
मुलीच्या हाताचा स्पर्श आईला एका देवदुता सारखा वाटला . कापनाऱ्या देहात अदभुत शक्ति आल्याचा भास झाला.
आज आई - बाबा व नेहाचा स्पर्शानेच संवाद चालू होता. अनोखी ऊर्जा तिघांना मिळाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment