मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

तू लढ, मी तुझ्या सोबत आहे..

 दूरदर्शनवरील बातम्या पाहणारा रवी झटकन उठला, अंगात कपडे चढवले व बायकोला म्हणाला," नयना, मला आत्ताच निघावं लागेल..."

"अहो ,पण तुम्ही कसे जाणार, तुमच्या अंगात तर ताप आहे..."
" मी औषध घेतलं आहे, बरं वाटेल मला. अगं त्या मंदिरात दोन गुरुजी अडकून पडले आहेत.मला जावं लागेल.. पावसाचा जोर वाढतच आहे . पाणी मंदिरात प्रवेश करण्या अगोदर मला तिथे पोहचलचं पाहिजे.. चल मी येतो.. तुझी व मुलांची काळजी घे..माझी काळजी करू नको .."
नयनाच्या नवऱ्याने ,रवीने नयनाच्या पाठीवर हळूच थाप मारली तशी नयनाने रवीचा हात हातात घेऊन स्पर्शाने सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका मी घेईन घराची काळजी.

लग्ना अगोदरच रवीने त्याच्या कामाबद्दल सगळी कल्पना दिली होती. तू एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बायको आहेस तुला माझ्यापाठीशी नाही तर माझ्यासोबत तुला रहायचं आहे. त्या वेळी नयनाला रवीचा खूप अभिमान वाटला होता.
लग्नाअगोदरच्या घाबरट नयनाला लग्नानंतर जणू नवऱ्यासोबत लढण्याचं बळच आलं होतं .
प्रत्येक वेळी त्याला साथ देताना त्याच्या तोंडून चित्त थरारक प्रसंग ऐकताना अंगावर मूठभर मांस चढायचं. आपला नवरा शुर ,वीर  व धाडसी आहे याचा तिला खूप अभिमान होता.

पण आजची गोष्टच वेगळी होती, रवी एका गंभीर आजारातून नुकताच बाहेर आला होता. डाक्टरनी त्याला सक्तीचा आराम सांगितला होता. या दोन महिन्याच्या  काळात आपल्या नवऱ्याला शरीराने व मनाने उभारी देण्याचे खूप मोठे काम नयना करत होती.  आधाराशिवाय तो धड उभाही राहू शकत नव्हता.आपण परत कधी ऑफिसला जाऊ शकतो की नाही याची खात्री त्याला वाटतं नव्हती.  प्रत्येक वेळी तिच्या बोलण्यातून वागण्यातून ती रवीला धीर देत होती . यातून तुम्ही बाहेर येणार याचा विश्वास ती देत होती. तिलाही मनापासून वाटत होतं आपल्या नवऱ्याने यातून बाहेर आलचं पाहिजे, आपण त्याचा आत्मविश्वास परत आणू व लढण्याचे बळ देऊ.

आज  रविचा आत्मविश्वास परत मिळवण्याचा ती वेळ व क्षण आला होता. नयनाने हृदयावर दगड ठेवून रवीला निरोप दिला व पावसाकडे एकटक बघत राहिली..
" हे पावसा ,आज माझी खऱ्या अर्थाने परीक्षा चालू झाली आहे . माझ्या आत्मविश्वास गमावलेल्या शुर- विर -धाडसी नवऱ्याची साथ  मला द्याची आहे. त्याला परत एकदा लढण्याचे बळ द्यायचे आहे . इतके दिवस मी तुला काहीच मागितले नाही पण आज माझं ऐक..माझा नवरा त्या मंदिरात अडकलेल्या गुरुजींना सुखरूप बाहेर काढे पर्यंत तू थोडा विसावा घे. तुला तुझं रुद्र रूप दाखवायचं आहे याची मला कल्पना आहे पण माझ्या नवऱ्याला त्याची मोहीम फत्ते करून येऊ दे. आज फक्त त्या दोन गुरुजींचे जीव तुला वाचवायचे नाही तर माझ्या नवऱ्याचा प्राण म्हणजे त्याचा आत्मविश्वास परत आणायचां आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या बायकोला त्याच्या सोबत लढण्याचे बळ दे. दोन महिने अंथरुणाला खिळून असलेल्या माझ्या नवऱ्याला लढण्याचे बळ दे.."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template