"आईची सेवा कर म्हणजे मेवा मिळेल." आजारी बहिणीला बघायला आलेल्या मावशीने सानुला टोचून बोलले , सानुणे दुर्लक्ष केले पण आईला बहिणीचा प्रचंड राग आला. तिखट शब्दात बहिणीची कानउघाडणी केली .कोणाला काहीच न बोलता मावशी निघून गेली. सानुला आज आईचा खूप अभिमान वाटला व दोन वर्षापूर्वीचा काळ आठवला.
आई- बाबाना आधाराची गरज होती तेंव्हा सानुने हट्टाने त्यांना आपल्या जवळ आणून ठेवले होते.
त्याही वेळी बरेच वेळा तिला ऐकायला मिळाले होते," आई - बाबा बद्दल काही प्रेम नाही, तिला त्यांचा पैसा हवा आहे म्हणून जवळ ठेवून घेतले आहे. "
लोकं काय दोन्ही बाजूने बोलतील, आज आपण त्यांची काळजी घेतली तरी बोलतील नाही घेतली तरी बोलतील म्हणून लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवून साणूने आपले काम चालू ठेवले.
लोकांचं बोलणं ऐकून आई बाबांना असं वाटतं होतं की, आमच्या नंतर आमची संपत्ती, पैसा अडका आपल्या एकुलत्या एका मुलीला मिळणार आहे तर तिने आपली सेवा केलीच पाहिजे. आम्ही काही फुकट खात नाही आमचा पैसा देतोच ना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment