मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

भाग्यवान

 सकाळी साफ-सफाई केली त्यामुळे  स्वयंपाकाला  उशीर झाला . उन्हाच्या वेळी गॅस समोर उभं  राहून काम करणे म्हणजे महादिव्य . गृहिणी म्हणजे एकही  दिवसाची सुट्टी नाही सकाळ -दुपार -संध्याकाळ नुसतं काम अन् कामचंं चालू आहे. 

"वैताग आला या गृहिणीपदाचा",
असं  म्हणत पंखा  लावून खिडकीबाहेर डोकावले .

    बाहेर एक पन्नास -साठ  वर्षाची बाई टोपलीत भाजी घेऊन विकत होती . मला खूप वाईट वाटलं , बिचारी एवढ्या उन्हात बसली आहे . मी घरी बसून काम करते तरी एवढी वैतागली आहे.
देवाचे मनोमन आभार मानले, खरचं खूप भाग्यवान आहे मी असा विचार करत  तिला बिचारीला काय  वाटतं  असेल असा विचार करत तिच्या मनात डोकावले  तर ती विचार करत होती ,
"मी किती भाग्यवान आहे मला आज  झाडाजवळची  जागा मिळाली म्हणून थोडी सावली तरी आहे . हे बिचारे काका  कलिंगडाचे  ओझे सायकलवर घेऊन उन्हातानात इकडे तिकडे फिरत आहेत " .
माझी नजर त्या काकांकडे गेली तर ते काका खरंच भलं मोठं  ओझं  घेऊन घाम पुसत निघाले होते . बाजूलाच रस्त्याचं  काम चालू होतं म्हणून  सायकल थांबवली व  काका  विचार करू लागले  ..
"माझं  काम किती छान आहे निदान थोडा वेळ सायकल थांबवून मी सावलीला शांतपणे बसू तरी शकतो हे बिचारे मजूर उन्हात तापलेल्या  दगडात  किती काम करत आहेत " . 

माझी नजर त्या काम करणाऱ्या लोकांकडे गेली खरंच ते खूप कष्टाचे काम भर उन्हात करत होते . त्यांच्याच  बाजूला काही लोक हातात पेपर घेऊन गर्दी करून उभे होते व पोलीस त्यांचावर लाठीवार  करत होते .  सर्वांची नजर पोलिसांपासून धावणाऱ्या  लोकांकडे  होती .   काम करणारे मजूर   या  वेळी काय  विचार करत असतील  म्हणून त्यांच्या मनात डोकावले तर ते देवाचे आभार मानत  होते ,

"देवा मला हे काम मिळवून दिलस म्हणून किती छान झालं निदान मी माझ्या कुटुंबाला दोन वेळचं  जेवण तरी देऊ शकतो  नाहीतर  मलाही  या लोकांसारखं चोरी करतो म्हणून  मार खावा लागला असता " .
त्याचं वेळी आवाज करणारी  रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन जात होती . मार खाणारे ते लोक मनोमन देवाचे आभार मानत होते,
" देवा, आम्हला सुदृढ व निरोगी शरीर दिलं आहे म्हणून आम्ही धावू तरी शकतो."

  ही  माणसांची विचार करण्याची  साखळी मला तळपत्या उन्हात चैत्रातल्या फुलणाऱ्या मोगऱ्या प्रमाणे वाटली
  आपणही असाच विचार करू व आपल्याही मनात अशीच समाधानाची चैत्रपालवी सदैव बहरत ठेवू..

#चैत्रपालवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template