"ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जिना
फूलो मे कलियो मे, सपानो की गलियो मेतेरे बिना कुछ कही ना.."
किशोरकुमारच्या आवाजातील गाणे ऐकताना लीलाताईचे डोळे भरून आले.आपल्या मनातल्या गाभाऱ्यातील शब्द कोणीतरी चोरून नेले असा भास झाला.
एवढ्यात गुणगुणन्याचा आवाज आला
"पल पल दिलं के पास तुम रेहती हो, जीवन मिठी प्यास ये कहती हो.."
यशवंतरावांच्या आवाज ऐकताच लीलाताई डोळे पुसत ताडकन उभ्या राहिल्या, धावत जाऊन मिठी मारत बोलल्या," हे बोलणं खूप सोपं असतं हो, चित्रपटात हिरो -हिरोईन असे बोलतात, त्यांना शोभून दिसतात हे शब्द . असं एकमेकांना सोडून जगणं कठीण नाही ,मी तर म्हणते अशक्य आहे."
विषय बदलण्याच्या स्वरात यशवंतराव बोलले," बोलतच बसणार आहेस का.. चल छान गरम गरम चहा कर माझ्यासाठी, किती दिवसात तुझ्या हातचा चहा प्यायलो नाही".
" हो, दोन मिनिटात करून आणते.." धडपडतच लीलाताई स्वयंपाक घरात गेल्या.
मागोमाग यशवंतराव गेलेच नेहमीप्रमाणे.
"आतमधले नवीन मग काढतो , तुला आवडतात ना ते .. चिअर्स करत पिऊ.."
लीलाताई गालातल्या गालात हसत बोलल्या ," काहीतरीच तुमचं.."
" मी चहा कडे बघतो . तू जा, छान साडी नेसून ये ... दोघं मिळून कँडल लाईट चहा पिऊ.."
" अहो या वयात कसले केंडल लाईट ..तुमचं आपलं काहीतरीच.." असं म्हणतं साडी बदलायला गेल्यापण..
" अहो..भाजेल तुम्हाला , द्या मी गाळते चहा.." हातातली गाळणी घेत लीलाताई बोलल्या.
लीलाताई पाठमोऱ्या झाल्या तसे यशवंतराव खिशातून मोगऱ्याचा गजरा काढला व लीलाताईच्या केसात माळला.. " आता माझी खरी लैला दिसतेस.." असं म्हणतं गजऱ्याचा सुगंध घेत लीलाताईचा हात हातात घेत काहीतरी मनातल्या मनात पुट पुटत होते.
" अहो, कोणीतरी येईल ना..दरवाजा उघडा आहे. थांबा मी बंद करते." असं म्हणतं बाहेरचा दरवाजा बंद केला.
हॉल मध्ये बसून मंद प्रकाशात दोघांनी चहा घेतला. भरपूर गप्पा झाल्या. लीलाताईना काय सांगू न काय नको असं झालं होतं. यशवंतराव शांतपणे ऐकून घेत होते. कानावर शब्द पडत होते पण लिलाताईचा हसरा चेहरा डोळ्यात साठवून ठेवत होते. हाच चेहरा जणू घेऊन जाणार होते..
आयुष्यभर प्रेमाने साथ दिलेल्या आपल्या साथीदाराची प्रेमानें पाठवणी करतात की, अजून काय...पाहूया पुढच्या भागात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment