1
ही गोष्ट आहे प्रिया व श्रेयस या दोन हुषार पण वाट चुकलेल्या जोडप्यांची.
लग्न झाले , नव्याचे नऊ दिवस संपले व दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टवरून कुरबुरी चालू झाल्या. छोट्या वादाच रूपांतर भांडणात झाले. भांडणं इतकी विकोपाला गेली की, दोघांनी काडीमोड करायचे ठरवले.
घरातल्या लोकांनी खूप समजावले पण दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते.
दोघांनी कोर्टाची पायरी चढली, दोघांचे वकील हुषार व चाणाक्ष होते. वकिलांनी आपली बाजू ताणून धरली होती . या काळात प्रिया व श्रेयसचा वेळ , पैसा व मानसिक तणाव वाढत होता. वकिलाची फीस भरून दोघांचे खिसे रिकामे झाले.
शेवटी घरातल्या लोकांनी पटवून दिले की, दोन मांजराच्या भांडणात बोक्याचा लाभ कसा होतो.
2.
आमच्या शेजारी राहणाऱ्या चिनू व मिनुची ही गोष्ट आहे.
चिनूच्या आईने चिनूला स्वतःचे काम स्वतः करायचे शिवाय घरकामात मदत करायची अशी सवय लावली होती.चिनूला मिनुचा खूप हेवा वाटत असे कारण मिनुची आई मिनुचे खूप लाड करत असे तोंडातून काढलेली वस्तू त्याच्या हाती असायची. चिनूला बरेच वेळा असे वाटायचे की, मलाही अशीच आई हवी होती...
कोरोणा काळात मिनुचे आई बाबा दवाखान्यात व हा आजोबासोबत घरी होता. काहीच करता येत नव्हते त्यामुळे उपासमार सहन करावा लागला.
इकडे चिनूच्या आईने कामाची सवय लावली होती त्यामुळे आई बाबा घरी नसतानाही हा आजीला नवीन पदार्थ खायला घालू लागला.
वेळ कशी येईल सांगू शकत नाही त्यामुळे पिल्लांना स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे को
3.
उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे कंपनी शुभाकडे जमली होती.आज शुभाने मुलांसाठी आईस्क्रीमचा बेत केला होता. सर्वांच्या समक्ष आइस्क्रीमचा ट्रे फ्रिजमध्ये ठेवला गेला.
संध्याकाळ पर्यंत कोणीही फ्रिज उघडणार नाही असे ठरले. सर्व मुले खेळात रमून गेली पण चिनूला आइस्क्रीमचा मोह आवरला नाही.संध्याकाळपर्यंत एक आईस्क्रीम गायब झाले.
आईस्क्रीमची चोरी कोणीच कबूल करत नव्हते म्हणून शुभाने मुलांना एक मंत्र म्हणायला सांगितला," अल्ला मंतर कोला मंतर मी आइस्क्रीम खाल्लं तर माझं नाक गळो.."
सर्वांनी मंत्र म्हटला , चिनूने घाबरत घाबरत मंत्र पुटपुटला. रातभर नाक पकडून बसलेला पाहून सर्वजण हसायला लागला.
चिनूने रडत रडत चूक कबूल केली.
माणसाने मोह आवरणे आवश्यक आहे. लहान असो किंवा मोठी चोरी ती चोरी असते हे मुलांना समजले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment