" आजी नमस्कार करतो,मला नोकरी लागली देशपांडे ग्रुप मध्ये ....खूप चांगलं पॅकेज आहे. हे घे पेढे.." असं म्हणत राहुलने आजीच्या हातावर पेढा दिला व पाया पडण्यासाठी खाली वाकला" यशस्वी हो, खूप मेहनत कर ." असं म्हणत आजीने राहुलच्या डोक्यावर हात ठेवला . खुर्चीत बसत - बसत आजी गाणं पुटपुटत होती ,'खेळ कुणाला दैवाचा कळला..'
" अगं आजी, मी तुला इतकी आनंदाची बातमी सांगितली आणि तू हे काय गाणं गाते..तुला आनंद झाला नाही का?"
" अरे बाळा , देवाचा खेळ आहे हा कोणाला कुठे ठेवायचं त्याला बरोबर माहीत आहे , आपण त्याच्या हातचे खेळणे आहोत .."
" म्हणजे काय ग आजी..? मला कळलं नाही.."
" आज ज्या देशपांडेकडे तुला नोकरी लागली आहे तो आपल्याकडे कारकुनाचे काम करत होता."
" काय..? विद्याधर देशपांडे आपल्याकडे कामाला होते..!!"
" तुझ्या आजोबांनी मुलाप्रमाणे त्याला व्यवसायातल्या लहान सहान गोष्टी शिकवल्या . तुझे बाबा आणि तो एकाच वयाचे, दोघे व्यवसायात एकदाच उतरले पण त्याने मनापासून कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तुझ्या बाबांनी मात्र त्याच्यावर नेहमी मालकाचा अधिकार दाखवला , काम शिकण्यामध्ये रुची दाखवली नाही. आजोबांच्या आकस्मात निधनानंतर सर्व जबाबदारी तुझ्या बाबांवर आली. तुझ्या बाबांनी कंपनीचा भार सांभाळता आला नाही. कर्जाचा डोंगर झाला व ही कंपनी आपल्याला विकावी लागली, स्वतःच्या कर्तबगारीने विद्याधरनी ही कंपनी भागीदारीत घेतली, त्यावेळी तुझ्या बापाचा मीपणा नडला व हातची कंपनी सोडून बसला. आज आपल्याच कंपनीत तू नोकरी करणार म्हणून देवाच्या खेळाची कमाल वाटली."
" म्हणजे ही आपली कंपनी होती..."
राहुलने आश्चर्याने विचारले.
" हो तर, तुझ्या आजोबांनी रक्ताचं पाणी करून केलेली ही कंपनी आहे."
आजी आभिमनाने सांगत होत्या
" आजी तू काहीच काळजी करू नको, मी भरपूर मेहनत करेन , बाबांनी जी चूक केली ती मी करणार नाही. मी या कंपनीत काम शिकून ,मी माझी स्वतःची कंपनी चालू करेन.."
राहुलने आजीचा आशिर्वाद घेतला व मनापासून कामाला लागला.
साध्या कारकुनापासून चालू केलेला राहुलचा प्रवास आज एका नामंकित कंपनीच्या मालकपर्यंत येऊन पोहोचला आहे.
माणसाची कष्ट करण्याची तयारी असेल तर देवाला दैवाचा खेळ खेळावा लागतो. कधी काय होईल सांगता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment