मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

माझ्यातली मी..

माझ्यातली मी

 " काहीतरीच काय.. असं कुठे असतं का..आपणच आपली फेवरेट कसे असू शकतो..ती करीना कपूर म्हणते म्हणून आपणही म्हणायचं का..छे ..मला काही पटत नाही हे." नकार घंटा वाजवत अंजू आपल्या डॉक्टर मैत्रिणीला बोलत होती.
"एक काम कर फक्त एक आठवडा तू हे करून बघ , आज मी तुला कसलंच औषध देत नाही . आपण सात दिवसासाठी हा प्रयोग करू तू पुढच्या मंगळवारी माझ्याकडे ये मग आपण बोलू." डॉक्टर मीरा परत भेटू अशी खूण करत अंजूला  या विषयावर काहीच न बोलता जाण्याचा इशारा केला.
" ही मीरा पण ना .. सगळं कोड्यात बोलते ,स्पष्ट काही सांगतच नाही. करा म्हणजे करावच लागेल.पर्यायच नाही." मनातल्या मनात बोलत अंजू क्लिनिक बाहेर पडली.
वयाच्या पन्नशीला आल्यावर अंजूला  भलताच त्रास चालू झाला होता. सतत आपण काहीतरी चुकतोय, आपण कुठेतरी हरवणार अशी भीती वाटत होती. तीस लोकांचा एकटीने स्वयंपाक केलेल्या अंजूला तीन माणसांचा स्वयंपाक करायला भीती वाटत होती. हा आजार आहे की, आपला स्वभाव हेच कळत नव्हतं म्हणून मैत्रिणीला सल्ला विचारायला आज आली  होती.
रात्री झोपताना मीराने सांगितलेला उपचार करायचा आहे असा विचार करून  आपल्याला आवडणाऱ्या पण वेळ मिळत नाही म्हणून किंवा आपल्या वयाला शोभत नाहीत अश्या गोष्टींची यादी तयार केली. मनात बऱ्याच गोष्टी ठरवत झोपी गेली.
सकाळी लवकर उठून तिला आवडणारा गुलाबी टी शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पँट घालून मॉर्निग वॉकला गेली. चालताना बाजूची मुलगी किती बारीक आहे ना , मी किती जाडी वाटते तिच्या समोर असा विचारच केला नाही. या सर्वांमध्ये मीच किती छान दिसते ,मला तर आज "माझ्यातली मी , मलाच खूप आवडते"  असं मनोमन बोलत एक तासाचा वॉक करत, मागून टीशर्ट न खेचता प्रसन्न मनाने घरी पोहचली.
घरी येताच त्या यू ट्यूब वरच्या मधुरा पेक्षा पण छान नाश्ता आज मी बनवणार , माझी नवीन रेसिपी चांगलीच होणार असा विचार करत झक्कास नाश्ता  तर बनवला पण सुग्रास जेवण पण बारा पर्यंत बनवून तयार ठेवलं.
ही किती छान, ती किती छान असं न म्हणता अंजू या सात दिवसात फक्त मीच किती छान, माझ्यातली मी जास्तीत जास्त छान करायचा प्रयत्न करत होती.
एखादी गोष्ट जमत नसेल तर यू ट्यूब वरती बघून त्यात आपली स्वतः ची कलाकुसर टाकून नवीन व छान गोष्टी तयार करू लागली. अंजू मधला हा फरक घरातल्याच नाही तर बाहेरच्या लोकांना लक्षात आला.
" काय मम्मा ...हल्ली कोणाला फॉलो करतेस..मस्त हिरोईन दिसतेस , सांग ना कोण आहे तुझी फेवरेट..?" उत्सुकतेने अंजुची मुलगी अंजूला विचारत होती.
" मैं अपणी फेवरेट हू" हसत हसत मुलीच्या गालावर टिचकी देत अंजू बोलली.
आज मंगळवार मीराला भेटायला जायचं म्हणून छान स्लिव लेस कुर्ता घालून हलकासा मेकअप करून मीराला विचारलं.." मे आय कम इन मॅडम"
" अरे, ये ना यार..काय म्हणतो आमचा पेशंट.?."मीरा अंजुच्या बदललेल्या लूक कडे बघत मुद्दामच प्रश्न विचारला.
" यार तू तर औषध न देताच मला बरं केलंस.. ग्रेट आहे तू.."मीराला मिठी मारत अंजू बोलली.
अगं मी काही ग्रेट नाही. तूच ग्रेट होती पण तुझ्या मधला तुला तू विसरून गेली होती. मी फक्त तुला  त्याची जाणीव करून दिली व तूच तुझी फेवरेट बनून गेली..
दोघी मैत्रीणी खळखळून हसत एकमेकींना मिठी मारल्या.


1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template