मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

मराठी माझी माय

 "मराठी म्हणजे गोडवा

जिथे शब्दात असतो गारवा
मराठी म्हणजे संस्कार
जिथे शब्दात असतो अलंकार
मराठी म्हणजे आपुलकी
जिथे नसते कसलीच बांधिलकी
मराठी म्हणजे कामधेनू गाय
जी आहे सर्व भाषेची माय"
कृत्तिका कुलकर्णी

"माझिया मराठीची बोलू किती
कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके." 
ज्ञानेश्वर  महाराजांनी सांगितल्या प्रमाणे माझी मराठी भाषा खूप महान आहे . या मराठी भाषेची थोरवी मी काय गाणार ती तर आपली आई आहे . आई आपल्या मुलाला सतत प्रेमाने , मायेने गोंजारत असते . अशा माझ्या आईला प्रथम वंदन करते .
आपल्या आईचे महत्व ती दूर  गेल्याशिवाय कळत हेच खरं आहे . याचा अनुभव आम्ही मॉरिशस ला गेल्यानंतर घेतला . आम्ही आपापसात मराठीत बोलत असू त्यावेळी आमच्या आजूबाजूला असणारी तिथली  मराठी लोकं आमच्यकडे  आकर्षित  व्हायची व आपुलकीने  तोडक्या मोडक्या मराठीत आमच्याशी संवाद साधायची . त्या वेळी त्यांच्या डोळ्यात मराठी भाषेबद्दलचा आदर दिसून आला. भाषा हि फक्त संवाद साधण्याचे माध्यम नसून तो एक प्रेमाने बांधलेला धागा असतो याची प्रचिती त्या वेळी आली .
मराठी हि एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे,आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे,  या आपल्या भाषेला जगवायची जबाबदारी आता आपली आहे . आपल्या या मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याची गरज भासते हि खूप मोठी शोकांतिका आहे . आपल्या मातृ भाषेचा आदर आपण केला तरच समोरची व्यक्ती करेल म्हणून आपणच आपल्या आई ला जवळ करण्याची वेळ आली आहे ती जेव्हडी कठोर ,कडक व शिस्त बद्ध आहे तेव्हडी ती प्रेमळ रसाळ व गोड आहे .


इंग्रजी शाळेत मुलांना शिकवण गैर नाही ती काळाची गरज आहे हे जरी खरं असलं तरी आपल्या मराठी भाषेची गोडी निर्माण करणं हि मुलांची व आपली गरज असणं गरजेचं आहे . मराठी अवघड आहे म्हणून तिचा बाऊ करत बसण्यापेक्षा मुलांना त्यात गोडी निर्माण झाली पाहिजे. कितीतरी मराठी पालक , विद्यार्थी आहेत त्याना मराठीतले अंक कळत नाहीत , मराठीत वेळ सांगता येत नाही . हि गोष्ट प्रतिष्टेची समजली जाते पण खऱ्या अर्थाने हि लाजिरवाणी गोष्ट आहे .
   मराठी भाषेतील साहित्य कविता , नाटके , प्रवास वर्णने, निबंध , लघुनिबंध ह्यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो. मराठी साहित्यातील साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे. आपल्या महाराष्ट्राला बऱ्याच थोर संतांचा ठेवा लाभला आहे . संत ज्ञ्यानेश्वर ह्यांनी “ज्ञानेश्वरी” सारखा ग्रंथ लिहिला आहे. संत रामदासस्वामी ह्यांनी “मनाचे श्लोक” लिहिले आहे. ह्या दर्जेदार लिखाणाला न विसरता ह्याचे अध्ययन , पठन , चिंतन करायला हवे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे.
हे असे विषय फक्त लेखा पुरते , भाषण , निबंधापुरते  किंवा  एखाद्या विशिष्ट दिवसाला अनुसरून लिहायचे ,वाचायचे  व सोडून द्यायचे असं न करता आपण याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template