मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

छान म्हणून घेण्याची घातक सवय

 आज साहेबांच्या केबिन मध्ये जाण्याची सीमाची चौथी वेळ होती . सर्व कामं  बरोबर होती तरी काहीतरी कारण सांगून साहेब सीमाचं काम वाढवतच होते.

आज सीमाला मैत्रिणी सोबत बाहेर फिरायला जायचं होतं म्हणून स्वतःची सगळी कामं वेळेत केली पण सीमा कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही म्हणून  साहेब दुसऱ्यांची कामं सीमा कडून करून घेत होते.
साहेबांच्या या वागण्याची  तिला खूप चीड आली 
आज खूप दिवसानंतर मैत्रिणी सोबत बाहेर फिरायला जाणार होती पण कामाचा डोंगर पाहून  मैत्रिणी सोबत जायला   मिळणार नाही म्हणून वाईट वाटत होतं पण नेहमी प्रमाणेच याही वेळी शब्दांपेक्षा  डोळ्यातून अश्रूच आले .   
या वेळी तिला आठवण आली ती तिच्या मैत्रिणीची ,आणिताची किती वेळा बोलत होती ,'अगं  निदान  जिथे लोकांचं चुकतं  निदान तिथे तरी बोलत जा ,एवढा समजूतदारपणा बरा  नाही,  कधीतरी जहाल हो , लोकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी तरी , तुझ्यातला हा आवाज असा दाबशील  तर तो कधी बाहेर येणारच नाही. तुझ्या या स्वभावामुळे घुसमटून टाकतेस स्वतःला, स्तूतीला बळी पडू नको..बाहेर ये यातून ..

आज सीमाला जाणीव झाली कि तिचं  बोलणं किती खरं  होतं . ही घुसमट वेळोवेळी बाहेर आली असती तर आज मी कुठल्या कुठे पोहचली असते . असा विचार करून तिला तिच्या आयुष्यातले कितीतरी   प्रसंग  डोळ्यासमोर आले . 
रोज बसने प्रवास करताना  स्त्रियांसाठी जी  राखीव सीट असते त्यावर जर एखादा पुरुष बसला तरी त्याला उठवण्यासाठी कधी आवाज निघाला नाही , जाऊ दे  वीस मिनिटांचा प्रवास म्हणून उभी रहायची . रस्त्यावरच्या  रोडरोमियोचा त्रास नको म्हणून कधी मेकअप नाही केला कि कधी केस मोकळे  सोडले . त्याच वेळी बोलली असती , कानाखाली आवाज काढला असता तर स्वतःच देखणं  रूप पहायला  तिला हि नक्कीच आवडला असतं .  प्रत्येक वेळी समजूतदार बनली. आपल्या कडून आपण कधी चुकायच नाही , कोणाला बोलायची संधीच द्यायची नाही असा विचार करत मन मारत राहिली. ऑफिस मध्ये कितीतरी प्रमोशन तिच्या इतर सहकार्यांना मिळाले पण स्वतः  सगळी कामं  करून  मला का प्रमोशन   दिलं  नाही असा जाब कधी बॉसला विचारला नाही . त्यावेळी आवाज  निघाला असता तर आज कुठल्या कुठे पोहचली असती . तिच्या या मवाळ  स्वभावाचा  फायदा बाहेरच्या लोकांनीच  नव्हे तर  तिच्या नातेवाईकांनी , घरातल्या लोकांनी पण घेतला होता . 

मैत्रिणी सोबत पिकनिक  ठरली कि सासूबाई आजारी पडायच्या किंवा पाहुणे हजर रहायचे . अशा वेळी नवऱ्याने घर सांभाळायची जबादारी घेतली नाही किंवा  सीमाने सांगितले नाही कि , आज तुम्हाला घर सांभाळायचे आहे .  तिच्या या स्वभावामुळे सगळ्यांमध्ये तिची  खूप प्रशंसा व्हायची ,आदर्श गृहिणीचा सन्मान तिला मिळायचा त्यामुळे ती हि सुखवायची .नोकरी करून मी उत्तम घर सांभाळू शकते याचा तिला अभिमान वाटायचा . नोकरी , घर , पाहुणे ,येणार जाणार  यांचं करता करता खूप थकत होती . एका क्षणाला वाटत होतं कि मला हि थोडा बदल हवा आहे , आरामाची गरज आहे .  समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेते याची जाणीव झाली तरी तोंडातून आवाज निघालाच नाही .  असे कितीतरी प्रसंग होते कि तिची  ईच्छा  असतानाही  आतला आवाज बाहेर आलाच   नाही . जाऊ  दे म्हणून मन मारत जगली . 
 आज तिला जाणीव होत होती  कि आपल्यातला समजुतदार वृत्तीच आपल्या प्रगतीच्या व आनंदाच्या आड येत आहे.  सर्वांनी केलेल्या स्तुतीमुळे, दिलेल्या मोठेपणा मुळे   माझा आवज इतका दबला  गेला आहे कि माझी ईच्छा व गरज  असतानाही तो बाहेर येत नाही . 
स्वार्थासाठी मोठेपणा देणाऱ्या व सतत स्तुती करणाऱ्या लोकांविरुद्ध  लढण्यासाठी  मला  प्रत्येक वेळी वेगवेगळी शस्त्र काढावीच लागणार आहेत . माझा आवाज कधी शब्दातून ,कधी लेखणीतून तर कधी गोडी गुलाबीने बाहेर पडलाच पाहिजे असा  निश्चय करून नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी सीमा सज्ज झाली 
तिच्या  या एकंदर अनुभवावरून ती प्रत्येक स्त्रीला संदेश देते कि स्वतःमधला अती समजूतदार  स्वभाव कमी करा स्वतःला दाबून ठेऊ नका वेळोवेळी तो बाहेर काढा नाहीतर तो आवाज कधी दबला  जाईल  तो तुम्हालाही कळणार नाही .. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template