मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

अपेक्षेच्या सागरात वास्तवाचा बळी

 " डॉक्टर तुम्ही जी कारणं सांगीतली आहेत , त्यातलं कुठलच कारण मला लागू होत नाही. मी फास्ट फूड खात नाही, ठरलेल्या वेळात  जेवते, उशिरापर्यंत जागरण करत नाही .वेळेत झोपते व वेळेत उठते, स्मोक करत नाही, ड्रिंक करत नाही,

अगदी दोन तासा पूर्वी  बनवलेलं अन्न खाते, माझा आहार सकस असतो तरी मला कॅन्सर झाला...!!! मला असं काही होणं शक्यच नाही..."
सीमा डॉक्टरांना जणू जाबच विचारत होती.
" अगदी बरोबर आहे तुमचं पण तुम्ही सुशिक्षित आहात तुम्हाला वाचता येतं ना.."डॉक्टर रागातच बोलल्या.
"तुम्हाला हा आजार का झाला असावा याचे कारण मी आताच्या तुमच्या बोलण्याचे उदाहरण देऊन सांगते.
तुम्ही  आरोग्यास हितकारक गोष्टी करता व बरोबरच  शरीराकडून आरोग्यदायक शरीर लाभावे अशी अपेक्षा करता.  हे अपेक्षांचं ओझंच तुमच्या या आजाराचे कारण आहे.
तुम्ही स्त्रिया सतत अपेक्षांच्या ओझ्या खाली स्वतःला ठेवता  व असे परिणाम होतात. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्याचा अट्टाहास केला की, असे परिणाम दिसून येतात.आरोग्यासाठी शरीराचीच नव्हे तर मनाचीही काळजी घ्यावी लागते. मनाला झालेल्या जखमा शेवटी शरीरावरच दिसणार ना...

आता कसलाच ताण घेऊ नका. यातून तुम्ही लवकरच बाहेर या. तुम्ही नक्की बऱ्या व्हाल  व स्वतःकडे विशेष लक्ष द्या. या आता तुम्ही ..."
असं म्हणत डॉक्टरांनी सीमाला धीर देत बाहेर जाण्याची खूण केली.

"अपेक्षांचं ओझं" हा डॉक्टरांचा शब्द सीमाच्या कानात घुमत होता. हे कसलं ओझं असेल बरं असा विचार करत बागेतल्या बाकावर जावून बसली.
मी एक स्त्री आहे त्यात एक गृहिणी त्यामुळे अपेक्षा पूर्ण करणे हे तर माझे कर्तव्यच आहे.
कर्तव्य पूर्ण करण्याच्या  नादात मी स्वतःचा बळी घेणार का...?असा  विचार करत सिमाच्या अंगावर शहारा आला.
अपेक्षांचं हे ओझं आता मी काढून टाकणार असा विचार करत सीमा घरी आली.

सीमा आपल्या रिपोर्ट्स बद्दल घरी काहीच बोलली नाही.

" आई, मला वाटलं होतं आज तू माझ्यासाठी पनीरची भाजी करशील पण आज तर तू भेंडीच केली..." मुलाच्या या तावांतावांत बोलण्याचा व डॉक्टरांनी सांगितलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा ध्यास याचा कसा मेळ घालावा याचा विचार करत होती. अपेक्षांची पूर्तता करण्याचा अट्टाहास सोडून ताण कमी करण्यासाठी सीमा तयार झाली. मुलाच्या बोलण्याचा कुठलाच परिणाम स्वतःवर होवू दिला नाही.
घरातल्या व बाहेरच्या लोकांनी केलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करण्यासाठी केलेला अट्टाहास, कधी पूर्ण झाल्या नाही तर घेतलेला ताण ,आलेली निराशा याचे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
" माझा मुलगा कधी नव्हे तो तुमच्याकडे जेवायला आला पण सीमा त्याला जेवायला न वाढताच बाहेर निघून गेली. सगळा ताण तुझ्यावर पडतो त्यामुळे मला यावं असं वाटतं नाही माहेरी " असं जेंव्हा नणंदबाई बोलत होत्या , त्यावेळीं खूप वाइट वाटलं.
आपण कितीतरी वेळा आग्रहाने जेवायला वाढलो ते कधी बोलल्या नाहीत पण यावेळी मात्र
आपलं  महत्वाचं काम होतं त्यामूळे आपण थांबू शकलो नाही हे मात्र सर्वांना आवर्जून सांगत होत्या.
घरातल्या सर्वांसमोर सीमाने अपराध्याची भूमिका घेतली होती.


अश्या कितीतर प्रसंगाला  सीमा बरेच वेळा सामोरी गेली होती.
आपण कोणाच्याच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही याचा खूप मोठा ताण सीमाने घेतला होता. त्या दिवशी पासून सीमाने ठरवले की,
आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपण सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायच्याच . मी एक आई, बायको, बहिण, मुलगी, सून , भावजय,मैत्रीण असून मी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण करेन असं ठरवून त्याप्रमाणे वागणाऱ्या सीमा समोर  कॅन्सर रुपी वास्तव समोर येईल असं स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

महिलांनो कधीच अपेक्षांच्या बळी पडू नका .अपेक्षा या सागरा सारख्या अथांग आहेत त्या कधीच संपणार नाहीत. आलेला क्षण आनंदात जगा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template