मनस्पर्शी गोष्ट
आज सकाळी रेडिओवरती मनस्पर्शी हा कार्यक्रम ऐकत होती त्यात एक खूप छान गोष्ट सांगितली , तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे.
सकाळी आठ वाजून पाच मिनिटांच विमान पकडण्यासाठी डॉक्टर पाटणकर घाईघाईत मुंबई विमानतळावर पोहचले . आज पहाटे एक इमर्जन्सी आली त्यामुळे त्यांचं वेळेचं गणित चुकलं . आज विमान मिळेल कि नाही अशी भीती होती पण अस काही झालं नाही ते धावत धावत जाऊन निश्चित मनाने आपल्या जागेवर जाऊन बसले . आज दिल्लीला दुपारी त्यांचं खूप महत्वाचं व्याख्यान होतं व वेळेत पोहचणं गरजेचं होतं . विमानाने टेक ऑफ घेत आकाशात झेप घेतली तसं डॉक्टरांच्या डोक्यात पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन चालू होते एवढ्यात एक सूचना मिळाली कि खराब वातावरणामुळे हे विमान दिल्लीला जाऊ शकणार नाही मध्येच प्रवाशांना उतरावे लागणार आहे . हे ऐकताच डॉक्टरांचा पारा चढला , आपलं किती महत्वाचं काम आहे व वेळेत पोहचणं किती गरजेचं आहे ते त्यांना पटवून देत होते पण विमान व्यवस्थापकांनी आपण दिलगीर आहोत अस सांगून त्याना एका खाजगी गाडीची सोय करून दिली .
गाडीत बसताच आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचा पत्ता सांगितला व होईल तेवढ्या लवकर मला पोहचव असं ते सारखे त्याला सांगत होते . खराब वातावरणामुळे चालकालाही पुढचा रस्ता दिसत नव्हता इकडे डॉक्टरांचं सारखं लक्ष घडळ्याच्या काट्याकडे. थोड्यवेळातच चालकाच्या लक्षात आले कि आपण रस्ता चुकलो आहोत, त्यांनी घाबरत घाबरत हि गोष्ट डॉक्टरांना सांगितली पावसाचा जोर खूप वाढला आहे पुढे जाणं खूप धोक्याचं आहे तर आपण इथेच कुठेतरी आडोश्याला थांबू असं सुचवलं . वातावरणाचा अंदाज घेता पुढे जाणं खूप धोक्याचं आहे हे डॉक्टरांच्या पण लक्षात आलं .
एक छोटीशी झोपडी दिसली तशी गाडी थांबवली व झोपडीच्या दरवाजा वाजवला आतून एक वृद्ध महिला आली व तिने त्यांना आत येऊन शांत बसण्याचा हातांनीच इशारा केला तसे ते दोघे शांतपणे बसून राहिले. पंधरा वीस मिनिटानंतर त्या वृद्ध महिलेने सांगितले कि मी पूजा करताना कोणाशीही बोलत नाही म्हणून मी तुमच्याशी काही बोलली नाही पण थोड्या वेळातच त्या वृद्ध महिलेने चहा- नाश्त्याची व्यवस्था केली . समोरच एक आठ दहा वर्षाची मुलगी झोपली होती. हि कोण अशी चौकशी केली तेंव्हा त्या महिलेने सांगितले कि हिचे आई वडील एका अपघातात गेले व या तिच्या नातीला भयानक आजार झाला आहे . डॉक्टरांनी विचारलं कि मग तुम्ही डॉक्टरांकडे दाखवलं नाही का? तर त्या महिलेने सांगितले कि इथे खुप डॉक्टर झाले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही . माझ्या नातीला मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले आहे तिथे एक हुशार डॉक्टर आहेत त्यांचं नाव पाटणकर आहे व तेच माझ्या नातीला बरं करू शकतात पण तिकडे जाण्यासाठी माझ्याकडे एवढी शक्ती नाही व पैसे नाहीत म्हणून मी माझ्या देवाला प्रार्थना करते कि माझ्या नातीला बरं कर .
हे ऐकताच डॉक्टर स्तब्ध झाले ,सकाळपासूनच सर्व प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर आला. या वृद्ध स्त्रीच्या प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती होती कि देवाने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या . डॉक्टरांच्या रुपात देवांनी भेट दिली .
डॉक्टरांनी दोघीना मुंबईला आणलं त्या छोट्याश्या मुलीवर उपचार केले .थोड्याच दिवसात ती मुलगी ठणठणीत बरी झाली .
गोष्टीचं तात्पर्य हेच कि आपण देवाला कुठलीही गोष्ट मनापासून मागितली कि देव ती देतोच . प्रार्थनेत खूप मोठी शक्ती आहे. नेहमी सकारात्मक विचार करा कृती करा आपली मनोकामना निश्चित पूर्ण होईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment