मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

जीवघेणे क्षणिक सुख




 आटपाट नगर होते तिथे सीमा नावाची एक हुशार महिला रहात होती. गुडघेदुखी वरती तिने  एक छान रामबाण उपाय शोधून काढला. तो कोणता...पाहूया पुढच्या कथेत



" हॅलो सीमा , रमा बोलतेय..उद्या आम्ही सर्वजणी मिळून  खरेदीला जाणार आहोत.तुलापण यायचं आहे हो...काहीही कारण सांगू नको..."
" रमा, अगं माझा गुढघा खूप दुखतोय...नाही ग जमणार.."
" गुढघाच दुखतोय ना... कॉमबीफ्लाम घे आणि चल..खूप मज्जा येईल ग..मस्त फिरू..बाहेर खाऊ.. मनसोक्त खरेदी करू.." रमा उत्साहात बोलत होती.
फोन ठेवताच सीमाला रमाचं म्हणणं पटलं व रमाने रात्री  झोपताना एक व सकाळी  खरेदीला जाताना एक अश्या दोन पेनकिलर कॉमबीफ्लाम गोळ्या खाल्या.
सीमा  दिवसभर मनसोक्त मैत्रीणी सोबत खरेदी केली. दिवस आनंदात गेला. घरी येताच गुढघ्याची कुरकुर चालू झाली. आजचा दिवसभराचा आनंद आठवून आणखीन एक पेनकिलर घेतली व शांत झोपली.
सीमाला हा पेनकिलरचा फंडा खूप आवडला. बाहेर जायचं असेल तर एक गोळी खाऊन गुढघ्याला गोळी मारायची...!!

एक दिवस अचानक सीमाच्या पोटात खूप दुखायला लागलं, अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सगळ्या टेस्ट झाल्या ,निदान लागलं की, दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.


क्षणिक सुखासाठी घेतलेल्या पेनकिलरने किडनीची वाट लावली होती.
पेनकिलर किंवा वेदना शामक औषधे ही नार्कॉटिक्स नावाच्या ड्रग्स पासून बनलेली असतात. सामान्यपणे शारीरिक दुखणे लवकर बरे व्हावे यासाठी ते घेण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य पेन किलर मध्ये ॲस्प्रिन, ईब्युप्रोफेन आणि नॅप्रॉक्सेन यांचा समावेश होतो.

पेनकीलरच्या वापरासोबत येणारा मोठा धोका म्हणजे त्याचा गैरवापर व व्यसन. पेनकीलर मधील ड्रग्स तत्काळ मिळणारा आराम व मुख्य प्रक्रियेला एका पातळीपर्यंत कमी करणे व आनंददायी अनुभव देणे ह्यासाठी बनलेली असतात. जी व्यक्ती पेन किलर चे सातत्याने सेवनकरतेत त्यांना ह्या परिणामाची सवय झालेली असते व ती गरज नसते तेव्हाही पेनकिलर चे सेवन सुरू करते.

थोडीशी डोकेदुखी, हलका ताप, शरीरात वेदना इत्यादी घटना घडल्या नाहीत की, आपण लगेच केमिस्टला विचारतो आणि पेनकिलर औषध खातो. पेनकिलर औषधे तात्पुरत्या स्वरुपात शरीराची वेदना, ताप आणि जळजळ कमी करते. ही औषधे प्रभावी आहेत आणि भरपूर प्रमाणात वापरली जातात. परंतु, ती पूर्णपणे सुरक्षित मानली जात नाहीत. ही औषधे घेत असताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर, ही औषधे जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापरली गेली, तर हे शरीरासाठी, विशेषत: आपल्या मूत्रपिंडांसाठी हानिकारक ठरू शकते

सीमा सारख्या कितीतरी स्त्रिया आहेत ज्या क्षणिक सुख व समाधान मिळवण्यासाठी बिनधास्त मनानेच गोळ्यांचे सेवन करतात  व जीवघेण्या आजाराला सामोरे जातात.
जीवघेण्या पेनकिलरने जसा सीमाचा घात केला तसा तुमचा आमचा न करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण

२ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template