"तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं... "
विनयला मी गायलेल गाणं आजही आठवतं आहे हे ऐकून विद्याचे डोळे भरून आले. स्टेज वरून खाली येऊन विनयने विद्याचा हात हातात घेऊन तिला स्टेज वरती घेऊन गेला.
आज विनयच्या ऑफिसने यशस्वी लोकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता .
विद्या व विनय दोघे या सोहळ्यामध्ये आले होते. तिथे एक गेम ठेवला होता चिठी मध्ये काय आहे ते वाचून गाणं गायच होतं. " तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी मनापासून गायलेल गाणं कोणतं.."
सर्वांना वाटलं विनय छान रोमेंटिक गाणं गाईल पण क्षणाचाही विलंब न करता विजय ने हे गाणं गायलं ...दोघांचे डोळे पाण्याने भरलेला होते.
पंचतारांकित हॉटेलमध्ये हे मराठी गाणं ऐकून सर्वजण थक्क झाले.
कार्यक्रमात हजर असणाऱ्या सर्वांनी या गाण्यामागच्या भावना जाणून घेण्याची उत्सुकता दाखवताच विजय बोलू लागला.
या गाण्याच्या बळावरच मी आज इथे उभा आहे.
आमच्या दोघांचं लग्न हे आमच्या घरी मान्य नव्हतं, घरातील लोकांचा विरोध पत्करून आम्ही लग्नं केलं. लग्न , झालं त्यावेळी मी तेवीस वर्षाचा व विद्या वीस वर्षाची होती. पाच हजारांमध्ये आमचा संसार चालू झाला. श्रीमंत घरातून आलेल्या विद्याचे हाल मला बघवत नव्हते. चारचाकी मध्ये फिरणाऱ्या विद्याला कुठल्याच कामाची सवय नव्हती .
एका महिन्यात अचानक खर्च आला त्यामुळे महिन्याच्या शेवटी फक्त शंभर रुपये शिल्लक होते, शेवटचे चार दिवस आम्ही वडापाव खाऊन काढले. जेवणापूर्वी चोरून पोटभर पाणी पिताना मी हिला पाहिलं , माझ्या बायकोला मी दोनवेळचं साधं जेवण देऊ शकत नाही याची मला लाज वाटली.त्यादिवशी मी स्वतःला खोली मध्ये बंद करून घेतलं होतं. खूप रडत होतो, पैशांमुळे हतबल झालो होतो, डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं, जिवाचं बरं वाइट करण्याचे विचार मनात येत होते त्यावेळी विद्याने हे गाणं माझ्यासाठी गायलं
"तुज्या माज्या संसाराला आनि काय हवं
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल.."
या गाण्याने मला जिद्दीने लढण्याची ताकद दिली. खूप मेहनत घेतली. माझ्या संसारात खूप चढ उतार आले. बरेच वेळा असं वाटायचं की , आता संपलं काहीच होणार नाही म्हणून हात पाय गाळून बसलो की मला या गाण्याची आठवण ही करून देते. आपला हेतू चांगला असेल , मेहनत करण्याची तयारी असेल तर चांगले दिवस नक्की येतात हे या गाण्यांनी मला शिकवलं. विद्या सारखी समाधानी जोडीदार माझ्या संसाराला लाभली त्यामुळे मी दिवस बदलू शकलो , माझं हे कर्तुत्व मी माझ्या सहचारणीच्या चरणी अर्पण करतो असं म्हणतं विजयने विद्याच्या पायावर डोके ठेवले.
विद्याला गहिवरून आले तिने विनयचा हात हातात घेऊन आपलं कपाळ त्याच्या हातावर टेकवलं.
हॉल मध्ये शांतता पसरली व थोड्याच वेळात जोरदार टाळ्यांचा गजर झाला..
#
अतूट प्रेम
उत्तर द्याहटवा