मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

यू ट्यूब माझा गुरु

 



आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरू विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.  मेधा,आपला गुरु कोण असा विचार करत होती एवढ्यात हातातल्या मोबाइल कडे लक्ष गेलं व लाल रंगातल्या पांढऱ्या त्रिकोणी चिन्हाने  लक्ष वेधून घेतलं व मेधाला गुरू सापडला....

मागच्या वर्षभरात या गुरूने मला किती छान मार्गदर्शन केले, हा गुरू मला मिळाला नसता तर मी काहीच करू शकले नसते असा विचार करत मेधाने मोबाईल कपाळाला लावला.
याचं गुरूने तिला ऑल राऊंडर बनवलं होतं. याचं गुरुमुळे  तिने तिचं स्वतःच केक शॉप चालू केलं होतं . समाजात, घरात व मैत्रीणी मध्ये सगळीकडेच कौतुक चालू होतं. आपल्या गुरूचं स्मरण करत तिला आपल्याच घरी झालेले बदल आठवले.

तुला मोबाईल मधलं काहीच  कसं कळत नाही म्हणणारी मुलगी विचारु लागली
" मम्मा, 404 चा error आलाय काय करू..?"
"F5 key दाब ." मेधाच उत्तर.

विणकाम, भरतकाम करावं थोडं बायकांच्या जातीने असं टोचून बोलणाऱ्या सासूबाई विचारु लागल्या,
"सूनबाई या दाराच्या तोरणाला आडवे टाके किती टाकायचे ग..?
"आठ आडवे व सहा उभे टाके टाका." मेधाचं उत्तर.

शेअर मार्केट म्हणजे भाजी मार्केट नाही असं हिणवून बोलणारा नवरा आता विचारतो
"   मेधा, Nykaa मध्ये तर छान फायदा करून दिलास  मी  आता LIC चा IPO घेऊन ठेऊ का..?"
" घेऊन ठेवा पण लागला तर होल्ड करावा लागेल." मेधाचं उत्तर.

ताई तू किती बावळट आहेस ,साधा आई लायनर तुला लावता येत नाही असं बोलणारी छोटी बहिण , मेधाला विचारु लागली
"ताई, मी  पार्टीसाठी कसा मेकअप करू?
" डोळे स्मोकी कर छान दिसतील." मेधाचं उत्तर.

अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आता मेधाकडे होती.  मेधाला तिच्या गुरूने परिपूर्ण बनवलं होतं. यावर्षी मेधाने  ठरवले यू ट्यूब  हाच आपला गुरु आहे व समस्त यू टबर्स समोर मनोमान नतमस्तक झाली.
मेधासारख्या नवीन काही शिकू पाहणाऱ्या कित्येक स्त्रियांसाठी यू ट्यूब ने ज्ञानाची कवाडं खुली केली आहेत.  यू ट्यूब मुळे पारंपारिक खाद्य पदार्था पासून ते इटालियन, रशियन पदर्थापर्यंत सगळ्या पाककृती घरी बनवता येतात.
तुळशीच्या लग्नाच्या मंगलाष्टकं पासून ते बाळाच्या पाळण्यासाठी लागणारी सगळी गाणी आपल्या समोर हजर आहेत.
घरी एखाद नवीन यंत्र आणलं तर ते कसं वापरायचं याची खडान खडा माहिती इथे मिळते.
प्रत्येकच लहानात लहान गोष्टींचे ज्ञान देणाऱ्या यू ट्यूबला व ज्ञागगंगा आमच्या समोर आणणाऱ्या यू ट्यूबर्सला माझा गुरुपोर्णिमा निमित्त साष्टांग दंडवत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template