आधुनिक लाकूडतोडया
आशिषच्या लग्नाची बोलणी चालू होती . मुली बघण्याचा कार्यक्रम चालू होता पण मनासारखी मुलगी मिळतच नव्हती . निराश होऊन आशिष एका झाडाखाली बसला होता तेव्हड्यात तिथे एक देवी प्रगट झाली. दुःखाचे कारण विचारले तसे आशिषने मनातली इच्छा बोलून दाखविला," मला सुंदर , स्लिम एखाद्या नटी प्रमाणे बायको हवी आहे."
देवी म्हणाली ठीक आहे . मी सुंदर मुलगी घेऊन येते.
" थांब देवी, मला फक्त सुंदरच नको तर नोकरी करणारी स्मार्ट बायको हवी आहे . जी भरपूर पैसा कमावेल."
देवी म्हणाली ठीक आहे," सुंदर, स्मार्ट व कमावती मुलगी घेऊन येते."
आशिषला ठावूक होते सुंदर, स्मार्ट नोकरी करणारी मुलगी घर, नाती सांभाळेल कश्या वरून...
"देवीमाते मला सुंदर, स्मार्ट , कमावती व सर्व गुण संपन्न मुलगी बायको म्हणून हवी आहे ."
देवी "तथास्तु" व अदृश्य झाली.
आशिषला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. तीन वेगळ्या बायका मिळविण्यापेक्षा एकाच वरात हवी तशी बायको मिळाली या आनंदात स्वतःचीच पाठ थोपटली.
देवीने तथास्तु म्हणाल्या प्रमाणे सर्व गुण संपन्न बायको मिळाली.
थोडेच दिवसात आशिष नाराज होऊन त्याच झाडाखाली बसला होता.
आशिषची ही अवस्था पाहून देवी परत प्रगट झाली.
हवी तशी बायको मिळाली तरी नाराज का असं विचारलं
" माझी बायको सुंदर, स्मार्ट , कमावती व सर्व गुण संपन्न आहे पण मला शोभणारी नाही. प्रत्येक ठिकाणी माझ्यापेक्षा काकणभर जास्तच आहे. मला स्वतःचीच लाज वाटते, खूप कमीपणा वाटतो. "
" एखादी गोष्ट मागताना ती आपल्याला शोभेल का याचा विचार करणे गरजेचे आहे . आपल्याला सहज मिळते म्हणून अती हव्यास करायचा नसतो . "
आशिषला आपली चूक लक्षात आली प्रत्येक वेळी सगळ्यांपेक्षा छान असा विचार न करता आपल्या मर्यादा ओळखून एखादी गोष्ट मागणे कधीही उत्तमच असते .
आधुनिक मला मुलींची हीच मागणी असते . आपल्या मर्यादा न ओळखता अवाढव्य अपेक्षा करतात व शेवटी त्या मिळाल्या तरी निराशेच्या पोकळीमध्ये वावरत असतात.
कृत्तिका नितीन कुलकर्णी
माझी कथा आवडल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
Mast
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवा