स्वच्छतेचेभूत
" हातावर हे पुरळ कसलं.. लाल झाली आहे तुझी त्वचा..काय झालं आहे ...? डॉक्टर काय बोलले.."
सुजय आपल्या पत्नीला मेनकाला विचारत होता.
मेनका काहीच बोलली नाही पण आतून निता बोलली
" बाबा, डॉक्टरांनी सांगितले की आईला केमिकल रीएक्शन झालं आहे. . "
" सतत घासघुस चालू असते मग होणारच ना...सारखी लायझोल, हारपिक, वेगवेगळ्या केमिकलने साफ सफाई करते...हे कधीतरी होणारच होतं.."
" मग घाणीत रहायचं का..? मी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीच करते ना..."
" कुटुंबाचे आरोग्य सांभाळत तू स्वतःच्या तब्येतीची वाट लावून घेतली आहेस...असे इन्फेक्शन लवकर बरे होत नाहीत.."
अतीस्वच्छतेचं भूत शंभर पैकी ऐंशी बायकांच्या मानगुटीवर स्वार असतं. हे भूत नसून हा मानसिक आजार आहे. भित्या पोटी भ्रमराक्षस म्हणतात त्या प्रमाणे नेमकी घाण त्यांच्याच वाटेला येते.
जेवताना कुठूनतरी केस उडून यांच्याच ताटाजवळ येते,प्रवास करताना नेमकी यांचीच जागा खराब असते, शेंबडा बाळ यांच्या शेजारी बसलेलं असतं.
बाहेरची पाणीपुरी व यांचा छत्तीसचा आकडा असतो.
या गोष्टी टाळण्यासाठी ही लोकं प्रवास टाळतात, बाहेरचं खाणं टाळतात, लोकात मिळून मिसळून खाण्याचा आनंद घेत नाहीत. ऐकूनच या व्यक्ती एकलकोंड्या होतात व स्वच्छतेचं भूत अधिक प्रबळ होतं असतं.
स्वच्छतेच्या नावाखाली केमिकलचा अतिवापर करतात व भयंकर आजाराला निमंत्रण देत असतात.
बाहेर पडल्या नंतर सॅनिटायझर पाण्यासारखे वापरले जाते.सॅनिटायझरमधील घटकांमुळे आपल्या शरीरात असलेल्या निरोगी बॅक्टेरियांवरही (Microbiomes) वाईट परिणाम होऊ शकतो. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही. जे बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत, सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे ते देखील नष्ट होतात.
ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तरी आपल्या शरीरात जाणे गरजेचे आहे .
स्वच्छतेचा मध्य साधता आला तर खऱ्या अर्थाने आपण निरोगी व सुदृढ जीवन जगू शकू ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment