चक्र योगाने शरीराचा समतोल साधा!
चक्र ध्यान म्हणजे काय?, त्याने आपलं जीवन सुंदर कसे होणार
आपल्या शरीरात ७ चक्रे किंवा शक्तीस्थाने आहेत, ज्यातून प्राणशक्ती फिरत असते. या चक्रात अडकलेली शक्ती आजारांचे कारण ठरू शकते. म्हणूनच प्रत्येक चक्राचा अर्थ समजून घेणे आणि शक्ती फिरत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जेंव्हा चक्र किंवा शक्तीचे चाक अवरोधित असते, तेंव्हा प्राणशक्ती मोकळी करण्यासाठी विशिष्ठ हालचालींची मदत होऊ शकते. शरीरात अडकलेली शक्ती मोकळी करण्याचा योगासने हा उत्तम मार्ग आहे, कारण या आसनांमुळे व श्वासामुळे नविन शक्ती आकर्षित केली जाते.
योग हा शारिरीक आणि अध्यात्मिक सराव असल्यामुळे योगासने हा फक्त शरीरासाठीच नाही तर, मन, भावना आणि आत्म्यासाठीपण आहे, म्हणूनच चक्रांच्या समतोलासाठी हा सर्वोत्तम व्यायाम ठरतो.
१. मूलाधार चक्र
तत्व: पृथ्वी; रंग:लाल; मंत्र: लं.
स्थान: मज्जारज्जूच्या तळाशी,गुद्द्वार व जननेंद्रियांच्या मधे
२. स्वाधिष्ठान चक्र
तत्व : पाणी; रंग: नारंगी; मंत्र : वम्
स्थान: माकडहाडाच्या खाली, जननेंद्रियांच्या आणि मज्जारज्जूच्या मधे
३. मणिपूर चक्र
तत्व: अग्नि; रंग: पिवळा; मंत्र: रं
स्थान: नाभीच्या जवळ, जठर किंवा सोलर प्लेक्ससच्या जवळ
४. अनाहत चक्र
तत्व: वायू; रंग: हिरवा किंवा गुलाबी; मंत्र: यं
स्थान: हृदयाच्या जवळ
५. विशुद्धी चक्र
तत्व: आकाश; रंग: निळा; मंत्र: हं
स्थान: घशाचा जवळ, घशाचा पोकळीमध्ये
६. आज्ञा चक्र
तत्व: प्रकाश; रंग: नीळा; मंत्र: ॐ।
स्थान: भ्रूमध्य, (तिसऱ्या डोळ्याची जागा)
७. सहस्त्रार चक्र
तत्व: अंतश्चेतना; रंग: जांभळा किंवा पांढरा; मंत्र: मौन
स्थान: माथ्यावर
मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृती करून तिला सुषुम्ना मार्गाने एक एक चक्र जागृत करीत अखेर सहस्त्रार चक्रापर्यंत आणणे हाच कुंडलिनी योगाचा विकासाचा मार्ग आहे. कुंडलिनी जागृती म्हणजे मेंदूतील सुप्त असलेल्या पेशी कार्यरत होणे. त्या दृष्टीने कुंडलिनी जागृतीला विशेष महत्त्व आहे. ही साधना सर्वांना करता येणे शक्य आहे.
वरील व्हिडिओमध्ये बत्तीस मिनिटांचे चक्रध्यान दिले आहे . सर्वानी याचा लाभ घ्यावा ..
👌👌👌
उत्तर द्याहटवा