आवडते पावसाळ्यातील गाणे
२००७ साली धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या गुरु चित्रपटातील
" बरसो रे मेघा-मेघा
बरसो रे, मेघा बरसो "
हे गीत मला खूप आवडते . उन्हाळा संपल्यानंतर पहिला पाऊस पडतो त्यावेळी हमखास हे गीत माझ्या ओठावर येतं . या गाण्याची सुरुवातच खूप छान आहे . शब्द जरी नकारार्थी असले तरी एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता व आनंद या शब्दातून मिळतो .
"ना रे ना रे... ना रे ना रेनान नं ना रे ना रे… ना रे ना रे
न ना रे, न ना रे, न ना रे
ना ना रे
न ना रे, न ना रे, न ना रे
ना ना रे "
ऐशवर्या बच्चन नि या गाण्यावर केलेले नृत्य मनाला खूप भावते . या गाण्याला संगीत दिलं आहे ए आर रेहमान यांनी तर श्रेया घोषालजीच्या आवाजात गायलेलं गाणं फक्त ऐकायलाच नाही तर गुणगुणायला खूप आवडतं . या नृत्यात कसलीच अश्लीलता , अंग प्रदर्शन नाही . या गाण्याचे गीतकार आहेत गुलझार साहेब .
बरसो रे मेघा मेघा
बरसो रे मेघा बरसो
मीठा है, कोसा है
बारिश का बोसा है
या गाण्याला दिलेले संगीत , बोल व नृत्य अप्रतिमच आहे पण एका तरुण मुलीच्या मनाचा ठाव घेणारे हे गाणे आहे .
पाऊस म्हणजे मनाला मिळणार एक थंडावा आहे . हा थंडावा हवा हवासा वाटणारा असतो . गोड आहे , गरम आहे जणू या थंडाव्या सोबत पडणारा पावसाचा थेंब प्रेमाने चुंबन घेऊन जातो असा भास होतो. काळ्या ढगाला पाहून विनंती करते तू लवकरात लवकर मला भेटायला ये ..
" धन, बैजू, गजनी
हाल जोते सबने
बैलों की घण्टी बजा
और ताले लगे भरणे"
पाऊस पडल्यानंतर गावामध्ये जी कामाची लगबग चालू होते त्याचे सुंदर शब्दात गुलजारजी नि वर्णन केले आहे . बैलांच्या घुंगराच्या आवाजापासून ते मातीत घर बांधण्या पर्यंत सर्व लगबग त्यांनी समर्पक शब्दात मांडली आहे
या प्रेमळ पावसाची सोबत असेल तर मी कुठल्याही बंधनातून बाहेर पडायला तयार आहे . मला जणू पंखच फुटले आहेत . स्वछंद पणे मी कुठेही जाऊ शकते . मनात भरलेला आनंद संगीतातून व नृत्यातून ऐश्वर्या बच्चनने दाखवला आहे .
या गीतातली खालील स्वर मनाला स्पर्श करून जातात व ते आपलेसे वाटतात
"तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तू तु"
या संगीतातून आपल्या भारतीय संगीताचे वेगळेपण रेहमानजी यांनी दाखवून दिले आहे.
स्वछंद आनंदात नाचणाऱ्या तरुणीला मनातून भीती वाटते कि , मी कुठे गेली म्हणून सर्वजण मला विचारतील ती त्या भरलेल्या मेघाला सांगते तू मला विसरू नको
काली-काली रातें, काली रातों में
ये बदरवा बरस जायेगा
गली-गली मुझको, मेघा ढूँढेगा
और गरज के पलट जायेगा
घर आँगन अंगना, और पानी का झरना
भूल न जाना मुझे, सब पूछेंगे वरना
या बंधनरूपी पाशातून मी तुझ्या या बरसलेल्या पाण्यातून वाहत जात आहे . मला एकटीला याचा आनंद घेई दे व शेवटी सांगते
रे बह के चली, मैं तो बह के चली
रे कहती चली, मैं तो कहके चली
रे मेघा...
या गाण्या मध्ये एक वेगळीच भावनिक ओढ वाटते . आत्मिक समाधान असलेल्या गाण्यासोबत पावसात नाचायला व गुणगुणायला खूप मज्ज येते . रिमझिम पावसात भिजत नाचण्याचा अनुभव नक्की घ्या
Khup sunder lihile aahe
उत्तर द्याहटवाखूप छान शब्दात मांडले आहे
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवा