मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, ५ जुलै, २०२३

बाई पण भारी देवा

 बाई पण भारी देवा 



गृहीत धरलेलं प्रेम याचा पुढचा भाग ... 

" हॅलो , मीना ऐकतेस ना .... हॅलो  ... हॅलो ..  रडू नकोस ... शांत हो .   झालं  गेलं विसरून जा ... आता पुढे काय करायचं आहे त्याचा विचार कर .. " समजावण्याच्या स्वरात मीनाची मोठी बहीण सीमा बोलत होती .  

" अगं  ताई असं  कसं  विसरु .. छकुली माझ्या पोटची पोरगी आहे .. असं काही वागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं . तिच्या बाबांची अवस्था पाहवत नाही . लोक काय बोलतील म्हणून घरीच बसून असतात . एका खोलीत स्वतःला कोंडून ठेवलं आहे .. काय  करू काहीच सुचत नाही .. " मीना निराश होऊन बोलत होती ... 

" जे झालं ते झालं ... यातून मार्ग काढण्याची कल्पना माझ्या डोक्यात आहे .  आपल्या "सेल्फी क्वीन" च्या ग्रुप मध्ये झूम  मीटिंगची  लिंक पाठवली आहे बरोबर चार वाजता जॉईन हो ... चल  ठेवते फोन ... " असं म्हणत  सीमाने फोन ठेवला . 

बरोबर चार वाजता सर्वानी मीटिंग जॉईन केली . सीमा माईक चालू करून बोलू लागली ," आज हि मीटिंग घेण्यामागचं  एक खास कारण आहे . छकुलीची बातमी सर्वाना कळलीच असेल . आज हि वेळ मीना वरती आली ती कदाचित उद्या आपल्यावर येऊ शकते . आता सर्वजण मुलींवरती बंधनं  घालतील . कदाचित उच्च शिक्षणासाठी मुलींना तुम्ही बाहेर पाठवणार नाही , पण  मला वाटतं हा यातून काढलेला मार्ग नाही .  आपण एक सुजाण पालक होऊन याला आळा  घालू शकतो . आपण आपल्या मुलांना समज देणारच आहोत पण बाकी मुला मुलींसाठी आता आपल्याला उभे रहायचे आहे .   

आपण महिला शिकलो ,आपल्या पायावरती उभे राहिलो . आपण मनात आणलं तर काहीही करू शकतो हि धम्मक आपल्यामध्ये आहे .आपल्या बाजूने कायदा आहे.  आजच्या या तरुण मुली कायद्याचा गैरवापर करून आपल्या समाजव्यवस्था   धुळीस मिळवायला चालल्या आहेत . या असंच  वागल्या तर आपली कुटुंब व्यवस्था  बंद होत जाईल ... आता आपल्याला  एकत्र येऊन या मुलींना धडा शिकवायचा आहे . चुकलेल्या वाटेवरून त्यांना परत घेऊन यायचं आहे . "

" म्हणजे नक्की काय करायचं .. " अनम्यूट करत मीनाच्या जावेने प्रश्न विचारला. 

" आपण या ग्रुप मध्ये पंधरा जणी आहोत . एवढे दिवस आपण एकत्र येऊन सण साजरे केले , पार्ट्या केल्या , टूर काढली , वाढदिवस साजरे केले ... भरपूर फोटो - विडिओ काढले , खूप मज्जा केली पण आता वेळ आली आहे समाजाला काहीतरी देण्याची ... "

सर्वानी माना  डोलावून होकार दिला 

"  आपण  पंधराजणी मिळून  समाज व्यवस्था सुधारण्याचे काम करू... . सरिता , सुमा तुम्ही शाळेत शिकवता. आधुनिकतेच्या नावा  खाली दाखवले जाणारे व्हिडिओ , सिनेमे  या वर  चर्चा  करा .  तुम्ही दोघीनी असे  विषय काढून मुलांना बोलते करा . त्यांच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते काढून घ्या . या गोष्टी किती वाईट आहेत हे त्यांच्या मनावर सतत बिंबवत जा .. "

सीमा व सरिताने थंब दाखवला . 

" माधुरी , पूनम  व  स्वाती  तुम्ही  मेडिकल स्टोअर सांभाळता .  तरुण मुलगी - मुलगा तुमच्याकडे काही गैर गोष्टींची मागणी करत असतील तर त्यांना कडक शब्दात समज द्याची . तुमच्याकडून ती वस्तू त्यांच्या हातात पडू द्यायची नाही .  भलेही ते इतर मेडिकल मधून घेऊ दे  पण तुम्ही देऊ नका .  वंदना  व साधना   तुम्ही तुमच्या कॉलेज मध्ये  तोकडे कपडे घालणाऱ्या व मुलांना आकर्षित करून  घेणाऱ्या मुलींवरती जरा विशेष लक्ष द्या .. वेळोवेळो कानउघाडणी करत जा . नीलिमा  व सारिका  तुम्ही तुमच्या पार्लर मध्ये येणाऱ्या मुलींसोबत या विषयावर मुद्दाम बोलत जा .. एक वाकडं पाऊल किती महागात पडू शकते ते उदाहरण देऊन सांगा .. "

" आम्ही तर काहीच करत नाही मग आम्ही काय करू .." बाकी मेंबर नि चॅट बॉक्स  मध्ये मेसेज केला . 

" काहीच नाही कसं , अश्विनी तू छान लिहतेस , लिव्ह इन रिलेशन , मुलींचे राहणीमान , पालकांची जबाबदारी  या विषयावर लिखाण कर .. वैशाली , मोनिका   तुम्ही छान  व्हिडीओ करता तुम्ही हा विषय मांडून नाटकांच्या क्लिप तयार करा .. छोटे छोटे व्हिडीओ करून सर्व ग्रुप मध्ये शेअर करा .  लीना , तू छकुलीची लाडकी मावशी आहस तू तिच्या संपर्कांत रहा , तिची चूक तिच्या लक्षात आल्यावर ती वेडं वाकडं पाऊल  उचलेल पण तिला  यातून बाहेर काढ . आता बाकी सर्वानी एक काम करायचं  जिथं जिथं मुलं  मुली तोंड लपवून गळ्यात गळे  घालून  बसतात तिथे त्यांच्यासमोर जाऊन फक्त मोबाइल समोर पकडायचा . आपण व्हिडीओ काढतोय अशी कृती करायची . 

बरेच वेळा आपण या जोड्या कडे दुर्लक्ष करतो , तोंडातल्या तोंडात पुटपुटतो  व आपल्याला काय करायचंय असं  म्हणत निघून जातो पण या पुढे अशी कृती केली तर या गोष्टीला आळा बसू शकेल .. 

बायका एकत्र येऊन बडबड करतात, ऐकमेकीचे ऊणि धूणी काढतात,पाय खेचतात या गोष्टी आपण पुसून काढू..आज पासून आपली "बाईपण भारी" मिशन चालू करू.. हीप हिप हुरे...हीप हिप हुरे...

चला आता मीटिंग एन्ड करते भेटूया लवकरच ... " सर्वानी होकार दिला व मीटिंग संपली व नवीन मिशनची सुरुवात झाली .. 

हा विषय छकुली पूरता मर्यादित न राहता तो प्रत्येक मुलीचा व तिच्या कुटुंबाचा विषय  बनला . 

या पंधरा जणींनी मिळून जोरदार सुरुवात केली . कितीतरी धम्माल किस्से पुढच्या मीटिंग मध्ये सांगण्यात आले .. बुढणाऱ्या बाईला हात देण्याचे समाधान प्रत्येकीच्या डोळ्यात दिसत होते . 

एका बाईने  दुसऱ्या  बाईला बाहेर काढण्याची वेळ आली आहे .  आपली " बाई पण भारी " मिशन चालू झाली आहे . आपल्या या मिशन मध्ये इतर महिलाना सामील करून घ्या .. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

सेकंड ओपेनियन

  आज  व्हॉटस अप्प वरती फिरणारा लेख वाचनात आला .  व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांचा संदर्भ देणारा लेख होता . या लेखामध्ये आपले सेकंड ओपेनियन...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template