विशुद्धी चक्र
५. विशुद्धी चक्र
तत्व: आकाश; रंग: निळा; मंत्र: हं
स्थान: घशाचा जवळ, घशाचा पोकळीमध्ये
विशुद्धी चक्राचा संबंध संवाद, सर्जनशीलता, विश्वास, खरेपणा, सजगता आणि अभिव्यक्ती या व्यक्तीमत्वाच्या पैलूंशी आहे. याचा प्रभाव गळा, गलग्रंथी आणि परावटू ग्रंथी, श्वासनलिका, मानेतील मणके, स्वरतंतू,
मान व खांदे, दंड, हात, अन्ननलिका, तोंड, दात आणि हिरड्या यांवर असतो. असंतुलित विशुद्धी चक्रामुळे गलग्रंथीचे काम नीट न होणे, खोकला, मान आखडणे, तोंड येणे, हिरड्या किंवा दाताचे त्रास, स्वरयंत्राचा दाह, ऐकण्याचा त्रास, इत्यादी त्रास होतात.
असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:
अविश्वास, निर्णयक्षमता नसणे, कमकुवत इच्छाशक्ती, अभिव्यक्तीचा अभाव, सर्जनशीलतेची कमतरता आणि व्यसनांच्या आहारी जाण्याची वृत्ती.
चक्र संतुलित असल्याची लक्षणे
सर्जनशीलता आणि बोलके व्यक्तिमत्व, उत्तम संवादकौशल्य, समाधानी, चांगला श्रोता.
चक्र संतुलित ठेवणारी आसने
मत्स्यासन, मार्जारासन, मानेचे व्यायाम आणि सर्वांगासन, सेतू बंध सर्वांगासन आणि हलासन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment