मणिपूर चक्र
३. मणिपूर चक्र
तत्व: अग्नि; रंग: पिवळा; मंत्र: रं
स्थान: नाभीच्या जवळ, जठर किंवा सोलर प्लेक्ससच्या जवळ
मणिपूर चक्राचा संबंध आपुलकी, भावनांची मानसिक समज आणि व्यक्तीचे स्वत:बद्दलचे मत यांचाशी आहे. पोटाचा वरचा भाग, पित्ताशय, यकृत, पाठीच्या कण्याचा मधला भाग, मूत्रपिंड, अॅड्रीनल, छोटे आतडे आणि जठर या सर्वांच्या कामावर मणिपूर चक्राचा प्रभाव असतो. असंतुलित मणिपूर चक्रामुळे मधुमेह, पॅंक्रियायटीस, ऍड्रीनलमधे असमतोल, संधिवात, मोठ्या आतड्याचे आजार, पोटाचा अल्सर (क्षय), आतड्यांमधे गाठी, भूक मंदावणे किंवा रक्तदाब कमी होणे हे त्रास होऊ शकतात.
असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:
स्वाभिमान कमी होणे, बुजरेपणा, नैराश्य आणि नकाराची भीती, निर्णयक्षमता कमी होणे, पट्कन मत बनवणे, राग आणि वैर धरणे
चक्र संतुलित असल्याची लक्षणे
उत्साही, आत्मविश्वासू, हुशार, एकाग्रचित्त, उत्तम पचनशक्ती
चक्र संतुलित ठेवणारी आसने
उष्णता वाढवणारी आसने, जसे की सूर्यनमस्कार आणि वीरभद्रासन; पाठीचे व्यायाम जसे की धनुरासन, शरीराला पीळ देणारी आसने जसे की अर्ध मत्स्येंद्रासन; आणि पोटाचे स्नायू बळकट करणारी आसने जसे की नौकासन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment