सहस्त्रार चक्र
७. सहस्त्रार चक्र
तत्व: अंतश्चेतना; रंग: जांभळा किंवा पांढरा; मंत्र: मौन
स्थान: माथ्यावर
सहस्त्रार चक्राचा प्रभाव अंतर्ज्ञानाने माहिती होणे, अध्यात्माशी नाते, मन-शरीर-आत्मा आणि अंतश्चेतनेची सजगता (conscious awareness) यांचे एकीकरण यांवर असतो. डोक्यामधील केंद्र, कानांच्या वरील मध्यभागातून जाणारी रेषा, मेंदू, चेतासंस्था आणि शीर्षग्रंथी (pineal gland) या चक्राच्या अखत्यारीत येतात. या चक्राच्या असंतुलनामुळे अतिथकवा आणि उजेड व आवाजाबद्दल संवेदनशीलता येते.
असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:
ध्येय नसणे, स्वतःवर शंका (identity crisis), कुठल्याही अध्यात्मिक पद्धतीवर किंवा श्रद्धेवर, स्फूर्तीस्थानाबद्दल अविश्वास, भीतीची भावना आणि भौतिकवादी स्वभाव
चक्र संतुलित असल्याची लक्षणे
विश्वाशी एकरुप असल्याची जाणीव, खुले मन, हुशार, व विवेकी, विचार व कल्पना ऐकून घेणारा, एकुणच सुुसंवादी व्यक्तीमत्व.
चक्र संतुलित ठेवणारी आसने
तोल सांभाळत करावयाची आसने ज्याने शरीराबद्दल सजगता वाढेल ; जसे कि योगमुद्रेत बसून ध्यान करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment