मी रिपोर्टर
मनोरंजनाचा षटकार
नमस्कार मंडळी मी कृत्तिका , तुम्हाला घेऊन आली आहे मनोरंजन सफर करण्यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील फन सिटी सिनेमागृहामध्ये..
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया मध्ये एका चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ओळखा बरं कोणता चित्रपट ?
हो, बरोबर ओळखलं आपण 'बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या यशाचं गुपित जाणून घेण्यासाठी इथे आलो आहोत.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत . तसेच अनेकजण इतरांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचं आवाहन देखील करत आहेत.
इतर वेळा सामसुम असणारं हे थेटर आज गजबजलेलं दिसत आहे .
बघूया कोण कोण आलं आहे ...
पुरुष व बच्चे कंपनी पेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. बाहेर हाउस फुल्ल चा बोर्ड लागलेला आहे .आता दुसरा शो संपून तिसरा शो चालू होणार आहे . महिला वर्ग आपल्या ग्रुप सोबत आलेला दिसतोय. ग्रुप फोटो काढण्यात सर्व महिला व्यस्त आहेत .मला इथे एक ग्रुप दिसतोय इथे सर्वांनी एकसारखे ड्रेस परिधान केले आहेत.
आपण या ग्रुपला विचारू," आज काय सर्वजण एकसारखे ड्रेस...काही विशेष कारण..?"
" हो, आज आम्हाला या 'बाईपण भारी देवा’ या पोस्टर समोर रील करायचा आहे ."
"आज सोमवार आहे , सुट्टी नाही तरी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हा चित्रपट बघायला आल्या आहात..काही विशेष कारण.."
" कालची तिकिटे आम्हाला मिळाली नाहीत म्हणून खास सुट्टी घेऊन बघायला आलो आहोत ."
" अरे व्वा छान , मज्जा करा .. "
इथे महिलांचा ग्रुप नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ खेळत व्हिडीओ काढताना दिसत आहेत चला त्यांना जाऊन विचारु ..
" तुम्ही साऱ्याजणी खूप सुंदर दिसत आहात , आज चित्रपट बघायला चक्क नऊवारी साडी !!"
" हो , आमचा मंगळागौरीचा ग्रुप आहे . चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आम्हाला स्टेशनवरती व थेटर मध्ये व्हिडीओ करायचा आहे म्हणून खास हि साडी . काल मी हा सिनेमा पाहिला ,मला खूप आवडला म्हणून परत मैत्रिणींसोबत व्हिडीओ काढण्यासाठी आली आहे . "
" छान "
मला इथे काही पुरुषवर्ग दिसत आहे त्यांना आपण येण्याचं कारण विचारू
" महिलांसाठी हा चित्रपट आहे , तुम्ही इथे कसे ... "
" नेमकं या चित्रपटात काय आहे ते बघण्यासाठी आलो आहे ... बघू बाईपण असतं काय .. !"
" नक्की बघा , तुमच्या प्रतिक्रया आम्हाला नक्की सांगा .. "
दुसरा शो संपला आहे .
चित्रपट बघणाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की जाणून घ्या .. घेऊया एक छोटाशी विश्रांती , कुठेही जाऊ नका
लवकरच भेटू
नमस्कार मंडळी ,परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या मनोरंजन सफर या कार्यक्रमात . इथली एवढी गर्दी ,लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पैसे वसूलचा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे . मोबाइल मध्ये सिनेमा न बघता थेटरमध्ये पाहणे पसंद केले म्हणूनच या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
चला तर या काकूंना विचारु
" कसा वाटला सिनेमा ..?"
" धम्माल... खूप आवडला .. "
" स्टोरी काय आहे ..?
"एकंदरीत ही बाईपणाची सप्तरंगी कहाणी आहे. इंद्रधनुष्यातील सात रंगांचे प्रतिनिधित्व या सिनेमात दिसतं.सप्तरंगी का? तर जया (रोहिणी हट्टंगडी), शशि (वंदना गुप्ते), साधना (सुकन्या कुलकर्णी), पल्लवी (सुचित्रा बांदेकर), केतकी (शिल्पा नवलकर), चारु (दीपा परब) या सहा बहिणींच्या सहा वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. सिनेकथानकात त्यांचा स्वतःचा विविधरंगी जीवनप्रवास आहे. या सहा बहिणींचे... रंगांचे स्वतःचे असे काही प्रश्न, अडचणी आणि द्वंद्व आहेत. ज्याचं उत्तरं हुडकण्याचा प्रयत्न हे सहा 'रंग'.. या 'स्त्री'या करताहेत. "
" तुम्ही मला सांगा या सहा बहिणींपैकी कोणाची भूमिका तुम्हाला विशेष आवडली ?."
" सहाही जणींनी खूप छान भूमिका केली आहे . वंदना गुप्ते यांच्या अभिनय कौशल्याची ताकद या सिनेमात दिसते. संपूर्ण सिनेमाभर त्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अगदी मोजके संवाद असूनही केवळ पडद्यावरील अस्तित्वातून रोहिणी हट्टंगडी यांनी कथानकाला आधार दिला आहे. सुकन्या मोने यांची पडद्यावरील एनर्जी अफलातून आहे. दोन टोकांच्या दोन स्वभावाचे चित्रण शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर करतात. आजच्या चाळिशीतील कुटुंबवत्सल 'वर्किंग वुमनला' सर्वाधिक रिलेट होईल अशी व्यक्तिरेखा दीपा परबनं उत्कृष्टपणे साकारली आहे. तिच्या भूमिकेतील चढ-उतार प्रेक्षकांना हळवं करतात. संवाद, पटकथा उत्तम जमून आले आहेत
" ताई , तुम्ही या चित्रपटातील एखादा विनोदी किस्सा सांगाल का .. ?"
" ड्रिंक घेताना ग्लासला रुमाल लावून स्वामींचं नाव घेण्याचा किस्सा खूप विनोदी होता . एकूणच सुकन्या कुलकर्णींचा अभिनय विनोदी होता ..असे बरेच प्रसंग विनोदी आहेत व काही प्रसंगात डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या सुद्धा आहेत . "
एकंदरीतच सर्वानी हा सिनेमा मनापासून आवडला आहे . तिकिटांच्या खिडकीजवळ अजूनही गर्दी आहे .
स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाकं असल्याचं म्हटलं जातं खरं; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो, तो स्त्रीमुळेच... बाईपणामुळेच. म्हणूनच 'बाईपण भारी देवा!' असं आजही एकविसाव्या शतकातील २०२३मध्ये लेखिका वैशाली नाईक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांना लिहावं आणि पडद्यावर दाखवावं लागतंय.
तुम्ही सर्वानी पाहिला नसेल तर हा चित्रपट अवश्य बघा व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा
आजची खबर या चॅनेल वरून मी कृत्तिका, कॅमेरामन किरण सोबत तुमचा निरोप घेते ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment