आज्ञा चक्र
आज्ञा चक्र
तत्व: प्रकाश; रंग: नीळा; मंत्र: ॐ।
स्थान: भ्रूमध्य, (तिसऱ्या डोळ्याची जागा)
आज्ञा चक्राचा संबंध स्वत्वाची जाणीव, शहाणपणा, बुद्धी, दृष्टिआड असणार्या गोष्टी पाहण्याची दृष्टी, कल्पनांची अंमलबजावणी, अलिप्तता, अंतर्ज्ञान, समजूतदारपणा आणि अंत: प्रेरणेने तर्क करु शकणे यांच्याशी आहे. याचा प्रभाव मेंदू, डोळे, कान, नाक, पीयूष ग्रंथी(pituitary gland), शीर्षग्रंथी(pineal gland), आणि चेतासंस्था यांवर असतो. चक्राच्या असंतुलनामुळे डोकेदुखी, भीतीदायक स्वप्ने, डोळ्यांवर ताण, शिकण्याची क्षमता कमी असणे, खूप भीती वाटणे, नैराश्य, आंधळेपणा, बहिरेपणा, आकडी येणे किंवा मणक्यांशी संबंधित आजार हे त्रास होऊ शकतात.
असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:
चुकीची मते, गोंधळ, सत्याची भीती, बेशिस्त आणि एकाग्रता साधता न येणे.
चक्र संतुलित असल्याची लक्षणे
सुस्पष्ट विचार, चांगली कल्पनाशक्ती, चांगली अंतर्ज्ञानशक्ती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यात सुधारणा
चक्र संतुलित ठेवणारी आसने
बालासन, ध्यान, योग मुद्रा; डोळे आणि डोळ्याभोवती हात फिरवणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment