मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

विश्वास

 


कॉलेजमधील आजची गंभीर घटना पाहून  प्राध्यापक असलेल्या सुमतीच्या पायाखालची  जमीन सरकली . काय  ही आजकालची मुलं , आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती  व्यक्ति आपली होणार नाही म्हणून तिची हत्या करायची.. कसली मानसिकता आहे ही... विचार करून मन सुन्न झालं पण  त्याच वेळी सुमतील तिच्या कॉलेजचा काळ आठवला . आज त्या मुलाचं नाव ही आठवत नाही पण चेहरा पुसटसा आठवतो .. किती ग्रेट होता तो.. डोळे बंद करून सुमतीने मनोमन त्याचे आभार मानले .. 

दिसायला  सुंदर असलेली सुमती अभ्यासातही हुशार होती . कॉलेजमध्ये मुलीनंसोबत रमणारी  सुमती मुलांपासून  एक हात दूरच रहात असे , मुला-मुलींच्या लफड्यामध्ये कधी पडायचीच नाही . घर - कॉलेज - अभ्यास या त्रिकूटात स्व:ताला अडकून ठेवलं होतं . या अश्या  निरस  मुलीच्या प्रेमात एक मुलगा पडला . कॉलेज मध्ये हीरो असणारा  , शंभर मुली ज्याच्या  मागे पुढे करायच्या पण हा पठ्ठ्या मात्र जी त्याच्या कडे बघायची सुद्धा नाही तिच्या  मागे लागला होता . कॉलेज मध्ये चिडावा-चिडवी  चालू झाली . या सर्व गोष्टींना  कंटाळून सुमतीने  कॉलेजला जाणच बंद केलं .  

परीक्षा जवळ आल्या होत्या , काय करावं  काहीच सुचत नव्हतं , शेवटी मन घट्ट करून कॉलेज मध्ये जाऊ लागली , आपण याला टाळतो म्हणून याने आपला नाद सोडला असेल असं  तिला वाटलं पण हा हिला बघून खुश झाला , ही बोलायलाच नाही तर बघायला सुद्धा तयार नाही म्हणून  तिला  पत्रातून प्रेमाची कबुली दिली . 

प्रिय सुमती ,

माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे . मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवेन , माझ्यावर विश्वास ठेव .. 

तुझाचं 


सुमतीने  शांतपणे  पत्र  वाचून घेतलं . एकांतात बसून एक पत्र लिहिलं 


धन्यवाद . 

तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे  पत्र लिहीत आहे . सर्वाचा माझ्या शिक्षणाला विरोध असताना  माझ्या आई – बाबानी माझ्यावर विश्वास ठेवून कॉलेजमध्ये अॅडमिशन मला घेऊ दिलं त्याच दिवशी मी त्यांना वचन दिलं  होतं की , मी इथे फक्त अभ्यासच करेन, माझ्या आई बाबाना त्रास होईल असं मी काहीच करणार नाही . प्रेम करणं पाप नाही हे मी जाणते पण ज्या  गोष्टी शक्यच नाहीत त्या मी करणार  नाही . आज तुझ्या सोबत नवीन नातं जोडताना मला माझ्या अगोदर असलेल्या नात्यांचा  विचार मनात आला , तुला आज हो म्हटली तर मला माझ्या माणसा पासून दूर जावं  लागेल याची कल्पना मला आहे पण हे धाडस माझ्यात नाही . प्रेम करणं सोपं आहे पण निभावण कठीण आहे .  मी तुझ्या प्रेमाचा आदर करते पण मला माफ कर मी तुझ्या प्रेमाचा स्विकार करू शकत नाही .  

मला आयुष्यभर आनंदी बघायच असेल तर माझा  नाद सोड . मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करू दे ..  


मैत्रिणीच्या हाती हे पत्र दिलं . पत्र वाचून तो काय करेल याची कल्पना नव्हती म्हणून घरी निघून गेली . डोक्यात असंख्य विचार होते. मुलांना नकार सहन होत  नाही ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे तिने पाहिलं होतं व वाचलही होतं . 

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर तिची नजर त्याला शोधत होती पण तो कुठे दिसलाच नाही . मनात शंका आली की , याने काही स्व:ताचं  काही बरं  वाईट तरी केलं नसेल ना .. दुसऱ्या दिवशी मित्रांच्या घोळक्यात दिसला पण ही आलेली पाहून दुसरीकडे निघून गेला . चेहऱ्यावरती कसला राग  नव्हता की  प्रेम नव्हतं .. 


 “ विश्वास ” या शब्दाला दोघानी  खरा अर्थ दिला . ज्या विश्वासानी सुमतीने त्याला आपल्या मनातल्या भावना  सांगू शकली व त्याने तो विश्वास सार्थ करून दाखवला . आयुष्याच्या कुठल्याच वळणावर तो तिला भेटला नाही 

त्याग म्हणजे प्रेम  ही प्रेमाची खरी व्याख्या  आहे हे त्याने सिद्ध करून दाखवलं होतं. 

एकतर्फी प्रेम करणाऱ्या व प्रसंगी हिंसक रूप दाखवणाऱ्या मुलांकडे पाहून तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मुलाला सुमती आज मनापासून थॅंक यू  बोलून गेली ..

४ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template