मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

रियुनियनमधील प्रभावी योगनिद्रा

रियुनियनमधील  प्रभावी योगनिद्रा 

  महात्मा गांधी विद्यालय २०१२ सालची दहावीची बॅच परत एकदा खऱ्या अर्थाने  भेटणार होती  . मागच्या महिन्यात एक औपचारिक भेट झाली  पण कोणालाच मनोसोक्त गप्पा मारता आल्या नव्हत्या म्हणून सर्वांच्या  आग्रहाखातर  परत एकदा निवांत वेळ काढून भेटण्याचे ठरले होते . लोणावळ्यामध्ये एक दिवसांकरिता बंगला बुक करण्यात आला  होता . शुभदा लोणावळ्याला जाण्यासाठी व आपल्या मित्र - मैत्रिणीना  भेटण्यासाठी उत्सुक होती पण मनामध्ये थोडंसं  दडपण होतं . मागच्या वेळी भेट झाली त्यावेळी भेटलेली मित्र  मंडळी शिष्ट व आपल्याच तोऱ्यात वावरणारी वाटली पण तिच्या खास मैत्रिणीच्या  म्हणजे सीमाच्या आग्रहाखातर ती जायला तयार झाली  . 

सर्वजण  सकाळी दहा वाजता  नियोजित  ठिकाणी भेटले . बंगल्याचं बुकिंग होतं  त्यामुळे सर्वानी आपलं सामान ठेवून दिलं . सर्वांची औपचारिक भेट झाली . मागच्या वेळी जो अवघडलेपणा होता तो बराच कमी झाला होता .  जुन्या आठवणी निघाल्या , शाळेतल्या गमती -जमती  आठवून सर्वजण मनसोक्त हसले . सर्वांचाच  बालपणीचा काळ सुखाचा होता . आता प्रत्येकजण कामात गुंतला आहे . तिथे जमलेल्या प्रत्येकाने आपण कामात किती व्यस्त असतो , दिवसभराचा तणाव व त्यामुळे तब्येतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलत होता . रात्रीची जेमतेम सहा तासांची झोप होते त्यातून मध्येच ऑफिसचे फोन चालू असतात . सर्वांच्या बोलण्यावरून जाणवत होतं कि प्रत्येकजण तणावामध्ये जगत आहे . संद्याकाळी सर्वानी फेरफटका मारला व रात्री जेवणानंतर एक अनोखा गेम खेळायला सुरुवात झाली . 

गेम असा होता कि , शाळेत असताना शिक्षक दिनादिवशी आपण शिकवलं त्याप्रमाणे समोर येऊन काहीतरी शिकवायचं असं  ठरलं . शाळेत असताना जसं  सर्वाना टेन्शन आलं होतं  तसंच  आजही आलं होतं पण तसं  न दाखवता सर्वजण एकमेकांची मज्जा घेत होते . हसत खेळत कार्यक्रम पुढे सरकत होता . 

आता शुभदा समोर आली . ती काय नवीन  शिकवणार याकडे सर्वांचे लक्ष  लागून होते . शुभदा बोलली ," आज मी तुम्हाला " योगनिद्रा " शिकवणार आहे . सर्वजण बोलायला लागले "आता आम्ही  योगा   करणार नाही , जर तू आता  निद्रा म्हणजे आम्हाला झोपायला सांगणार असशील तर आम्ही अजिबात झोपणार नाही . "शुभदा हसून  बोलली ," तुम्हाला योगासनं  किंवा झोपायचं नाही . आज जी निद्रा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमचा ताण कमी करणारी आहे . तुमच्या या धावपळीच्या  जीवनात तुम्हाला वरदान ठरू शकेल अशीच आहे .  

  योग निद्रा म्हणजे "जाणीवपूर्वक झोपणे". योग निद्रा त्वरित रिचार्ज करते आणि तुमच्यामध्ये अविश्वसनीय शांतता आणि स्पष्टता आणते.शरीर, मन व भावना नियंत्रित करण्यासाठी या क्रियेचा प्रभावी वापर होतो.जसे लांबवर गाडी चालवून गेल्यानंतर गाडीचे इंजिन बंद करून त्याला थंड होऊ देणे गरजेचे असते त्याचप्रमाणे  आपल्या शरीराला योगनिद्रेद्वारा थंड करणे जरुरीचे आहे. योगनिद्रा आपल्या संपूर्ण शरीर-प्रणालीला शिथिल करते

योगनिद्रेमध्ये आपण जागृतपणे आपले लक्ष शरीराच्या विविध अवयवांकडे नेतो. यामुळे त्या अवयवात असलेल्या नसांना चालना मिळते. योगनिद्रा   तणाव आणि चिंता दूर करते   शरीराला टवटवीत करते  निद्रानाश दूर करते शुभदा अगदी पीटीच्या  सरांच्या आवाजात बोलली ,"मी आता  तुम्हाला अंक देते त्याप्रमाणे कृती करा.. " 

सर्वानी माना  डोलावल्या  

शुभदाने  शांतपणे  अंक देण्यास सुरुवात केली ," एकला शवासन या आसनामध्ये  म्हणजे पाठीवर सरळ झोपा.डोळे बंद करा आणि शिथिल व्हा. थोडे खोल श्वास आत घ्या आणि सोडून द्या. हळू, खोल आणि आरामशीर श्वास घ्या. 

जर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना, होत असतील तर तुमचे आसन जरा बरोबर करून घ्या 

 दोनला हळुवारपणे आपले लक्ष आपल्या उजव्या पावलाकडे घेऊन जाण्याने सुरुवात करा. आपल्या पावलाला शिथिल करता करता आपले लक्ष तिथेच काही सेकंद राहू द्या. नंतर आपले लक्ष हळुवारपणे वरच्या दिशेने नेत उजव्या गुडघ्यावर आणा, मग उजवी मांडी आणि उजवे नितंब (पुन्हा काही सेकंद लक्ष तेथेच राहू द्या). आपल्या संपूर्ण उजव्या पायाला जागृतपणे अनुभवा. हीच प्रक्रिया डाव्या पायाबरोबर करा.

तीनला अशाच प्रकारे आपले लक्ष आपल्या शरीराच्या सर्व भागाकडे न्या: लिंग, उदर, नाभीचा भाग, छाती, उजवा खांदा आणि उजवा हात, त्याच्यानंतर डावा खांदा आणि डावा हात, गळा, चेहरा, डोके आणि डोक्याच्या वर.

तीन अंकानंतर   जवळ जवळ पंधरा मिनिटानंतर  शुभदाणे चार अंक दिला 

चारला  एक खोल श्वास घ्या आणि शरीरातील संवेदनांबाबत जागृत व्हा आणि या अवस्थेत काही मिनिटे आराम करा.

 पाचला आता आपले शरीर आणि आसपासचा परिसर याबाबत जागृत व्हा, आपल्या उजव्या कुशीवर वळा आणि काही मिनिटे तसेच पडून रहा.

 तुम्हाला हवा असेल  तेवढा वेळ घ्या, सावकाशपणे उठून बसू शकता, आणि जेंव्हा उघडावेसे वाटतील तेव्हा हळुवारपणे आणि सावकाश आपले डोळे उघडा.

शुभदाने असे सांगितल्यावर सुद्धा  काहीजणं डोळेबंद करून शांत पडून होते. काही जणं घोरत होती .  जेंव्हा डोळे उघडले गेले त्यावेळी सर्वाना वेगळीच अनुभूती मिळाली होती . पंधरा वीस मिनिटांच्या या योगनिद्रे मध्ये  सात आठ तासांची झोप पूर्ण झाली असं  वाटत होतं . 

शुभदाने घेतलेल्या या शाळेतल्या एका शिकवणी मुळे  सर्वजण प्रभावीत झाले .योग हे अनुभूतीचे शास्त्र आहे हे शुभदाने सर्वाना पटवून दिले .  आज झालेल्या या रेयूनियन मुळे व योगनिद्रेमुळे सर्वांच्या धावपळीच्या व व्यस्त जीवनाला एक नवी दिशा मिळाली . 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template