अनोखी वटपौर्णिमा
प्रिया आणि रोहित हे आदर्श जोडपं. दोघांची जोडी म्हणजे लाखात एक, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा.
या आदर्श जोडप्याचे गुपित आहे यांची वटपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत..
लग्न झाल्यानंतर जेंव्हा पहिली वटपौर्णिमा आली त्या दिवशी प्रियाने वडाचीपूजा केली व कडक उपवास केला. रोहित हसत हसत बोलला.."आता सात जन्म माझी काही सुटका नाही..!"
प्रिया बोलली," सुटका करायला मी तुला थोडेच बांधून ठेवले आहे ...आपण दोघे या दिवशी स्वतःला अपडेट करायचं म्हणजे आपलं नातं एकमेकांना बंधनकारक वाटणार नाही.."
" म्हणजे..?" रोहितने आश्चर्याने विचारले
" आपण दरवर्षी याच दिवशी आपल्याला एकमेकांच्या खटकणाऱ्या गोष्टी एका कागदावर लिहायच्या व तो कागद एकमेकांना द्यायचा. त्याप्रमाणे आपण वडाच्या झाडा खाली वचन द्यायचं व आपल्यात प्रामाणिक बदल करायचे म्हणजे तुझा त्रास मला नाही व माझा त्रास तुला नाही.. कशी वाटली माझी कल्पना.."
" अश्या गोष्टी करायला वटपौर्णिमेच्या दिवसाची काय गरज आहे, आपण प्रत्येक वेळी बोलून त्या करू शकतो."
" नवीन नवीन या गोष्टी मजेशीर वाटतात पण सतत बोलून त्या बंधनकारक वाटतात व त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. हीच गोष्ट जर आपण एखादे व्रत म्हणून स्वीकारले तर ते प्रामाणिकपणे पार पडेल."
रोहितला प्रियाची कल्पना मनापासून आवडली
" पुढच्या सात जन्माचं माहीत नाही पण या जन्मी तरी आपण आनंदात राहू.."
मागील तीस वर्ष हे जोडपं याप्रमाणे हे व्रत करत आहे.
पदरात पडले पवित्र झाले असे न म्हणता स्वतःला अपडेट करत नात्यातील वीण घट्ट करत आहेत.
Mast idea
उत्तर द्याहटवाअतुट प्रेमाचे नाते
हटवाMast ekdum
उत्तर द्याहटवा