आज आनंदच्या शाळेत पालक मीटिंग होती. सहामाही परीक्षेत मिळालेले गुण व परीक्षेचे पेपर दाखवण्यात आले होते . या वेळी आनंद चक्क गणिताच्या पेपरमध्ये नापास झाला होता. आनंदचे हे गुण पाहून त्याच्या आई बाबाच्या पायाखालची जमीन सरकली. शाळेतून निराश होऊन तिघे घरी आले, रस्त्यात कोणीच कोणाशी बोलले नाही. घरात येताच बाबा रागावून बोलले "काय आनंद, एवढे कमी गुण? काय करतोस तू दिवसभर?"
आनंद निराश होऊन बोलला ," बाबा, मी खूप प्रयत्न केला होता, पण गणितच कळत नाहीय मला."
आनंदची आई रागातच बाबांना बोलली ,"सुनील, तू कधी त्याला बसवून अभ्यास घेतोस का? फक्त ओरडून चालणार नाही ना."
" मी फक्त ओरडतो त्याला? तूच तर दिवसभर टीव्ही लावून ठेवतेस, त्याला खेळायला सोडतेस, मोबाइल देतेस ..अभ्यास करायला कधी बसवतेस?
"माझं तो कुठे ऐकतो ? माझ्याजवळ तो बसतच नाही . मी किती वेळा सांगितलंय की त्याला कोचिंग क्लास लावूया, पण तुला ते पटतंय का?
"कोचिंग क्लासची गरज नाही. तिथे जाऊन काय दिवे लावतात ते मला माहीत आहे. तू मला शिकवू नको"
आनंदच्या आई - बाबामध्ये खूप वाद होतात.
आनंद रडतच बोलतो ,"आई, बाबा, प्लीज भांडू नका. मी प्रयत्न करतोय पण मला गणित कळत नाही.मी तरी काय करू.."
मुलाचा केविलवाणा चेहरा पाहून दोघे शांत होतात पण धुसपुस चालूच असते. घरात कोणीच कोणाशी धड बोलत नव्हते.
आनंद इतर विषयात चांगला होता पण गणित विषय त्याला खूप किचकट वाटायचा . घरी आई बाबा शिकवत होते पण त्याला काहीच कळत नव्हते.
एके दिवशी अचानक आनंदची मावशी घरी आली त्यावेळी आई आनंदचा गणिताचा अभ्यास घेत होती व त्याची आकडेमोड चुकली म्हणून त्याला ओरडत होती.
मावशी आईला बोलली ," अगं, त्याला असं ओरडशील तर त्याला गणिताची आवड कधीच निर्माण होणार नाही, गणिताची गोडी लागेल असं काहीतरी कर ना.."
" अगं, मठ्ठ आहे हा..याला कितीही समजावून सांगितले तरी कळत नाही...काय करणार काहीच कळत नाही.."
" याला वैदिक गणित शिकव ना..गणिताची गोडी लागेल याला. माझा मंदार असाच होता मी त्याला वैदिक गणिताचा क्लास लावला. आता तो गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवतो."
" हे कसलं गणित आहे..? कोण घेतं याचा क्लास ?"
" गणित सोपं करून सांगणारी गणिताची भारतीय पद्धत आहे .
गणिताचे आकडे आणि संख्यांचा खेळ मुलांना नेहमीच अवघड वाटतात तासन् तास घालवूनही उत्तर सापडत नाही.अभ्यासात वेळ कमी आणि गणितात वेळ जास्त लागतो. मुलं त्यामूळे कंटाळतात व गणिताचा बाऊ करतात .वैदिक गणितामुळे झटपट आणि सोप्या सूत्रांनी गणिताचे प्रश्न सोडवता येतात.वेळेची बचत होते अभ्यासात कमालीची गती आणि आत्मविश्वास वाढतो.
या पद्धतीमुळे परीक्षेत जलद गतीने उत्तरं शोधता येतील.
स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च गुण मिळवता येतील
गणिताची भीती दूर करून मजेदार पद्धतीने गणित शिकता येईल.
माझा मंदार स्कोलरशिप परीक्षेमध्ये शाळेत पहिला आला. कितीही अवघड गणित तो चुटकी सरशी सोडवतो. शाळेत बाई गणित सोडवायच्या आधी याचे गणित सोडवून तयार असते."
" अरे वा...याची शिकवणी कोण घेतं..?"
" माझी मैत्रीण कृत्तिका घेते, खूप छान शिकवते...."
" चल आपण लगेच तिच्याकडे जाऊ.."
दुसऱ्या दिवशी पासून आनंदाचा क्लास चालू झाला. अगदी एक महिन्यात चांगलाच फरक पडला. जो मुलगा गणिताचा अभ्यास करायला टाळाटाळ करायचा तो झटपट गणितं सोडवत होता. आनंदाच्या वागण्यात बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास वाढला होता. पुढच्या चाचणी परिक्षेत आनंदला गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले.
आनंदचे आई बाबा खूष होते. कृतिकाच्या वैदिक गणित क्लासमुळे आनंदच्या आयुष्यात आनंदच भरला होता.
गणिताची गोडी लावणारा हा क्लास मुलांच्या आयुष्यात आत्मविश्वास भरतो.
" कृत्तिका सोबत वैदिक गणित सोपं करून सोडवा, आत्मविश्वास वाढवा!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment