आज आषाढ शुद्ध नवमी, आजची तिथी कांदेनवमी म्हणून ओळखली जाते. कारण इथून पुढे म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास सुरू होणार असतो. या महिन्यात कांदा लसूण वर्ज्य केले जाते. म्हणून चातुर्मासाआधी ते संपवण्याची केलेली तजवीज म्हणजे कांदेनवमी.
यादिवशी कांदे पोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार कांद्याचे पदार्थ बनवून मेजवानी करण्याची प्रथा आहे.
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे कथा असते त्याप्रमाणे कांदेनवमीची कथा अशी आहे:
एके काळी एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी शेती नव्हती, पण तो त्याच्या शेतात कांदे पिकवायचा. एकदा त्याच्या शेतात कांदे पिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण त्याच्या पीकाच्या वेळेवर पाऊस आला नाही, त्यामुळे त्याचे कांदे नीट वाढू शकले नाहीत.
शेतकरी खूप निराश झाला आणि देवाकडे प्रार्थना करू लागला. त्याने देवाला वचन दिलं की, जर त्याला चांगलं पीक मिळालं तर तो देवाच्या नावे कांदे अर्पण करेल. त्यानंतर काही दिवसांनी पाऊस पडला आणि शेतकऱ्याच्या कांद्याचं पीक चांगलं आलं.
शेतकरी खूप आनंदी झाला आणि त्याने आपल्या वचनाप्रमाणे कांदे देवाच्या चरणी अर्पण केले. त्यानंतर त्याने गावातील लोकांना कांदे वाटले आणि सण साजरा केला. ह्याच दिवशी कांदे नवमीचा सण साजरा केला जातो.
ह्या दिवशी लोक देवाची पूजा करतात आणि कांदे अर्पण करून देवाचे आभार मानतात. कांदे नवमीच्या दिवशी कांद्याचे विविध पदार्थ बनवले जातात आणि त्यांचा आनंद घेतला जातो.
शास्त्रीय कारण हे आहे की ,कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात.
मात्र सद्यस्थितीत म्हणाल, तर कांदा-लसणाशिवाय आपले पान हलत नाही. चमचमीत पदार्थ करायचे झाले की त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे त्यांना शरण जाणे ओघाने आलेच. त्यामुळे कांदेनवमीला कांदे भजीचा फडशा पाडून परत कांदा लसूण खाणारे लोक आहेच. अशावेळी किमान सणवारी पथ्य पाळावे असा नेम आपण नक्कीच करू शकतो. आपल्या सणांचे पावित्र्य आपण जपले नाही तर पुढच्या पिढीला कोण या गोष्टींचे महत्त्व सांगणार?
खूप छान माहिती दिली आहे
उत्तर द्याहटवा