रामरक्षा स्तोत्र
रामरक्षेचे महत्त्व आणि माझा अनुभव
मनुष्याच्या जीवनात संकटं अनाहूतपणे येतात. अशा वेळी आपण काहीतरी शोधत असतो—जे आपल्याला आधार देईल, बळ देईल आणि पुनर्प्राप्तीच्या मार्गावर नेईल. माझ्या आयुष्यातही एक असा प्रसंग आला, ज्याने मला रामरक्षेचे खरे महत्त्व शिकवले.
मागच्या वर्षी माझ्या गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाली होती .तपासणी केल्यानंतर समजले की माझ्या गुडघ्याचे लिगामेंट टेअर झाले आहेत आणि तेही high grade tear. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. अशा वेळेस मनात भीती, निराशा आणि असह्यता दाटून आली होती . शारीरिक वेदनेसोबत मानसिक अस्थिरता देखील जाणवू लागली होती.
त्याच वेळी माझ्या वाचनात एक व्हॉट्सअप वरती एक अनुभव सांगणारा लेख वाचनात आला . पुण्याची एक नर्स होती व तिच्या शरीरावर पांढरे डाग होते. खूप उपचार केले पण कोणत्याच औषधाचा उपयोग होत नव्हता. तिला एका जाणकार व्यक्तीने रामरक्षा म्हणण्याचा सल्ला दिला. तिने हा नियम मनापासून चालू ठेवला . काही दिवसातच तिला फरक जाणवला व काही वर्षात तिचे डाग पूर्णपणे निघून गेले. त्या नर्सने खूपच सुंदर शब्दात वर्णन केले होते की, वाचून अंगावर शहारे आले.
त्या माझ्या स्थितीत कोणी काही सांगितले की मी ते करून बघत असे . काहीही करून मला बरे व्हायचे होते
आधी तर हे एक धार्मिक उपचार वाटले, पण मनाला आधार हवा होता. मी रोज शक्य होईल तेवढी रामरक्षा स्तोत्र पाठ करायला सुरुवात केली. संध्याकाळी रामरक्षेचा शांत जप माझ्या मनात एक विलक्षण स्थैर्य निर्माण करू लागला. गुडघा दुखत होता. चालणेही शक्य नव्हते , पण मन थोडे थोडे बळकट होत गेले .
दोन महिन्यांनी, जेव्हा डॉक्टरांनी दुसऱ्यांदा MRI करण्याचा सल्ला दिला, तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडली – माझा high grade tear आता low grade tear मध्ये रूपांतरित झाला होता. डॉक्टरही थोडेसे आश्चर्यचकित झाले, कारण अशी सुधारणा सहज होत नाही. शास्त्रशुद्ध उपचार आणि मानसिक बळ या दोन्हीचा हा प्रभाव होता, पण त्यात रामरक्षेचा जप हा एक अदृश्य शक्ती म्हणून होता, हे मी नक्की मानते.
रामरक्षेचा संबंध मणिपूर चक्राशी लावता येतो. मणिपूर चक्र हे आपल्या नाभीच्या आसपास असते, आणि ते आत्मविश्वास, इच्छाशक्ती व ऊर्जा यांचं केंद्र मानलं जातं. रामरक्षेचा जप हा केवळ एक धार्मिक क्रिया नसून, तो आपल्या ऊर्जास्रोतांना जागृत करतो. जेव्हा आपण श्रद्धेने आणि मनःपूर्वक रामरक्षा म्हणतो, तेव्हा मणिपूर चक्र सक्रीय होतं, आपली चैतन्यशक्ती वाढते आणि शरीरातील पुनर्प्रक्रिया जलद होते.
रामरक्षा स्तोत्रामध्ये “रामो राजमणिः सदा विजयते” हे वाक्य आहे. ही ओळ केवळ विजयाचा दावा करत नाही, तर प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आपल्यात असलेली शक्ती जागृत करते. आज जेव्हा मी त्या प्रसंगाकडे मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटते की केवळ औषधं नव्हे तर त्या अध्यात्मिक उर्जेचा हात देखील मला बरे होण्यास मदत करणारा ठरला.
रामरक्षा म्हणजे केवळ एक स्तोत्र नाही, ती एक संरक्षण कवच आहे. संकटं येतात, पण रामरक्षेचा जप मनात असला, तर आपोआप वाट सापडते, बळ मिळते, आणि चमत्कार घडतो — अगदी माझ्या आयुष्यात घडल्यासारखा!
तुमच्या जिवनात काही व्याधी, संकट असेल किवा तुमचे जिवन आनंदात जात असले तरी रोज किमान एकदा तरी पठण करा तुम्हाला नक्की प्रचिती येईल.
खाली रामरक्षा स्तोत्र देत आहे .
अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः ।
श्री सीतारामचंद्रो देवता ।
अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः ।
श्रीमान हनुमान कीलकम ।
श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः ।
अथ ध्यानम्:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं,
पीतं वासो वसानं नवकमल दल स्पर्धिनेत्रम् प्रसन्नम ।
वामांकारूढ़ सीता मुखकमलमिलल्लोचनम्नी,
रदाभम् नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलम् रामचंद्रम ॥
राम रक्षा स्तोत्रम्:
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं ॥2॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥
रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुति ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरु रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृताः ॥8॥
जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामअखिलं वपुः ॥9॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृति पठेत ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥10॥
पातालभूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन ।
नरौ न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत ।
अव्याहताज्ञाः सर्वत्र लभते जयमंगलम् ॥14॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान स नः प्रभुः ॥16॥
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥
शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशा वक्ष याशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम ॥20॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन् मनोरथान नश्च रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥
रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥
इत्येतानि जपन नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ॥25॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं,
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं,
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम ॥26॥
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम,
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम,
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
श्रीराम चन्द्रचरणौ मनसा स्मरामि,
श्रीराम चंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीराम चन्द्रचरणौ शिरसा नमामि,
श्रीराम चन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मज ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥31॥
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम ॥34॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥35॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥36॥
रामो राजमणिः सदा विजयते,
रामं रमेशं भजे रामेणाभिहता,
निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं,
रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलयः,
सदा भवतु मे भो राम मामुद्धराः ॥37॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥
Jay shree Ram
उत्तर द्याहटवा