काल आपल्या मंडळामध्ये शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांचा व त्यांच्या मातेसाठी जो कार्यक्रम झाला तो विशेष प्रशंसनीय आहे .आपल्या मंडळात सहभागी असणाऱ्या बहुतांश महिला गृहिणी आहेत . महिलांचे भावविश्व हे तिच्या मुला भोवती गुंफलेले असते . मूल ज्यावेळी दहावी किंवा बारावीला असते त्यावेळी मुलांपेक्षा त्यांच्या आईची कसोटी अधिक असते . वर्षभर मुलाच्या आरोग्याची , मानसिकतेची, काळजी ती माता घेत असते .
काल जो कार्यक्रम झाला त्यामुळे मुलांचा सन्मान झालाच पण खऱ्या अर्थाने आईला मिळालेली ती सन्मानाची पावती होती . काल ज्या मातेचा व मुलांचा सन्मान झाला त्यांच्यासाठी कालचा दिवस संस्मरणीय होता .
असा कार्यक्रम कामिटीने ठेवला त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक . मुलांचा व त्यांच्या मातेचा सन्मान ही पाहणाऱ्याला खूप सामान्य गोष्ट वाटली असेल पण अश्या कार्यक्रमाचा आपल्या मेंदूशी खूप जवळचा संबंध आहे . हा झालेला सन्मान या मुलांसाठी व त्यांच्या मातेसाठी किती फलदायी ठरणार आहे ते पाहू ..
डोपामाइन हा मेंदूतील एक रसायन आहे जो न्यूरोट्रांसमीटर म्हणून कार्य करतो आणि आपल्या शरीरात अनेक महत्वाच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होतो. जेव्हा आपल्याला काही चांगले अनुभव मिळतात, तेव्हा डोपामाइनचा स्राव होतो.
आपण एखाद्या सत्कार समारंभात सहभागी होतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळवतो तेव्हा आपल्या मेंदूला ते अनुभव खूप आनंददायक वाटतात . आनंददायक अनुभवांच्या प्रतिसादात, मेंदूत स्थित वेंट्रल टेगमेंटल एरिया (VTA) मध्ये डोपामाइन स्रावित होते. VTA हा मेंदूतील एक भाग आहे जो बक्षिस प्रणालीचा एक भाग आहे.
हे भाग डोपामाइनच्या स्रावामुळे सक्रिय होतात, ज्यामुळे आपल्याला आनंद व समाधानाची भावना येते. त्यामुळे आपल्याला पुढील वेळी असं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.
डोपामाइनचा स्राव आपल्या चांगल्या अनुभवांशी संलग्न असल्याने, सत्कार समारंभात मिळणाऱ्या प्रशंसेमुळे, सन्मानामुळे किंवा आदरामुळे मेंदूत डोपामाइन स्रावित होतो आणि आपण आनंदी व प्रेरित होतो.
डोपामाइन शिकण्याच्या प्रक्रियेत आणि स्मरणशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हे लक्ष केंद्रीकरण सुधारण्यास मदत करते आणि नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करते.
डोपामाइन आपल्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वपूर्ण आहे. हे स्नायूंच्या हालचालींच्या समन्वयात मदत करते आणि मोटर स्किल्स सुधारण्यास मदत करते. डोपामाइनच्या योग्य स्तरामुळे आपल्या मानसिक स्वास्थ्याची देखभाल होते. याचा कमी स्तर डिप्रेशन आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांशी संलग्न असू शकतो.
डोपामाइन फोकस वाढवण्यासाठी आणि अटेन्शन सुधारण्यासाठी मदत करते. हे आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास सहाय्यक ठरते.
डोपामाइन आपल्या बक्षिस प्रणालीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. हे आपल्याला चांगल्या वर्तणुकीसाठी प्रोत्साहित करते आणि वाईट वर्तणूक टाळण्यास मदत करते.
डोपामाइनच्या योग्य स्तरामुळे मूड स्थिर राहतो आणि आपल्या भावना नियंत्रित राहतात.
काल झालेल्या कार्यक्रमाचा आई व मुलांवर दोघांवर खूपच सकारात्मक परिणाम झाला आहे .
कालच्या कार्यक्रमामुळे आई आणि मुलाचे संबंध अधिक घनिष्ठ झाले त्यांच्यात परस्पर आदर आणि प्रेम वाढला . आई आणि मुलाला एकत्रितपणे आनंद साजरा करण्याची संधी मिळाली त्यांच्या नात्यातील बंधन अधिक मजबूत झाले . बक्षीस समारंभामुळे दोघांनाही एकमेकांना प्रोत्साहन देण्याची प्रेरणा मिळाली . आता पुढील वाटचालीसाठी आई मुलाला प्रेरित करेल , आणि मुलगा आपल्या आईच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मन लावून मेहनत करेल .
अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळनारा आनंद केवळ व्यक्तिगत नसून, तो मंडळातील प्रत्येक सदस्याला सकारात्मक परिणाम देवून गेला . विशेषतः पुढील वाटचालीसाठी आई आणि मुलावर याचा खूपच चांगला परिणाम होईल् त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कमिटीला मनापासून धन्यवाद .
Very nice blog
उत्तर द्याहटवा