दुपारच्या वेळी बेल वाजली तशी विभा झोपेतून गडबडून जागी झाली . आता यावेळी कोण आलं असेल असा विचार करत विभाने दरवाजा उघडला तर दारात पुष्कर उभा होता . पुष्करचा चेहरा उतरला होता , आईला बाजूला सारत पुष्कर सोफ्यावरती आडवा झाला . विभा काळजीच्या स्वरात पुष्करची विचारपूस केली त्यावेळी तिला कळलं की , पाठ प्रचंड दुखत होती त्यामुळे ऑफिस मधून लवकर आला आहे .
पुष्कर हा विभाचा एकुलता एक मुलगा . अभ्यासात प्रचंड हुशार . दहावी व बारावीला बोर्डात पहिला आला होता . पुढे इंजिनीरिंग साठी त्याला त्याच्या आवडत्या विभागात मोठ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले . कॉलेज मधून कॅम्पस सिलेक्शन झाले . पुष्करचं पॅकेज वाचून विभाचे डोळेच फिरले होते. एवढ्या लहान वयात मुलाने मोठी भरारी घेतलेली पाहून विभाचा उर अभिमानाने भरून आला होता .
पुष्करला तासंतास लॅपटॉप वरती काम करावं लागत असे त्यामुळे हल्ली थोडी पाठ दुखत होती पण कामाच्या व्यापात त्याने ते अंगावर काढले . कधी जास्तच पाठ दुखली तर एखादी पेन किलर घेत असे . विभाने एक दोन वेळा त्याबद्दल टोकलं पण मला डॉक्टरकडे जाण्यास वेळ नाही हे कारण सांगून वेळ मारून नेली .
विभाने एकेदिवशी पाठ खूपच दुखत होती म्हणून पुष्करला बळजबरी डॉक्टर कडे घेऊन गेली . डॉक्टरने औषधे दिली व पाठीचे व्यायाम करायला सांगितले . तेवढ्या पुरती पाठ दुखायचे थांबली . वेळ मिळतच नाही म्हणून व्यायाम मात्र करायला कधी जमलाच नाही .
आज विभाने पुष्करला परत डॉक्टरकडे नेले , एक्सरे काढला त्यावेळी कळले पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप आला आहे . हा त्रास कमी करण्यासाठी महिनाभर तरी पुष्करला पूर्ण आराम करणे गरजेचे आहे . पाठीचा मनका सरळ ठेवून पूर्ण बेडरेस्ट सांगितली प्रसंगी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले . वेदना एवढ्या असह्य होत्या कि , पुष्करला आराम कारण्यावाचून पर्यायच नव्हता .
आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्वास घ्यायला वेळ नसतो त्यामुळे योग करण्याचा योग कधी जुळूनच येत नाही!
एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या लोकांसाठी " डेस्क योग " हा योगाचा प्रकार असतो याची कोणाला माहितीच नसते .
डेस्क योग म्हणजे ऑफिस मध्ये किंवा घरून काम करत असताना करता येणारी सोपी आणि प्रभावी योगासने असतात . ही आसने विशेषतः ताठरपणा ,पाठदुखी , मानदुखी आणि ताण कमी करण्यासाठी उपयुक्त असतात .
डेस्क योग मधील आसने करायला अतिशय सोपी असतात त्यामुळे आपण ती कुठेही बसून सहजच करू शकतो .
काहीवेळा सहज व सोपी असल्यामुळे असे आसन प्रकार करायला लोकं कानाडोळा करतात पण याचा सर्व नित्य नियमाने केल्यास खूपच प्रभावी परिणाम दिसून येतात .
यु ट्यूब वरती डेस्क योग सर्च केल्यास आपल्याला या आसनाचे प्रात्यक्षिक बघायला मिळेल
तुम्ही कितीही हुशार असा , गलेलठ्ठ पॅकेज असेल पण तुम्ही पुष्कर प्रमाणे बिछायन्याला खिळून असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही
" सर सलामत तो पगडी पचास "
यातील काही आसन प्रकार खाली देत आहे ,तो नित्यनियमाने केल्यास खूप चांगले परिणाम अनुभवता येतील
1. सीटेड कैट-काऊ स्ट्रेच (बैठकीत मांजर-बैल)
• आपल्या खुर्चीवर बसा, पाय जमिनीवर ठेवा.
• हात आपल्या मांडीवर ठेवा, श्वास घ्या आणि छाती पुढे काढा (बैल पोझ).
• श्वास सोडा आणि पाठीला गोलाकार करा (माजरा पोझ).
• हे ५-१० वेळा पुन्हा करा.
2. सीटेड फॉरवर्ड बेंड (बैठकीत पुढे वाकणे)
• आपल्या खुर्चीवर बसा, पाय जवळ ठेवा.
• हळू हळू पुढे वाका आणि हात जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा.
• ५-१० श्वास घेऊन हळू हळू वर या.
3. नेक स्ट्रेच (मान स्ट्रेच)
• आपले डोके हळू हळू एका बाजूला झुका, दुसरीकडे खांदे स्थिर ठेवा.
• ५-१० श्वास घ्या आणि दुसऱ्या बाजूला करा.
• पुढे आणि मागे मान हलवा.
4. सीटेड ट्विस्ट (बैठकीत वळण)
• आपल्या खुर्चीवर बसा, पाय ठेवा.
• आपल्या कंबरेपासून वाका आणि एका बाजूला वळा.
• हाताने खुर्चीला धरून ठेवा.
• ५-१० श्वास घ्या आणि दुसऱ्या बाजूला करा.
5. ईगल आर्म्स (गरुड बंध)
• आपल्या खुर्चीवर बसा, पाय ठेवा.
• एक हात दुसऱ्या हातावर वळवा, आणि कोपराच्या खाली घट्ट बंध घाला.
• ५-१० श्वास घ्या आणि हात बदलून करा.
6. स्ट्रेसबस्टर पोझ (ताण कमी करणारी पोझ)
• आपल्या खुर्चीवर बसा, पाय जमिनीवर ठेवा.
• हात सरळ वर करा, श्वास घ्या.
• हळू हळू पुढे वाका, श्वास सोडा.
• हे ५-१० वेळा पुन्हा करा.
हे आसन आपल्याला कामाच्या दरम्यान ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
डेस्क योगा मस्त च.
उत्तर द्याहटवा