मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

स्वातंत्र्य दिन भाषण

सन्माननीय मुख्य आतिथी ,  आदरणीय शिक्षक वर्ग , प्रिय विद्यार्थी  मित्र ,आणि माझ्या भारतभूमीच्या कणखर देशवासियानो सर्वाना माझा  नमस्कार 

आज  आपला ७८   वा स्वातंत्र्यदिन आहे आणि आपण एका स्वतंत्र राष्ट्राचा एक भाग असल्याचा आपल्याला अभिमान वाटत आहे . आज मी सर्वांसमोर बोलण्याचे धाडस करत आहे कारण मी स्वतंत्र्य भारताचा नागरिक आहे .मला  भाषण स्वातंत्र्य आहे. मी माझी मतं  माझे विचार सर्वांसमोर मांडू शकतो मला आता कोणाची भीती नाही  आम्हाला कोणाची गुलामगिरी करायची नाही. पण ७८  वर्षांपूर्वी आपण ब्रिटीश सरकारचे गुलाम होतो तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. भारतावर जवळपास 200 वर्षे ब्रिटीशांचे राज्य आहे आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अखंड संघर्षानंतर आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवले.


१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे, कारण या दिवशी भारताने अनेक दशकांच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळवलं. त्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने आपण आज इथे स्वतंत्रपणे उभे आहोत. त्यांच्या बलिदानाला आदरांजली वाहत, आपल्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा सन्मान करत, आज आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एक नवीन संकल्प घेऊ या.

भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकानी बलिदान दिले आहे .

इंग्रजांनी “फोडा आणि राज्य करा” या धोरणाद्वारे आमच्याविरुद्ध कट रचला आणि हळूहळू देशावर ताबा मिळवला. आपल्या देशातील लोक अशिक्षित आणि अडाणी असल्यामुळे इंग्रजांच्या हातून सहज फसले आणि त्यांनी आपल्या राज्यांवर ताबा मिळवला. आम्ही ब्रिटीश सरकारचे स्वस्त गुलाम झालो आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक वर्षे आमच्यावर राज्य केले.

आता आपण शिक्षित आहोत ,फसण्याचा धोका आपल्याला नाही पण समाजात पडणाऱ्या फोडी पासून आपण जागृत  होणे गरजेचे आहे .

गुलामगिरीच्या  काळात महात्मा गांधी,  नेहरू, भगतसिंग , लोकमान्य टिळक , स्वातंत्र्य वीर सावरकर आणि इतर अनेक मान्यवरांच्या लक्षात आले की आपण आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे. पुढे अनेक स्वातंत्र्यलढ्या झाल्या आणि सर्वांनी त्यात सहभाग घेतला. अनेक वर्षांच्या लढ्या, संघर्ष आणि परिश्रमानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले  व एक  स्वतंत्र राष्ट्र बनले. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे पण आता आपण आपला हा लढा आता वेगळ्या प्रकारे चालू ठेवण्याची गरज आहे  . 

आपल्याला आरामात मिळालेल्या स्वातंत्र्याची  कदर केली पाहिजे आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना कधीही विसरता कामा नये.

आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देशाच्या भविष्याच्या दिशेने एक पाऊल उचलू या. "विकसित भारत  " ही आपली स्वातंत्र्य दिनांची थीम आहे . २०४७ पर्यन्त आपल्याला आपल्या देशाला एका  विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवायचे आहे . 


स्वतंत्र राष्ट्राचे नागरिकही त्याप्रती जबाबदारी घेतात. अभिमानाचे राष्ट्र घडविण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. बऱ्याच लोकाना वाटते की , देश स्वतंत्र झाला  आहे आमची देशविषयीची जबाबदरी संपली आहे पण उलट आता आपली जबाबदारी वाढली आहे . आपली कर्तव्य व जबादरी ओळखून वागणे गरजेचे आहे . 

आपण आपल्या देशाची सेवा  करायची म्हणजे   रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे, अधिकाधिक झाडे लावणे, गरजू गरीब लोकांना मदत करणे, वाहतुकीचे नियम पाळणे इत्यादी साधे कार्य करून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जबाबदार नागरिक हा एक मौल्यवान नागरिक असतो.


स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाने मिळवलेला शौर्य आणि शौर्याचा इतिहास जगाला दाखविण्याचा दिवस आहे. या दिवशी आमचे सुरक्षा दल लाल किल्ल्यावर परेड आणि मार्च पास्ट करतात, आम्ही आमची लढाऊ उपकरणे जगाला दाखवतो आणि त्यामुळे भारत जागतिक व्यासपीठावर एक महासत्ता बनतो. विविध शाळा आणि महाविद्यालये देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.


आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याचे आणि बलिदानाचे फळ आहे. हे आपण कधीही विसरू नये. देशभक्ती ही सर्व गोष्टींच्या वर आहे आणि आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांमध्ये देशभक्तीची भावना बिंबवली पाहिजे.

आपण आपल्या तरुण पिढीला आपल्या सैनिकांचा आदर करायला शिकवले पाहिजे आणि त्यांना राष्ट्रीय सुरक्षेमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.  

स्वातंत्र्य दिन हा सुट्टीचा दिवस किंवा दुकानात सेल असेल तर खरेदी करण्याचा दिवस न ठेवता आपली जबाबदारी ओळखून वागणे हा आहे . 

स्वातंत्र्य दिन  साजरे करताना  आपल्या कडून आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे  

 शेवटी, मी पुन्हा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो आणि आशा करतो की एकत्र मिळून आपण एक अद्भुत राष्ट्र निर्माण करू शकू.

जय हिंद 

२ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template