स्तु , स्वतीति - या धातूपासून स्तवन , स्तोत्र हे शब्द तयार झाले आहेत . एखाद्या दैवताची पूजा , स्तुति केली की ती प्रसन्न होते व आपणास भरभरून देते . सामान्य पठणकर्त्यावर प्रेम करते त्याचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे म्हणून प्राचीन काळापासून निसर्गातील पृथ्वी ,आप ,जल , वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे स्तवन केले जाते व त्यांची स्तोत्र पठन करून त्यांना खुष केले जाते . संतानी सामान्य माणसांना भक्ती हा साधा सोपा मार्ग दाखवून दिला आहे .
स्तोत्रामध्ये परमेश्वराकडे त्या निर्गुण निराकार तत्वाकडे पठणकर्त्याने आपल्या मनाची इच्छा व्यक्त केल्या आहेत.
स्तोत्र पठन केल्यास खरंच इच्छा पूर्ण होतात का ..
आजकाल लोक बऱ्याच समस्यांनी ग्रस्त असतात हल्लीचे जीवन जास्त असुरक्षित आणि अस्थिर वाटते लोकांना त्यामुळे जर कुठे आधार मिळाला तर तो हवाच असतो . स्तोत्र पठणाचा हा भक्कम आधार आपल्याला मिळतो . या पठणातूनच आपली इच्छा पूर्ती होते .
मन हे आपल्या इच्छाचे मूळ आहे . मन समर्थ व्हावे मनोबल वाढवावे आत्मविश्वास यावा आणि एकाग्रमनाने ,निष्ठेने, चिकाटीने सातत्याने आपल्या कार्यात व्यग्र व्हावे यासाठी मनःशांतीसाठी हे सूत्र रचली आहेत . काम ,क्रोध, लोभ, मत्सर या षड रिपूवर नियंत्रण ठेवायला पाहिजे . मी-मी हा अहंकार काढून टाकला पाहिजे स्तोत्र भक्ती आणि श्रद्धेनेच म्हणायला हवी नंतरच दैवतांची उपासना करून आपले इच्छित कार्य केले तर कार्यसिद्ध होईलच देवतांची स्तोत्र म्हटली की आपली इच्छित साध्य होते हा आपला गैरसमज असतो ते एक अज्ञान असते स्तोत्रपठण का करावे त स्तोत्रपठनाने अस्वस्थ उदास, निराश, अपयशाने दुःखाने व्याधीने खचलेले मन समर्थ बनते स्तोत्रपठन जर एकाग्रतेने श्रद्धेने केले तर मनोबल वाढते मन कणखर सहनशील बनते आत्मविश्वास वाढतो कामे करायला उत्साह येतो स्तोत्र म्हटल्याने देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला आता मिळणार आहे या विश्वासाने आपले दैनंदिन कार्य मन लावून प्रचंड मेहनत घेऊन आपण ते काम एकाग्रपणे करू शकतो त्यामुळे त्या कामात आपल्याला मनासारखे यश मिळते खरे म्हणजे यासाठी आपण स्तोत्रांचा आधार घेतला पाहिजे. शरीराच्या आरोग्यासाठी मेडिकल किंवा दुकानांमध्ये अनेक औषधे असतात स्तोत्रपठण हे मन निरोगी व आनंदी समाधानी राहण्याचे एक औषध आहे
त्यामुळे फक्त कोणते स्तोत्र कशाकरता म्हणावे एवढे जरी कळले तरी खूप असते स्तोत्रपठण हे त्याचा अर्थ समजून घेऊन केले तर ते अधिक परिणामकारक होऊ शकते असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून आपण या ब्लॉगमध्ये गणपती स्तोत्राचा अर्थ व स्पष्टीकरण काय आहे ते बघणार आहोत.
।। श्री गणेश ।।
गणपती ओंकाराचे सगुण रूप आहे गणपती हा सुखकर्ता ,दुखहर्ता, विघ्नहर्ता, विद्यादाता , वैभवदाता आहे गणपती रिद्धीचा म्हणजेच बुद्धीचा चातुर्याचा आणि सिद्धीचा म्हणजेच ऐश्वर्याचा , वैभवाचा दात आहे . म्हणूनच घराघरातून गणपतीची स्तोत्रे ,आरत्या, भजन नित्यनियमाने म्हटले जात असतात. गणेश हे चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती आहे तो सर्व व्यापी सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी आहे . प्राचीन काळापासून गणेशाची भक्ती सर्व हिंदू संस्कृतीमध्ये होत होती वेदकाळापासून गणपती म्हणजे ब्राह्मणस्पती वाचेचा पती विद्यादाता संघटनाशन करत असल्याचे मानले जात होते म्हणून कोणतेही कार्याची सुरुवात करताना कार्यनिर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून गणेशाची प्रार्थना केली जाते. गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे कार्य निर्विघ्नपणे सुलभतेने पार पडते आणि कार्यात यश प्राप्त होते असा भाविकांचा दृढ विश्वास आहे पूजा करणे म्हणजे त्या देवतेचे गुण आपल्या अंगी बाळगण्याचा एक प्रयत्न करणे असा आहे
संकटनाशन गणपती स्तोत्र
गणेशाची अनेक स्तोत्रे आहेत पण त्यामध्ये सर्वांना परिचित असणारे सहजपणे पाठ करता येणारे स्तोत्र म्हणजे संकटनाशक गणेश स्तोत्र आहे . या स्तोत्राची रचना भगवंतांचे लाडके भक्त म्हणजेच नारद मुनींनी केलेली आहे या स्तोत्रात एकूण आठ श्लोक आहेत त्यापैकी पहिल्या चार श्लोकात गणेशाचे स्तवन केलेले आहे. तर शेवटच्या चार श्लोका मध्ये स्तोत्र पठणामुळे मिळणारे फळ म्हणजे फलश्रुती सांगितलेली आहे . हे स्तोत्र नारद पुराणात समाविष्ट केलेले आहे. अंगीकारलेल्या कार्यात यश मिळावे संकटाचा परिहार व्हावा , कार्य सुलभतेने पार पडावे म्हणून रोज सकाळी स्नान केल्यानंतर ह्या स्तोत्राचे पठण करावे असे सांगण्यात आलेले आहेत.
गणपतीच्या संकटनाशक या स्तोत्रांमध्ये गणपतीच्या 12 नावांचा उल्लेख नारद मुलीने केला आहे . प्रत्येक नावाला एक विशिष्ट अर्थ असून त्या त्या नावाच्या उच्चारणे कार्य सिद्धी होते असा पठणकर्त्यांचा विश्वास वाटतो काम , क्रोध ,लोभ ,मोह,मत्सर आणि मच्छर या षड रिपून गणेशाने आपल्या उदरात दाबून टाकले आहे म्हणून त्याचे पोट मोठे आहे म्हणूनच त्याला लंबोदर हे नाव मिळाले आहे इतरांची अपराध त्याच बरोबर राग लोभ मोह , मद आणि मस्तर या विकारांना संयमाने ताब्यात ठेवलं पाहिजे.
विकट म्हणजेच भयंकर दुष्टकृत्ये करणाऱ्या , वाम मार्गाने जाणाऱ्या लोकांनाही गणेश कडक शासन करतो. पठण करताना स्वतः सदाचारी असावे आणि पापकर्म करणाऱ्यांना ही त्यापासून परावृत्त करावे निदान त्यांच्या त्या वाईट कर्मात आपण सामील होऊ नये त्या दुष्ट लोकांना सहानुभूतीही दाखवू नये
गणेशाला भालचंद्र असे म्हणतात गणेश आणि चंद्राच्या अपराधा बद्दल त्याला शिक्षा दिली पण चंद्र दुखी होऊन गणेशाला शरण गेला शरण आलेल्यांना उदार अंतकरणाच्या विभूती मोठ्या मनाने क्षमा करतात. गणेशाने चंद्रला क्षमा केली आणि त्याला आपल्या भालप्रदेशात स्थान दिले जसे गणेशाचे उदार अंतकरण होते तसे पठण करणाऱ्याचे सुद्धा असले पाहिजे
.
धूम्रवर्ण म्हणजे अग्नीप्रमाणे तेजस्वी वर्ण असलेला गणेश नेहमीच आपल्या तेजाने अपवित्र अमंगल अशा सर्वांचाच नाश करतो पठण करताना सुद्धा अमंगल अपवित्र वर्तनापासून दूर राहिले पाहिजे आणि इतरांकडून होणाऱ्या अमंगल गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत गणेशाच्या 12 नावांमध्ये प्रत्येक नावामध्ये त्याच्या शौर्याचे कधी उदार मनाचे तर कधी अन्याय करणाऱ्याला आक्रमकपणे शासन करण्याचे असे गुण आपल्याला पाहायला मिळतील पठण करताना श्रद्धेने व मनाची एकाग्रता साधून हे गणेशा स्तोत्र म्हणावे गणेशाचे गुण आपले व्यक्तिमत्त्वात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे अर्थात हे सहज सुलभ नाही परंतु प्रयत्न केला तर अशक्य असेही काही नाही म्हणून आजपासून संकटनाशक स्तोत्र पठण करताना गणेशाच्या गुणांचे स्मरण करून चिंतन करूया आणि ते आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करूया हे स्तोत्र म्हटल्याने आपले मनोबल वाढते म्हणून एकाग्र होते आणि आपण करीत असलेल्या कामात अधिक मेहनत करू लागतो त्यामुळे आपणास यश प्राप्ती होते विद्यार्थ्यांना विद्येची प्राप्ती धन इच्छिणाऱ्यांना धनाची पुत्राची इच्छा करणाऱ्यांना पुत्र प्राप्ती आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्याला मोक्ष प्राप्ती होते
सर्व शक्तिमान परमेश्वराची स्तुती केली तर तो खुश होऊन आपल्याला मदत करेल अशा भावनेने मनोबल वाढते परमेश्वरही शेवटी आपलीच निर्मिती आहे त्यामुळे त्याला भाव नाही आल्यास राग व लोभ मत्सर द्वेष प्रेम भक्ती या भावना ही आल्यास परमेश्वर समजा नुसता निर्गुण निराकार आहेत त्याला त्याचा काय उपयोग माझ्या अडचणी संकटे दूर करण्यासाठी त्याचा काही उपयोग नसेल तर असा परमेश्वर असला काय नसला काय दोन्ही सारखेच म्हणून आपण त्याला सगुण साकार केले आहे पुढे त्याला भक्तवत्सल करून ही केले आता तो आपला उपयोगाला येईल
गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )
इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम्||
गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )
Vah chan
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद
हटवाखरंच स्तोत्रांबाबत खूप महत्त्वपूर्ण आणि अतिशय सोप्या शंब्दांमधे माहिती सांगितली आहे
उत्तर द्याहटवा👌👌👍
खूप धन्यवाद
हटवा