ठाण्याच्या हिरानंदांनी मध्ये वैद्य कुटुंब राहत होते . या आधुनिक कुटुंबात सासू आणि सून एकत्र आनंदाने राहत होत्या. सून, कविता, उच्चशिक्षित आणि एका मोठ्या आयटी कंपनीत काम करणारी होती. तिला कामाच्या गडबडीत अनेकदा वेळेचा ताण असायचा, तर तिची सासू, जानकी, पारंपारिक परंपरा आणि धार्मिक विधी पाळणारी होती.
या दोघी वेगवेगळ्या वातावरणात वावरत होत्या , दोघी प्रचंड हुशार होत्याच पण एकमेकिंचा सन्मान करणाऱ्या होत्या . बरेच वेळा कविता सासूबाई ना मोठे निर्णय घेताना सल्ला मागत असे , तर सासूबाई नवीन टेकनोलॉजी वापरण्यात सुनेची मदत घेत असत .
हल्ली कविता खूपच अस्वस्थ असायाची . ऑफिसचा तिला तनाव होता त्यामुळे नेहमी चीड चीड करत असे , . आपल्या सुनेचा तान कमी करण्यासाठी जानकी ताईने सुनेच्या डोक्याला मॉलिश करत - करत बोलल्या , “बाळ, उद्यापासून कार्तिक महिना सुरू होतो. रोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं. यामुळे तुला बरं वाटेल . तुझा कामाचा ताण कमी होईल ”
कविता थोडीसे हसत म्हणाली, “आई, या आधुनिक काळात इतक्या थंडीत उठून स्नान करण्याने काय फायदा होईल? आपले जुने रिवाज आता फार उपयोगाचे नाहीत.” जानकीने शांतपणे हसत उत्तर दिले, “माझं बोलणं धार्मिक असलं तरी त्यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत, हे तुला सांगू का?”
कविता आश्चर्याने म्हणाली, “वैज्ञानिक कारणं? सांग ना आई.”
जानकी म्हणाली, “कार्तिक महिन्यात थंड पाण्यात सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने काही आरोग्यविषयक फायदे मिळतात. पहाटे लवकर उठणे आपल्या शरीराच्या सर्केडियन रिदमला संतुलित ठेवतं, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटतं. थंड पाण्यात स्नान केल्याने रक्ताभिसरण सुधारतं, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील उष्णता संतुलित होते आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.”
कविता अजूनही आश्चर्यचकित होती, “आई, हे खरंच काम करतं का?”
जानकीने पुढे सांगितले, “हो, अगं! आधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे. थंड पाण्यात स्नान केल्याने तणाव कमी होतो. शरीरातल्या कोर्टिसोलच्या पातळीला नियंत्रित ठेवून ते आपल्याला मानसिक शांतता देते. शिवाय, सकाळची स्वच्छ हवा आपल्या श्वसनसंस्थेसाठी चांगली असते. ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी कार्तिक स्नान एक प्रकारचं नैसर्गिक औषध आहे. कार्तिक महिन्यात दररोज पहाटे उठून स्नान करणे, ही एक शिस्त आहे. नियमित शारीरिक कृतीमुळे मनाला स्थैर्य मिळते. मनोविज्ञानात, शिस्तबद्ध जीवनशैलीला मानसिक ताणतणाव कमी करण्याचे साधन मानले जाते. नियमितपणा आत्मविश्वास वाढवतो आणि संयम शिकवतो.”
कविताला आता हे सर्व पटायला लागले होते. ती म्हणाली, “आई, हे मी कधीच विचार केलं नव्हतं. थोडं धार्मिक आणि थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे मला खूपच उपयुक्त वाटतंय. मी उद्यापासूनच सुरुवात करणार.”
जानकीने तिच्यावर समाधानाने हसत, “बाळ, या परंपरेत लपलेला वैज्ञानिक दृष्टिकोन कळला की त्या परंपरांचं महत्त्व जास्त समजतं.”
आणि मग कविता रोज कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करू लागली. तिला शारीरिक ताजेतवानेपणा, मानसिक शांतता, आणि वाढलेली ऊर्जा जाणवू लागली. ती आता आपल्या सासूबाईंच्या पारंपारिक ज्ञानाचा आदर करू लागली होती, कारण त्यामागे वैज्ञानिक सत्य होतं.
यावर्षी कार्तिक स्नान १७ ऑक्टोबर पासून चालू होत आहे . सर्वानी या आपल्या या धार्मिक परंपरेचा सन्मान करून आपले आरोग्य सुधारू या ..
वाह..👍🌹
उत्तर द्याहटवाखूप छान सांगितले आहे.
उत्तर द्याहटवाChan mahiti 👌
उत्तर द्याहटवा