मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

नवरात्री आणि ओटी




“ सीमा, आज अष्टमीचा दिवस आहे आपल्याला देवीची ओटी भरायला जायचे आहे . आज ऑफिस मधून लवकर ये..”

सुशीलाताईने सूनेला आठवण करुन दिली

“ आई , आज आमच्या ऑफिसमध्ये ऑडिट आहे , बघते मला कसा वेळ मिळतो…तुम्ही जाऊन या …कदाचित मला आज जमणार नाही . माझी दसऱ्याची  पण शॉपिंग करायची आहे .”

“ अगं पण …ओटी भर आणि तुला जिथे जयाचं आहे तिथे जा ..” सासूबाई वैतागून बोलल्या 


 “आई, तुम्ही नवरात्रीला ओटी भरायला म्हणत आहात, पण मला असं वाटतं की ही एक अंधश्रद्धा आहे. ओटी भरल्याने खरंच काय फरक पडतो? केवळ काही सुपारी, हळद-कुमकुम याने आयुष्यात काही बदल होईल असं  मला तर वाटत नाही. मला असं वाटतं, आपण प्रगतीशील विचार करायला हवे, या जुन्या परंपरांमध्ये अडकून राहू नये.”


 “सीमा , तुझं म्हणणं योग्य आहे की , प्रत्येक परंपरा तशीच स्वीकारायला नको, पण काही परंपरा त्या काळातल्या जीवनशैलीशी आणि भावनांशी जोडलेल्या असतात. ओटी भरण्याचं तात्त्विक कारण म्हणजे देवीचं पूजन आणि स्त्रीचं महत्त्व मान्य करणं. पूर्वीच्या काळी याच्याद्वारे स्त्रियांना सन्मान दिला जायचा. प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा म्हणून सोडून देण्यापेक्षा ती कशामुळे सुरू झाली याचा विचार करावा लागतो. ओटी भरणं म्हणजे आपल्या मनातल्या श्रद्धेचा आणि परस्परांच्या नात्यांचा सन्मान करणं असंही पाहता येईल.”


 “तुम्ही म्हणताय ते योग्य आहे आई. काही परंपरांमध्ये लपलेली श्रद्धा आणि भावना समजून घेणं आवश्यक आहे. पण माझं म्हणणं असं आहे की आपण बदलत्या काळानुसार विचार करणं देखील महत्त्वाचं आहे ना..”


“ आपण हे केवळ अंधश्रद्धा म्हणून न पाहता, त्यातल्या शास्त्रीय दृष्टिकोन आपण लक्षात घेऊ शकतो. 

ओटी भरण्याचे शास्त्रीय कारण स्त्रीच्या प्रजननक्षमतेचा आणि तिच्या सृजनशील भूमिकेचा आदर आणि पूजनाशी संबंधित आहे. प्राचीन शास्त्रांनुसार, स्त्री जीवनाच्या सर्जनशील उर्जेचे प्रतीक आहे. ओटी भरणे म्हणजे तिच्या गर्भाशयात, म्हणजेच सृजनशक्तीच्या केंद्रात, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक म्हणून पूजेचे साहित्य ठेवणे. हळद, कुमकुम, सुपारी यासारख्या वस्तूंना पवित्र मानले जाते आणि त्या स्त्रीच्या आयुष्यात शुभत्व, आरोग्य, आणि समृद्धी येण्यासाठी दिल्या जातात.


शास्त्रानुसार, ओटी भरण्यामुळे स्त्रीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य, आणि सौख्य येईल, तसेच तिचे कुटुंब धन-धान्याने समृद्ध होईल अशी श्रद्धा आहे. विशेषतः धार्मिक सणांच्या वेळी देवीचा आशीर्वाद मिळावा आणि स्त्रीचा सन्मान व्हावा यासाठी ही परंपरा पाळली जाते.


महिलांना ओटी भरताना मिळणारा सन्मान त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकतो. त्यांना आपली भूमिका महत्त्वाची असल्याची जाणीव होते, जे त्यांचे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. या परंपरेतून समाजात महिलांचे योगदान आणि त्यांची सृजनशील क्षमता यांचा सन्मान केला जातो, जे एक प्रकारचे सकारात्मक reinforcement आहे.


याशिवाय, ओटी भरण्याच्या कृतीतून स्त्रीला समाजाचा आधार आणि प्रेम मिळत असल्याची भावना निर्माण होते, जी तिच्या मानसिक स्थैर्यासाठी आणि भावनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते” सुशीलाताई भरभरून बोलत होत्या आणि सीमा त्यांच्याकडे कुतूहलाने पहात होती .

 

“ अशी का पाहतेस , तुला भरायची नसेल तर भरू नको . तुला मी बळजबरी करणार नाही .”


“ आई , तुम्हाला किती नॉलेज आहे . मला वाटलं तुम्ही मला आता पौराणिक कथा सांगाल पण तुम्ही तर सिक्सर मारला..

 माझा ब्रेन वाश केला तुम्ही ..


आई पण मी या प्रथेत थोडा बदल करू शकते का ..?”


“ अगं कर ना …माणसाने  परंपरा काळासोबत  घेऊन जाणे यातच शहाणपण आहे .”


“ मी सर्वात आधी तुमची ओटी भरते नंतर मी आमच्या ऑफिस हाऊसकीपिंग मध्ये असलेल्या  महिलांची ओटी भरते, ऑफिस मधून लवकर आली तर मंदिरात जाऊन देवीची ओटी भरते..

मला मंदिरात जायला जमले नाही तर माझ्याकडून देवीला सॉरी म्हणा..”


 सुशीलाताई हसून बोलल्या,” सॉरी म्हणण्याची काही गरज नाही . देवीचा वरदहस्त कर्तव्य पार पडणाऱ्या प्रत्येक महिलेवर असतो”

सकाळी झालेला हा सासू सुनेचा संवाद घरात नवीन ऊर्जा देऊन गेला .







1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template