" काय बाई या हल्लीच्या मुली, यांना साड्या नेसायला एवढा का कंटाळा येतो कळतच नाही. सदा सर्वकाळ त्या पॅन्ट चढवलेल्या असतात ." राधाताई आज चिडलेल्या स्वरात बोलत होत्या .
सुप्रिया ही राधाताईची एकुलती एक सून , नावाप्रमाणे सर्वाना प्रिय होती. तिच्या हसऱ्या व मनमिळावू स्वभावामुळे तिने सर्वाना जोडून ठेवलं होतं . . सर्व बाबतीत दोघींचं जमायचं मात्र साडीचा विषय आला की मात्र दोघींचे मतांतर असायचे . राधाताई म्हणायच्या साडीत बाई सुंदर दिसते.
राधाताईची ही लाडकी सून दृष्ट लगाण्यासारखी होती पण हल्ली तिच्या शरीरात खूपच बदल झाले होते .
सुप्रियाला सासुबाईच बोलणं पटायच पण तिचा नाईलाज होता , कारणच असं होतं की , कोणाला काही सांगू शकत नव्हती . आज सासूबाई नंदेला याबद्दल बोलत होत्या त्यावेळी न रहावून सुप्रिया बोलली , “साडी नेसायला मलाही खूप आवडते पण साडी नेसल्यानंतर माझ्या मांड्या खूप घासतात , खूप त्रास होतो. कित्येक दिवस तो त्रास सहन करावा लागतो म्हणून मी साडी नेसत नाही.”
तिचं हे बोलणं ऐकून नणंद बाई बोलल्या,” अगं, त्यावर उपाय शोधायचं सोडून तू काय हे लपवून ठेवतेस. बऱ्याच महिलांना हा त्रास होतो . मांड्या घासू नये म्हणून तिथे खोबरेल तेल लावत जा , याने तुला तात्पुरते बरे वाटेल पण तुला या पासून कायमची सुटका हवी असेल तर तुला मांड्यावर वाढलेली चरबी कमी करावी लागेल.”
“ या त्रासपासू सुटका होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे .” सुप्रिया आनंदाने बोलली .
" फक्त थोडं स्वतःकडे लक्ष दे ... मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि दिनचर्या महत्त्वाची आहे. मांड्यांच्या चरबीवर काम करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत, ज्या घरच्या घरी करता येतील.
आज मी तुला काही योगासनाचा पीडीएफ व व्हिडिओ पाठवते ते बघ आणि आजपासून ते करत जा . तुला लगेच फरक जाणवायला लागेल .
ठरल्याप्रमाणे नणंद बाईने व्हॉटस अप वरती माहिती सेंड केली . माहिती अशी होती ..
१. योगासने आणि व्यायाम:
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे खालील व्यायाम आणि योगासने कर.
वीरभद्रासन (Warrior Pose):
मांड्यांच्या स्नायूंना ताण देणारी ही आसन ३० सेकंदांपासून १ मिनिटापर्यंत करावी.
उत्कटासन (Chair Pose):
गुडघे वाकवून अंग कुर्चीवर बसल्यासारखं ठेवावं. मांड्यांना जोर मिळतो आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
स्क्वॅट्स:
स्क्वॅट्स मांड्यांच्या स्नायूंवर काम करतात. पायांमध्ये अंतर ठेवून शरीराला खाली वाकवून पुन्हा उभे होणे. १०-१५ पुनरावृत्ती करा.
लंजेस:
या व्यायामामुळे मांड्यांच्या स्नायूंना आणि गुडघ्यांना ताण मिळतो. एक पाय पुढे टाकून, शरीर खाली वाकवायचं. प्रत्येक पायावर १०-१२ पुनरावृत्ती करा.
लेग रेजेस (Leg Raises):
पाठ टेकवून झोपून, एकेक पाय वर उचलून ठेवावा. ही प्रक्रिया दोन्ही पायांवर करा. १५-२० वेळा करा.
२. आहारावर नियंत्रण:
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी आहारावरही लक्ष द्यावं लागतं. काही आहाराच्या टिपा:
• संतुलित आहार: प्रथिने, फायबर आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा.
• पाणी पिणे: शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पुरेसं पाणी प्या.
• साखर आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा: पॅकेज्ड फूड, जास्त साखर आणि जंक फूड कमी करा.
• फळं आणि भाज्या खा: फायबरयुक्त आहार घेतल्याने पचन शक्ती सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
३. नियमित चालणे किंवा धावणे:
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी नियमित चालणे, धावणे किंवा सायकलिंगसारखे व्यायाम प्रभावी ठरतात. दिवसातून किमान ३०-४० मिनिटं चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करा.
४. मालिश आणि स्ट्रेचिंग:
मांड्यांवर हलक्या हाताने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि चरबी कमी करण्यास मदत होते. स्ट्रेचिंग केल्याने मांड्यांच्या स्नायूंना लवचिकता येते.
५. नियमितता:
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहार याचं पालन करणं आवश्यक आहे. आठवड्यातून ५ दिवस व्यायाम आणि योग्य आहाराचा नियमितपणे अवलंब केल्यास हळूहळू परिणाम दिसू लागतील.
ही सर्व घरगुती पद्धती तुम्हाला मांड्यांची चरबी कमी करण्यास मदत करतील, मात्र धैर्य आणि सातत्य ठेवल्यासच याचा योग्य परिणाम दिसेल.
सुप्रियाने स्वतःकडे लक्ष देण्याचं ठरवलं. आहारावर लक्ष देणं, नियमित व्यायाम सुरू करणं, आणि मांड्यांवरील फॅट्स कमी करण्यासाठी योग्य उपाय शोधणं, हे तिचं ध्येय बनलं. योगासने, स्क्वॅट्स, आणि लंजेस सारख्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करत, ती हळूहळू परत मार्गावर येऊ लागली.
साडी ही जिच्यासाठी समस्या होती तिच आता आनंदाने साड्या नेसू लागली . तिचा गेलेल्या आत्मविश्वास परत आला . तिने नणंद बाई चे मनापासून धन्यवाद मानले .
सुप्रियाची व्यथा म्हणजे आजच्या अनेक स्त्रियांची कथा आहे, ज्या विविध जबाबदाऱ्यांमुळे स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर आरोग्याच्या समस्या भोगतात. मात्र, सुप्रियाने ज्या धैर्याने हे ओझं दूर करून स्वतःसाठी वेळ काढण्याचा निर्णय घेतला, ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment