मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

नवरात्रीच्या रंगाची किमया




 " आई , आज कोणता रंग आहे ? लवकर सांग .. मी  कुठला वेगळा रंग घातला तर लोक माझ्याकडे मिश्किल नजरेने पाहतात  . काल  असंच  झालं , काल मी  लाल रंगाचा ड्रेस घातला तर सगळे माझ्याकडे अश्या  नजरेने पाहत होते जणू मी वेगळ्याच ध्रुवावरून  आली आहे ..!"

" रंगाचा चार्ट माझ्याकडे होता पण कुठे गेला काही कळत  नाही ,तू  एक  काम कर खिडकीतून डोकावून बाहेर बघ  तुला लगेच लक्षात येईल आजचा रंग कोणता आहे ." प्रिया  सोबत खिडकीत जात आई बोलली . 

 " आमच्या वेळी असं  काही नव्हतं , हल्ली काहीतरी नवीनच फॅड आलं  आलं आहे . पैशांची उधळपट्टी दुसरं  काय .. "  आई वैतागून बोलत होती . 

" हा तर खूप चांगला उपक्रम आहे . पारंपरिक सणं आधुनिक रूपात एकमेकांशी जोडून ठेवण्याची छानच कल्पना आहे . " बाबा आई च बोलणं  तोडत बोलले . 

" पण बाबा हे चालू कसं झालं , आणि हे रोजचे रंग कोण ठरवतात .." 

" महाराष्ट्र टाइम्स चे संपादक भारत कुमार राऊत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चालू झाला . मुंबई च्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नवरात्रीत नऊ  दिवस नेसवणाऱ्या  साड्यांचे  रंग प्रसिद्ध केले होते  . तेंव्हा पासून सर्व महिलानी तोच रंग  परिधान करत या उपक्रमाला भरघोस  प्रतिसाद दिला . आता  तर महिला सोबत सर्व पुरुष वर्ग ,युवा वर्ग या रंगाच्या मालिकेला  भरभरून प्रतिसाद देत आहेत . 

महाराष्ट टाइम्स मध्ये दर वर्षी रंगाची यादी पंचांगकर्ते दा . कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली रंगाची क्रमवारी जाहीर केली जाते . रंग लोकाना जोडण्याचे काम करतात . "

" बाबा  , हे मात्र खरं  आहे . या निमित्याने  माणसं जोडण्याचे काम खूप छान  होते . "टीम बिल्डिंग " छान होते . पण  हे रंग कसे ठरवत असतील बरं  ..? " 

आठवड्याचे वार ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांशी संबंधित असल्यामुळे, त्यांच्याशी जुळणारे रंगही महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक वाराचं ग्रहांशी आणि देवीच्या रूपांशी असलेलं नातं या रंगांचं महत्त्व ठरवतं.


वारांनुसार नवरात्रीचे नऊ रंग


1. सोमवार: पांढरा रंग


सोमवार हा चंद्राशी संबंधित आहे, जो शांती, पवित्रता, आणि सात्त्विकतेचे प्रतीक आहे. म्हणूनच, नवरात्रीच्या सोमवारी पांढरा रंग परिधान करावा लागतो. पांढरा रंग देवी शैलपुत्रीला समर्पित आहे, जी आपल्या भक्तांना शुद्धतेचं वरदान देते.


2. मंगळवार: लाल रंग


मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित असून, हा ग्रह शक्ती आणि उर्जेचं प्रतीक आहे. लाल रंग उग्रतेचा, शक्तीचा आणि देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाच्या शक्तिमानतेचा प्रतीक आहे. मंगळवारी हा रंग घालून देवीच्या उग्र रूपाची उपासना केली जाते.


3. बुधवार: हिरवा रंग


बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो प्रगती, शांती, आणि चैतन्याचं प्रतीक मानला जातो. हिरवा रंग हा समृद्धीचा आणि प्रगतीचा सूचक आहे. बुधवारी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते, आणि हिरवा रंग घालून आपण तिच्या शांततेचा आणि प्रगतीचा स्वीकार करतो.


4. गुरुवार: पिवळा रंग


गुरुवार हा बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे, जो ज्ञान, समृद्धी, आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. पिवळा रंग शुभतेचं, ज्ञानाचं आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. गुरुवारी देवी कूष्मांडा या रूपाची पूजा केली जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते.


5. शुक्रवार: गुलाबी रंग


शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, आणि आनंदाचं प्रतीक आहे. गुलाबी रंग प्रेम, करुणा, आणि कोमलतेचं प्रतीक आहे. शुक्रवारी देवी महागौरीची पूजा केली जाते, जी करुणामय आणि प्रेमळ देवी म्हणून पूजली जाते.


6. शनिवार: जांभळा/करडा  रंग


शनिवार हा शनि ग्रहाशी संबंधित आहे, जो स्थैर्य, धीर, आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. काळा किंवा जांभळा रंग गूढतेचं, स्थिरतेचं आणि साधनेचं प्रतीक आहे. शनिवारी देवी कात्यायनीच्या रूपाची पूजा केली जाते, जी आपल्या जीवनातील अडथळे दूर करते.


7. रविवार: नारंगी रंग


रविवार हा सूर्याशी संबंधित आहे, जो तेज, उर्जा, आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. नारंगी रंग हा उमेदीचं, उर्जेचं आणि चैतन्याचं प्रतीक आहे. देवी सिद्धिदात्री या रूपात रविवारी पूजली जाते, जी साधकांना आत्मिक उन्नतीचा आशीर्वाद देते.


8. सोमवार (दुसरा सोमवार): राखाडी रंग


राखाडी रंग हा संतुलन आणि साधेपणाचं प्रतीक आहे. सोमवारी देवी शैलपुत्रीची उपासना केली जाते, ज्यामुळे साधेपणा आणि स्थिरता जीवनात येते.


9. मंगळवार (दुसरा मंगळवार): लाल रंग


दुसऱ्या मंगळवारीही लाल रंग परिधान केला जातो, जो देवीच्या शक्तिमान रूपाशी संलग्न आहे.


 " पण वारानुसार रंगांची निवड का महत्त्वाची आहे बाबा ?


 आई बोलली " वारानुसार नवरात्रीचे रंग ठरवण्यामागे काही आध्यात्मिक आणि मानसिक कारणं आहेत.


प्रत्येक  वाराशी संबंधित ग्रहाचे विशिष्ट गुण असतात. जसे चंद्र शांतीचा प्रतीक आहे, तर मंगळ उर्जेचा. हे ग्रह आणि त्यांचे रंग आपल्या जीवनातील त्या दिवशीचे मानसिक आणि शारीरिक स्थितीवर प्रभाव टाकतात.

 धार्मिक श्रद्धेनुसार, देवीच्या विविध रूपांशी संबंधित रंग परिधान केल्याने तिच्या कृपेचा अनुभव अधिक होतो. या रंगांच्या आधारे भक्त देवीच्या विविध रूपांची उपासना करतात आणि त्या रूपांशी संबंधित तत्त्वांना आपल्या जीवनात स्वीकारतात.

 रंगांचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. वेगवेगळ्या रंगांचे कंपन वेगवेगळ्या भावनांना प्रेरित करतात. म्हणूनच वारांनुसार रंग ठरवणं यामागे मनःशांती आणि श्रद्धा यांचीही भूमिका आहे." 



प्रिया  आजच्या पांढऱ्या रंगाची तयारी करत बोलली 


"नवरात्रीतील नऊ रंग हे केवळ श्रद्धेचे आणि धार्मिक प्रतीक नाहीत, तर ते आपल्या मनोवृत्तीवर आणि जीवनशैलीवर परिणाम करणारे असतात. वारांनुसार नवरात्रीचे रंग लक्षात ठेवणे सोपे आहे  . चला , आता मी पळते  नाहीतर  माझा ग्रुप फोटो मिस  होईल .." 

1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template