मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

कार्तिक पौर्णिमे दिवशी कार्तिकेय दर्शन कधी घ्यावे ...

 


त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकरानी त्रिपुरासुरांचा वध केला होता, म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून ‘त्रिपुरारी’ या नावाने ओळखले जातात.

भगवान शिवाचे पुत्र कार्तिकेय (म्हणजेच कार्तिक स्वामी) हे शौर्य, पराक्रम, आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. हिंदू धर्मात, कार्तिक पौर्णिमा हा दिवस त्यांना समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी कार्तिकेयची पूजा केल्यास विशेष फळ मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे या दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याला विशेष महत्त्व आहे.

शंकर पार्वतीचे दोन मुले कार्तिकेय आणि गणपती यांना पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्यावरून कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघून गेला. गणेशाने माता पिता यांची पूजा करून तीन प्रदक्षिणा दोघांना घातल्या व म्हणाला माझी पृथ्वीप्रदक्षिणा झाली असे सांगितले 

गणपती सरस्वती यांचा विवाह समारंभ थाटामाटात झाला. कार्तिक याचा प्रवास चालू असतानाच गणेशाचा विवाह झालेला हे कार्तिकेयला समजले. माता पार्वतीने आपणास फसविले असा विचार त्याच्या डोक्यात आला. पार्वती स्त्रीच होती. स्त्रियांवरील कार्तिकेयाचा राग अनावर झाला त्याने शाप दिला, यापुढे जी स्त्री माझे मुख पा‍‍हिल, ती कायमची विधवा होईल. नंतर अरण्यात कायमचे वास्तव्य करण्यासाठी तो निघून गेला. आजन्म ब्रह्मचारी राहिला. वैधव्य येऊ नये म्हणून कार्तिकेयाचे दर्शन स्त्रिया घेत  नाहीत. अशी आख्यायिका आहे .



या कथेनुसार, भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांनी ब्रह्मचर्याचे कठोर व्रत घेतले होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन युद्धकलेला समर्पित केले आणि त्यांनी विवाह न करण्याचा संकल्प केला. ब्रह्मचर्यामुळे त्यांच्या जीवनात विशेष सात्त्विकता आणि साधना होती, ज्यामुळे त्यांचे जीवन अत्यंत शुद्ध व आध्यात्मिक मानले जाते.


अशा स्थितीत, काही मान्यतांनुसार कार्तिकेय यांच्याकडे स्त्रियांनी नियमितपणे जाऊन दर्शन घेणे योग्य मानले जात नाही, कारण त्यांच्या तपस्या आणि ब्रह्मचर्याच्या व्रताचा आदर केला पाहिजे. परंतु, कार्तिक पौर्णिमा हा दिवस त्यांचा विशेष सण असल्याने, त्या दिवशी स्त्रियांना कार्तिकेयांच्या उपासनेत सहभागी होण्यास आणि दर्शन घेण्यास परवानगी दिली जाते. या दिवशी त्यांच्या तपस्येला अभिवादन करण्यासाठी स्त्रिया त्यांचे दर्शन घेऊ शकतात, असे मानले जाते.

कार्तिक स्वामींना कार्तिकेय ,कुमार स्वामी  ,मुरुगन अशा अनेक नावांनी संबोधले जाते . 

आर्थिक लाभ करून घेण्यासाठी  तसेच  तुमचं कर्ज असेल तर ते उतराव असं वाटत असेल तर एक अत्यंत प्रभावी दिवस वर्षभरात  एकदा येतो तो म्हणजे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा आज त्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाच्या विषयी मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे .  गणपती बाप्पांचे मोठे भाऊ कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचे योग स्त्रिया  वर्षभर घेत नाही मात्र एकच दिवस असतो किंवा वर्षातून एकदा स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात ज्या दिवशी पती-पत्नीने किंवा स्त्रीने कार्तिक स्वामींचे दर्शन घेतलं तर पुढचं वर्ष धनाला आणि कशालाही कमी पडत नाही साहस आणि यशस्वीतेच प्रतीक मानलं गेलंय तो म्हणजे कार्तिक स्वामींचे सेनापती मानला गेलाय त्यामुळे ज्ञानसंपन्न तर तो आहेच पण यशस्वीता आणि इतर सगळ्या शुभ गुणांचे अधिपथ्य हे कार्तिक स्वामींकडे दिलेला आहे आणि म्हणूनच एका पर्वणी  काळामध्ये  कार्तिक स्वामींचे दर्शन घेणं हे धनसंपत्ती कारक मानले गेले कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतरच जे सबंध वर्ष हे  धनलाभात जाते  जी लोक आर्थिक अडचणीत आहेत कर्जात  बुडालेल्या व्यक्ती आहेत या मंडळींनी पर्वणी  काळात दर्शन  घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष आर्थिक लाभाचे जाणार   कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग 15 नोव्हेंबर 2024 कार्तिक पौर्णिमा वार शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजून 55 मिनिटं ते मध्यरात्री म्हणजे उजाडती 16 तारखेला दोन वाजून  58 मिनिटं या कालावधीतून तुम्ही दर्शन घेऊ शकता हा कालावधी आहे पाच तास तीन मिनिट आता एवढाच काळ आहे  कारण   कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असं ज्यावेळेस जुळून येतं तोच काळ हा कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी अत्यंत फायद्याचा मानला गेलेला आहे कित्येकदा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र येतही नाही मग त्यावेळेस दर्शन घेऊन उपयोग होत नाही  दर्शनाच्या वेळेस तुमच्या मनामध्ये अतिशय भक्ती भाव असणे गरजेचे आहे तुम्ही ज्या जमतील त्या वस्तूची जर मिळत असतील तर तुम्ही अर्पण करू शकता. कार्तिक स्वामींच्या 28 ना वांचा उल्लेख आहे तुम्ही या दिवशी करू शकता यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्ही जर म्हटलं तर उत्तम ठेवले किंवा  कार्तिकी अष्टक  विशेषतः विद्यार्थी मंडळींना देखील कार्तिक स्वामी दर्शनाचा खूप लाभ होतो विद्या प्राप्ती शैक्षणिक यशासाठी आर्थिक लाभासाठी 

कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी गंगा स्नान, दान, उपवास, आणि दीपदान यांचे विशेष महत्त्व आहे. शिव, विष्णू आणि कार्तिकेय यांच्या उपासनेला समर्पित असलेल्या या दिवसात पवित्र नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्तीची संधी मिळते, असे मानले जाते.

या दिवशी भक्त भगवान शिवाच्या विजयाची व विष्णूच्या आशीर्वादाची उपासना करून जीवनातील पापक्षालन व मोक्षासाठी प्रार्थना करतात.

                       श्री कार्तिकेयाष्टकं 

ॐ श्रीगणेशाय नमः

अगस्त्य उवाच-

नमोऽस्तु वृन्दारकवृन्दवन्द्यपादारविन्दाय सुधाकराय ।

षडाननायामितविक्रमाय गौरीहृदानन्दसमुद्भवाय ॥ १ ॥

नमोऽस्तु तुभ्यं प्रणतार्तिहन्त्रे कर्त्रे समस्तस्य मनोरथानाम् ।

दात्रे रथानां परतारकस्य हन्त्रे प्रचण्डासुरतारकस्य ॥ २ ॥

अमूर्तमूर्ताय सहस्रमूर्तये गुणाय गण्याय परात्पराय ।

अपारपाराय परापराय नमोऽस्तु तुभ्यं शिखिवाहनाय ॥ ३ ॥

नमोऽस्तु ते ब्रह्मविदां वराय दिगम्बरायाम्बरसंस्थिताय ।

हिरण्यवर्णाय हिरण्यबाहवे नमो हिरण्याय हिरण्यरेतसे ॥ ४ ॥

तपः स्वरूपाय तपोधनाय तपः फलानां प्रतिपादकाय ।

सदा कुमाराय हि मारमारिणे तृणीकृतैश्वर्यविरागिणे नमः ॥ ५ ॥

नमोऽस्तु तुभ्यं शरजन्मने विभो प्रभातसूर्यारुणदन्तपङ्क्तये ।

बालाय चाबालपराक्रमाय षाण्मातुरायालमनातुराय ॥ ६ ॥

मीढुष्टमायोत्तरमीढुषे नमो नमो गणानां पतये गणाय ।

नमोऽस्तु ते जन्मजरातिगाय नमो विशाखाय सुशक्तिपाणये ॥ ७ ॥

सर्वस्य नाथस्य कुमारकाय क्रौञ्चारये तारकमारकाय ।

स्वाहेय गाङ्गेय च कार्तिकेय शैवेय तुभ्यं सततं नमोऽस्तु ॥ ८ ॥

॥ इति स्कान्दे काशीखण्डतः श्रीकार्तिकेयाष्टकं सम्पूर्णम् ॥




प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 


||श्री गणेशाय नमः||

अस्य श्री प्रज्ञाविवर्धनस्तोत्रमन्त्रस्य सनत्कुमारऋषि: स्वामीकार्तिकेयो देवता अनुष्टुप् छंदः मम सकलविद्यासिध्यर्थं जपे विनियोग:

||श्री स्कन्द उवाच||

योगीश्वरो महासेन कार्तिकेयोग्निनन्दन:|

स्कन्द:कुमार: सेनानी स्वामी शङ्करसम्भव:||1||

गाङ्गेयस्ताम्रचुडश्च ब्रह्मचारी शिखीध्वज:|

तारकारिरुमापुत्र: क्रौञ्चारिश्च षडाननः||2||

शब्दब्रह्मस्वरुपश्च सिद्ध सारस्वतो गुरु:|

सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षं प्रदप्रभु:||3||

शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तीमार्गकृत्|

सर्वागणप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः||4||

अष्टविंशति नामानि मदीयानिच यः पठेत्|

प्रत्युषम् श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत्||5||

महामंत्रयानींती मम नामानि कीर्तयेत्|

महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा||6||

इति श्री स्कंदपुराणे कार्तिकेय महात्म्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्।


भगवान कार्तिकेय (कार्तिक स्वामी) यांच्या अनेक नावांनी त्यांचे विविध गुणधर्म, पराक्रम, आणि पौराणिक कर्तृत्व दर्शवले जाते. खाली त्यांची २८ नावे आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे:

1. कार्तिकेय - कार्तिका तारकांच्या संरक्षणाखाली वाढलेले.

2. स्कंद - शक्तिशाली योद्धा.

3. मुरुगन - तमिळ संस्कृतीत लोकप्रिय देवता; प्रेम आणि युद्धाचे प्रतीक.

4. षण्मुख - सहा मुख असलेले.

5. सुब्रमण्यम - दक्षिण भारतात पूजले जाणारे देव.

6. गुह - रहस्यमय स्थळी निवास करणारे.

7. स्वामीनाथ - स्वामी किंवा महान गुरु.

8. शिवसुत - शिवांचे पुत्र.

9. तारकजित् - तारकासुराचा पराभव करणारे.

10. सेनानी - देवांचा सेनापती.

11. अग्निभु - अग्निदेवतापासून जन्मलेले.

12. शक्तिधर - शक्तिशाली अस्त्र धारण करणारे.

13. कुमार - सदैव तरुण.

14. गंगासुत - देवी गंगेचा पुत्र.

15. द्वादशभुजा - बारा भुजाधारी.

16. विषाख - ज्यांनी विविध दिशांमध्ये ज्ञानाचे वितरण केले.

17. शिखंडी - शिखा (केसांची वेणी) असणारे.

18. क्रौंचदारण - पर्वत क्रौंचाचा भेद करणारे.

19. पवमान - शुद्धता आणि पवित्रता असणारे.

20. महासेन - मोठ्या सैन्याचे प्रमुख.

21. पार्वतीनंदन - देवी पार्वतीचे पुत्र.

22. सूर्यसह - सूर्याच्या तेजासारखे तेजस्वी.

23. विश्वमित्र - सर्व जगाचा मित्र.

24. दीप्तकेतू - तेजस्वी आणि प्रसिद्ध ध्वजधारी.

25. प्रभु - सर्वश्रेष्ठ आणि प्रभुत्व असणारे.

26. ब्रह्मचारी - ब्रह्मचर्याचे पालन करणारे.

27. रणवीर - युद्धातील वीर.

28. तमिल कडवुल - तमिळ देवता (तमिळ संस्कृतीत त्यांचे महत्त्व).


या नावांद्वारे भगवान कार्तिकेयांच्या विविध गुणधर्मांचा परिचय होतो.


 

1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template