या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना उद्देशून लिहिलेले चार शब्द
प्रिय मैत्रिणींनो,
आपल्या सर्वांच्या पन्नाशीत पदार्पणाच्या या विशेष प्रसंगी आपल्या मनोहर कला महिला मंडळाच्या महिलांकडून तुमचे हार्दिक अभिनंदन व या कार्यक्रमात तुमचे हार्दिक स्वागत आहे . मैत्रिणीनो , हाल्फ सेंचुरी मारलेल्या पण पंचविशीचा उत्साह असणाऱ्या मैत्रिणींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ..
पन्नाशी हा वयाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये आपण आयुष्याच्या विविध पैलूंचा आढावा घेऊ शकतो. मैत्रिणीनो आपण तुमच्या या पन्नास वर्षाचा थोडा फ्लॅश बॅक पाहू या ...
जीवनातील कितीतरी सुखद प्रसंग म्हणजे बालपण , किशोरपण याच काळात होऊन गेले . वयात येणं काय असतं ते तर हाच काळ सांगून गेला ...बाईपनाचा पहिला टप्पा इथेच चालू झाला. कॉलेजचे गुलाबी दिवस इथेच अनुभवले ना .. माहेर - सासरचा सुखद प्रवास याच कालखंडाने अनुभवला आहे ना ..
आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न याच काळात झाले .. आईपण म्हणजे देवाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी ती पण याच काळाने दिली . गृहस्थाश्रमात पदार्पण झाले आणि माझ्यातल्या मी ला विसरूनच गेलो .. आपल्या भोवती गुंफलेली प्रत्येक नाती जपत राहिलो. मुलांचे संगोपन , त्यांच्यवरचे संस्कार यालाच प्रत्येक वेळी प्राधान्य दिले . घराला स्वर्ग बनवलं .
पन्नाशीचा हा टप्पा कधी आला तो कळलाच नाही .. हो ना ..
असं वाटलं झालं आयुष्य ..पण नाही .. या काळात कुटुंबाच्या जबाबदाऱ्या अधिक महत्त्वाच्या होतात. मुलांच्या शिक्षण, त्यांच्या करिअरच्या निर्णयांमध्ये मदत करणे, कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे यांसारख्या गोष्टींमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागला आहात
पन्नाशीच्या उंबरठ्यावर तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा अनेक आठवणी, यशस्वी क्षण आणि काही अपयशेही समोर येत असतील . हे सर्व अनुभव तुम्हाला अधिक समृद्ध आणि परिपक्व बनवले असतील .
तुम्ही या वयाच्या अश्या वळणावर उभ्या आहात जिथे तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत असाल आणि तुमच्या मर्यादा आणि क्षमतांचा स्वीकार करू लागला आहात
पुढच्या तुमच्या या प्रवासात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यांद्वारे तुम्ही तंदुरुस्त ठेवू शकता .
या वयात तुम्हाला सांभाळायचे आहे ते तुमचे मानसिक आरोग्य .
राजोनिवृत्तीचाकाळ म्हणजे बाई च्या आयुष्यातील म्हटला तर शेवटचा टप्पा पण हा टप्पा तितकाच महत्वाचा आहे . या काळात मानसिक तोल जाऊ देऊ नाक . मानसिक आरोग्यासाठी ध्यान, योग आणि छंद यांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यात सहभाग ठेवा .
या वयात, तुम्ही नवीन छंद आणि आवडी शोधू शकता . वाचन, संगीत, कला, नृत्य, भटकंती यांसारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घ्या म्हणजे ते तुम्हाला आनंद देईल आणि जीवनात नवीन रंग भरतील.
मैत्रीचे नाते हे आयुष्यभर टिकणारे असते. मनोहर कला महिला मंडळ ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे . आपल्या मैत्रिणींबरोबरच्या या प्रवासात, आपण एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन, एकमेकांना समजून घेऊ शकतो. आपल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील आणि आपण एकमेकांच्या यशस्वीतेसाठी सदैव साथ देऊ.
प्रिय मैत्रिणींनो, पन्नाशी हा वयाचा एक सुंदर टप्पा आहे. या वयात, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि जीवनाच्या विविध पैलूंचा आनंद घ्या . आम्हा मैत्रिणींची साथ तुम्हाला सदैव राहिलच . आपण आपल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट करू आणि आपण एकमेकींच्या सुख दु:खात सदैव साथ देऊ.
आपल्या सर्वांच्या पुढील उज्ज्वल भविष्या करीत आपल्या मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा!
Mast
उत्तर द्याहटवाMast khup chan
उत्तर द्याहटवा