मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, ५ जानेवारी, २०२५

पाठीचा कणा



“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो. 

माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा ताठ, सरळ बसा .. अशी सारखी का सांगत  असतेस?”

मुलांच्या शंकेचे निरसन झाले पाहिजे म्हणून मी स्मित हास्य करत त्याला जवळ घेतले व त्याला म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगते . ही गोष्ट ऐकल्यावर तुला काय समजले ते तू मला सांग.

गोष्ट म्हटल्यावर तो कान टवकारून गोष्ट ऐकण्यासाठी सज्ज झाला.

मी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली ..

”एका घनदाट जंगलात एकदा सर्व प्राणी एकत्र येऊन चर्चा करत होते. विषय होता – “आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग कोणता?” प्रत्येक प्राणी वेगवेगळी मते मांडत होता.


माकड म्हणाले, “हात-पाय महत्वाचे आहेत; त्यांच्याशिवाय मी झाडावर चढू शकत नाही.”

पक्षी म्हणाले, “पंख सर्वात महत्वाचे; त्यांच्याशिवाय आम्ही उडू शकत नाही.”

हत्ती म्हणाला, “सोंड महत्वाची; तिच्याशिवाय मी काही उचलू शकत नाही.”

मांजर म्हणाले, “डोळे सर्वात महत्वाचे आहेत; त्यांच्याशिवाय मी शिकार कशी करू?”


तिथे शांतपणे उभा असलेला कासव हसत म्हणाला, “प्रत्येकाचा दृष्टिकोन योग्य आहे, पण तुम्ही पाठीचा कणा विसरलात.”


सर्व प्राणी चकित झाले. वाघ विचारले, “पाठीचा कणा? तो कसा महत्वाचा आहे?”


कासव हसून म्हणाले, “मित्रांनो, पाठीचा कणा नसता तर शरीर उभं राहू शकलं असतं का? हात-पाय, डोळे, पंख सगळं उपयोगाचं आहे, पण त्यांना आधार देणारा पाठीचा कणा आहे. तोच तुम्हाला चालायला, उभं राहायला, आणि प्रत्येक हालचाल करायला मदत करतो. तो तुमच्या शरीराचा आधार स्तंभ आहे.”


सर्व प्राणी गप्प झाले आणि कासवाचं म्हणणं पटवत . वाघ म्हणाला, “होय, पाठीचा कणा असाच आपल्या आयुष्याचा आधार आहे. त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे.”

सर्व प्राण्याच्या लक्षात आले की , आपण आपल्या पाठीचा प्रत्यक्षात उपयोग करत नाही त्यामुळे आपण त्याचा कधीच विचार करत नाही . 

भाच्याकडे कडे  बघून मी त्याला म्हटले आता तू सांग कोणता अवयव , आपला बॉडी पार्ट महत्वाचा आहे ..? 

त्याने डोळे बंद करून पाहिले , एका हाताचा, एका पायाचा उपयोग न करता हालचाल करून पाहिली. त्याच्या बाळ मनाने सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. अजूनही त्याचे समाधान झाले नाही . 

मी त्याला समजावले , “ आजीचे मागच्या वर्षी डोळ्याचे ऑपरेशन झाले तरी आजी बाकी शरीराच्या हालचाल करत होती , आजोबांच्या पायाला प्लास्टर होते तरी आजोबा काठीचा आधार घेऊन पुढे जात होते. तुझ्या हाताला जखम झाली तर तू  चालत फिरत होतासच ना …” 

हो ,हो …असे म्हणत त्याने मान डोलावली.

“ आपली मावशी आजी  नेहमी बेडवर झोपून असते. ती कश्यासाठीच उठत नाही. तू पाहिले आहेस ना ..?” 

 “ हो, ती सू- शी पण तिथेच करते..”

“ तिचा पाठीचा कणा खराब झाला आहे म्हणून ती काहीच करू शकत नाही.”

माझे बोलणे ऐकताच तो ताठ बसला.


आपण बरेच वेळा आपल्या पाठीच्या कण्याला दुर्लक्षित करत असतो . 

बसण्याच्या चुकीच्या सवयी मुळे आपण आपला कणा मोडून टाकतो . 


पाठीच्या कण्याला त्रास देणाऱ्या आपल्या चुकीच्या बसण्याच्या पद्धती पाहू 

1. सतत वाकून बसणे

सतत पुढे झुकून काम करणे (लॅपटॉप, मोबाईल वापरताना) यामुळे मणक्यावर दाब वाढतो .

2. खूप वेळ एका जागी बसणे 

दीर्घकाळ खुर्चीत हालचाल न करता बसल्या मुळे कण्याच्या स्नायूंवर ताण येतो.

3. चुकीच्या प्रकारची खुर्ची वापरल्या मुळे त्रास होतो 

कमरला आधार न देणाऱ्या खुर्च्या कंबरेच्या स्नायूंवर दाब निर्माण करतात.

४. एकीकडे झुकून बसणे

डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकून बसल्याने कणा असंतुलित होतो.

५. खूप उंच किंवा कमी टेबलवर काम करणे

मान आणि पाठीवर अनावश्यक ताण येतो.


यावर उपाय म्हणजे 


योग्य उंचीच्या खुर्च्या व टेबल निवडणे, पाठेला आधार देणे, दर ३० मिनिटांनी हालचाल करणे, आणि बसण्याची स्थिती तपासणे आवश्यक आहे.



कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसल्यामुळे आपला पाठीचा कणा सरळ राहतो. 

योगा मध्ये कोणतेही आसन करताना पाठीच्या कण्याची विशेष काळजी घेतली जाते .

पाठीचा कणा म्हणजे शरीराचा आधार आहे. त्याची योग्य काळजी घेणं, बसण्याच्या-सोप्या पद्धतींचं पालन करणं, आणि योग्य व्यायाम करणं हे महत्वाचं आहे. कारण तोच आपल्या शरीराचं संतुलन आणि ताकद राखतो.

पाठीचा कणा म्हणजे आपल्या शरीराचा आधारस्तंभ. मान, पाठ आणि कंबरेला जोडणाऱ्या या हाडांच्या रचनेमुळे आपण चालणे, उभे राहणे, आणि विविध हालचाली सहजपणे करू शकतो. कणाचं संरक्षण हे महत्वाचं असतं, कारण त्यामधून जाणाऱ्या मज्जारज्जूमुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला संदेश पोहोचतो. योग्य बसणे, उभे राहणे, आणि नियमित व्यायाम करून आपण त्याला सुदृढ ठेवू शकतो. चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, लवचिकतेचा अभाव किंवा सतत वाकून बसणे यामुळे कणाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाठीचा कणा तंदुरुस्त ठेवणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे.


२ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template