जय जय मनोहर मंडळा वंदन करा कलेचा मंदिरा
नऊ वर्षाचा गाजे सोहळा
अहो , नऊ वर्षाचा गाजे सोहळा पाहुणे आले कौतुक पाहण्या मंडळा
नऊ वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली. नऊ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना झाली असली तरी पन्नास वर्षांपूर्वी याचे स्वप्न पाहिले गेले होते
काका काकूंना करून वंदन करते मंडळाचा इतिहास कथन
श्रीखंडे काका काकू म्हणजे कलेचे उपासक कला त्यानी जोपासली नाही तर कला वृद्धींगत केली माणसातली कला ओळखून कलाकार तयार केला
श्रीखंडे काका काकूने स्वप्न पाहिले श्रीखंडे काका काकूने स्वप्न पाहिले कलेचा विकास व्हाया झटले
खास कलेसाठी ही वास्तु बांधली खास कलेसाठी कमलांकित वास्तू सजवली
कलेसाठी ही वास्तु दान देऊनी गेले हो जी जी जी
मंडळी सामान्य लोक नखातील माती इतरांना देताना दहा वेळा विचार करतात पण या दाम्पत्याने हसत हसत कलेसाठी ही वास्तू दान देऊनी गेले कमलांकित ही वास्तू आपल्या हाती देऊन गेले त्यांच्या पश्चात सर्वांना प्रश्न पडला
कलेचा वारसा कसा तेवत ठेवावा हा लागला ध्यास नव्या पिढीला कशी वाटेल या वास्तूची आस
कलेविषयी या वास्तू बद्दल प्रेम वाटणे गरजेचे आहे नवीन पिढी या वास्तुत आली पाहिजे पण ती कशी येणार याचा विचार चालू झाला
संध्या मावशीला सुचली एक कल्पना
तरुण मुलींच्या विकासासाठी आखली योजना
२०१६ साली झाली मंडळाची स्थापना
नऊ वर्षांपूर्वी बीज हे पेरले मनोहर कला महिला मंडळ नावाने फुलले मंडळाचा खरा प्रवास आता चालू झाला प्रत्येक वर्षी नवीन कमिटी आली. प्रत्येक कमिटीने भरीव कामगिरी केली
प्रत्येक वर्षी सोहळे नव्हे नृत्य नाटकांचे कार्यक्रम गाजवले सांस्कृतिक कार्यक्रमाने रंग भरले दिमाखात सणवार साजरे केले प्रख्यात वक्ते बोलावून महिलांना ज्ञान दिले
सुजान पालकत्वाचे धडे गिरवले लघुउद्योगाला मिळाली इथे दिशा महिलांच्या मनात निर्माण झाली स्वकर्तुत्वाची आशा
कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
समाजसेवेचे ठेवुनी भान
केले सर्वांनी यथाशक्ती दान
महिलांनी आमच्या मंडळामध्ये बालिकाश्रमाला भेट दिली वृद्धाश्रमाला भेट दिली. मतिमंद शाळेला भरभरून दान दिले एवढेच नाही तर आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळीचा फराळ वाटला
किती गावे या मंडळाचे गुणगान हो जी जी
मंडळ उभे राहिले प्रेमाने
स्नेह जुळला जुळली मने
हसत खेळत नाती जुळली हसत खेळत नाती जुळली मंडळाची वाटचाल पुढे चालली
खरी मैत्री काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मंडळ जीवाभावाच्या मैत्रिणी इथे भेटल्या एकमेकांचे दुःख सुख शेअर केले
अशीच जपूया हीच प्रेमाची नाती दाही दिशेला पसरवू मंडळाची ख्याती
आज या संस्मरणीय दिनी आपण काका काकूंना एक वचन द्यायचे आहे मी बोलते माझ्यामागे तुम्हाला बोलायचं आहे
"श्रीखंडे काका काकू आज आम्ही वचन देतो कलेचा हा ठेवा पुढे नेत राहू
तुमच्या प्रेरनेतून नवीन पिढीला शिकवू तुमच्या प्रेरणेतून पुढील पिढीला शिकवू मनोहर मंडळाचा दिवा निरंतर तेवत ठेवू जय जय मनोहर मंडळा वंदन करा कलेचे मंदिरा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment